भारतीय क्रिकेट संघाला २०२३ मध्ये दोन ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यानंतर एकदिवसीय विश्वचषक भारताला यजमानपद मिळणार आहे. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ जखमी खेळाडूंमुळे हैराण झाला होता. यामुळे इंडियन प्रीमियर लीग २०२३ दरम्यान प्रमुख भारतीय खेळाडूंना विश्रांती द्यायची की नाही असा वाद सुरू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) म्हटले आहे की, “खेळाडूंना कुठलीही दुखापत होऊ नये यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) काळजी घेईल.” दरम्यान, “टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी भारतीय बोर्डाने आयपीएल संघांशी चर्चा करावी, असे म्हटले आहे. यासोबतच प्रत्येक क्रिकेटपटूला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा नियम असायला हवा, असेही ते म्हणाले.”

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ६० वर्षीय रवी शास्त्री म्हणाले, “आयपीएलच्या वेळीही बोर्डाला फ्रँचायझींना सांगावे लागते की ऐका, आम्हाला त्या खेळाडूंची गरज आहे, भारताला आगामी विश्वचषक आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये खेळण्यासाठी तंदुरस्त असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भारताच्या फायद्यासाठी, जर त्यांनी तसे केले नाही तर मग खूप अवघड होऊन बसेन. काही सामने त्या प्रमुख खेळाडूंना घेऊन खेळा, उर्वरित सामन्यात मात्र त्यांना विश्रांती द्या.”

हेही वाचा: NZ vs SRI: वादळं वार सुटलं गं अन ब्रेसवेलचा बॉल दिसेना; फलंदाजासह गोलंदाजही झाला चकित, पाहा Video

खेळाडूंच्या दुखापतीवर रवी शास्त्री म्हणाले

खेळाडूंच्या दुखापतीवर रवी शास्त्री म्हणाले, “क्रिकेट खूप होत आहे. विश्रांतीची वेळ कमी झाला असून याबाबत बोर्ड आणि खेळाडूंनी चर्चा करण्याची गरज आहे. त्यांना सांगावे लागेल की तुम्हाला विश्रांती कधी हवी आहे आणि सामने कधी खेळायचे आहेत. शेवटी खेळाडूंनी ठरवायचे की त्यांना ब्रेक हवा की सामने?” ते पुढे म्हणाले, “ आमच्या काळात ८-१० वर्षात कमीत कमी मालिका होत असे. त्यामुळे खेळाडू अधिक काळ खेळू शकले.”

देशांतर्गत क्रिकेटसाठी बनवलेले नियम

बीसीसीआयने खेळाडूंना दरवर्षी ठराविक देशांतर्गत सामने खेळणे बंधनकारक करावे, असेही रवी शास्त्री यांना वाटते. ते म्हणाले, “तो कोणीही असो. आपले फिरकीपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे फलंदाज फिरकी खेळण्यात अधिक चांगली कामगिरी करू शकतात. तो जितका जास्त खेळतो तितके त्याला चांगले यश मिळते.”

हेही वाचा: WPL 2023, GGW vs UPW: यूपीच्या विजयाने गुजरातसह बंगळुरूच्या आशा मावळल्या, जायंट्सवर तीन विकेट्सने मात

WTC २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल येथे ७ ते ११ जून दरम्यान खेळवला जाईल. जिथे भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे, तिथे ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळाली आहे. २० वर्षांनंतर, दोन्ही संघ आयसीसीच्या अंतिम फेरीत भिडतील आणि दोन्ही संघांपैकी कोणीही कोणतीही कसर सोडू इच्छित नाही आणि परिपूर्ण प्लेइंग इलेव्हनसह उतरण्याचा प्रयत्न करू इच्छित आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाने यष्टिरक्षक म्हणून कोणाला संघात ठेवायचे याच्या चर्चांना उधाण आले आहे. दिग्गज फलंदाज सुनील गावसकर आणि माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याबाबत बोलत असताना गौतम गंभीरची निवड त्यांच्यापेक्षा वेगळी आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 for world cup and wtc final will bcci agree to ravi shastris request regarding ipl franchise avw
First published on: 20-03-2023 at 21:46 IST