IPL 2023: ख्रिस गेलची कोहलीसोबत डान्स स्पर्धा ठेवली तर कोण जिंकणार? जाणून घ्या ‘युनिव्हर्स बॉस’ने काय दिले उत्तर

Chris Gayle on Virat Kohli: ख्रिस गेल आयपीएलमध्ये आरसीबीसह अनेक संघांकडून खेळला आहे. त्याने कोहलीसोबत अनेक संस्मरणीय भागीदारी केल्या आहेत. गेलने उघडपणे कोहलीसोबतच्या बाँडिंगवर आपले मत व्यक्त केले.

IPL 2023: If Chris Gayle has a dance competition with Kohli then who will win Know what the 'Universe Boss' replied
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Chris Gayle on Virat Kohli: वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने भारतीय फलंदाज विराट कोहलीच्या उत्कटतेचे आणि दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे. जेव्हा ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळले होते तेव्हा दोघांमधील बाँडिंगवर मत व्यक्त करत वेगवेगळ्या किस्स्यांची आठवण करून दिली. गेल आणि कोहलीने आयपीएलमध्ये अनेक हंगाम एकत्र घालवले, प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले, किमान १० शतकी भागीदारी एकमेकांनी केली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी सलामीवीर आणि युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल म्हणतो की “आरसीबीकडून खेळताना विराट कोहलीसोबत फलंदाजीचा खूप आनंद झाला. विराटसोबत डान्स करण्यात मजा येत असल्याचेही त्याने सांगितले आहे. मात्र, विराट आणि त्याच्यामध्ये डान्सच्या बाबतीत स्पर्धा झाली तर तो स्वतःच विजेता ठरेल, असा विश्वासही तो व्यक्त करतो.”

हेही वाचा: Ashwin Video: ‘झलक दिखलाजा!’ राजस्थान रॉयल्सच्या फॅन्सनी अ‍ॅश अण्णासाठी गायले गाणे, डान्सचा Video व्हायरल

‘जिओ सिनेमा’ अ‍ॅपवर बोलताना ख्रिस गेल म्हणाला, “आमच्या दोघांच्या एकत्र फलंदाजीच्या खूप आठवणी आहेत. ते क्षण आम्ही नेहमी जपत राहू. मैदानाबाहेरच्या नृत्याशी निगडित अनेक आठवणी आहेत. ते व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता. हे क्षणही मी नेहमी जतन करीन.” गेल पुढे म्हणतो, “विराटसोबतची फलंदाजी अप्रतिम होती. त्याची या खेळाची आवड आणि खेळण्याची शैली जबरदस्त होती. याचे श्रेय तुम्ही त्याला द्यावे.”

विराटसोबत डान्सची स्पर्धा असेल तर

धडाकेबाज फलंदाज गेल म्हणतो, “विराट आणि इतर सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे नेहमीच मजेदार होते. एकदा मी तिथे गेल्यावर, मी नेहमी आनंदी असतो आणि खूप मजा करतो आणि नाचतो. जेव्हा मी तिथे माझ्या काही डान्स मूव्हज दाखवल्या तेव्हा मला आढळले की विराटमध्येही उत्तम डान्स करण्याची क्षमता आहे. पण हो, भारतीय डान्स असला तरी फक्त ख्रिस गेलच जिंकेल आणि कॅरेबियन डान्सचा मुद्दा असला तरी फक्त ख्रिस गेलच जिंकेल.”

हेही वाचा: Shikhar Dhavan: … जेव्हा शिखर धवनने १४-१५ व्यावर्षी केली होती HIV चाचणी, टीम इंडियाच्या गब्बरने केला मोठा खुलासा

गेल आणि विराट बराच काळ एकत्र क्रिकेट खेळले आहेत

गेल म्हणाला, “विराट आणि इतर खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे नेहमीच आनंददायी असते. मी नेहमीच आनंद घेतला आहे, नाचले आहोत आणि अशा गोष्टी घडल्या आहेत. RCB त्यांचे माजी खेळाडू गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या फ्रँचायझीमधील योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करत आहे.” विराट कोहली आणि ख्रिस गेल दीर्घकाळ एकत्र क्रिकेट खेळले आहेत. जरी आता ख्रिस गेल आणि आरसीबी वेगळे झाले आहेत आणि तो आयपीएलमध्ये देखील मैदानावर दिसणार नाही परंतु सध्या तो फक्त भारतात आहे. आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 18:14 IST
Next Story
IPL 2023: स्टीव्ह स्मिथची आयपीएलमध्ये एन्ट्री! २०२२च्या लिलावात राहिला होता अनसोल्ड, आता ‘या’ संघात होणार सहभागी
Exit mobile version