यंदाची आयपीएल दिल्ली कॅपिटल्ससाठी खूपच निराशाजनक ठरले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने १४ सामन्यांतून ५ विजय मिळवून आयपीएल २०२३ गुणतालिकेत ९व्या स्थानावर समाप्त केले आहे. भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनावर टीका केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने फॉर्मात असलेल्या अक्षर पटेलला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी का दिली नाही यामुळे गावसकर निराश झाले.

अक्षर पटेलने आयपीएल २०२३मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघाचे दिग्गज खेळाडू फ्लॉप होत असताना अक्षर पटेलने २८३ धावा करत ११ विकेट्स घेतल्या. पटेलला बहुतांशी सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली. अवघ्या काही सामन्यांमध्ये त्याला पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली.

Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs PBKS: गुजरातला नकोसा ‘यश’, बंगळुरूसाठी मौल्यवान; कॉमेंट्रीदरम्यान कोणी केलं असं वक्तव्य?

सुनील गावसकर यांनी स्पोर्टस्टारच्या त्यांच्या स्तंभात म्हटले की, “कॅपिटल्सचे व्यवस्थापन हे खूप हेकेखोर होते आणि त्यांनी अक्षर पटेलला फलंदाजीसाठी अजिबातच पूर्ण संधी दिली नाही. ‘दिल्ली कॅपिटल्सने फॉर्मात असलेल्या अक्षर पटेलला फलंदाजीसाठी वर न पाठवण्याचा हट्ट धरला. माजी भारतीय संघ रवी शास्त्री यांनी अक्षर पटेलची फलंदाजी क्षमता ओळखली होती, ज्यावर दिल्ली कॅपिटल्सने प्रश्न उपस्थित केला होता किंवा अक्षर पटेलला नंबर-७ च्या आधी फलंदाजीसाठी पाठवायचे नाही असे त्यांच्या करारात कुठेतरी लिहिले आहे. कदाचित त्यांना अक्षर पटेल खटकत असावा.”

हेही वाचा: Virat Kohli on Rashid Khan: पराभवानंतरही ‘किंग’ कोहलीने जिंकली लाखो चाहत्यांची मनं, राशिद खानला जर्सीवर दिला ऑटोग्राफ

याशिवाय सुनील गावसकर यांनी पृथ्वी शॉच्या खराब कामगिरीवरही मत व्यक्त केले. आयपीएल २०२३मध्ये पृथ्वी शॉने ८ सामन्यात १०६ धावा केल्या. सुनील गावसकर म्हणाले, “पृथ्वी शॉला बरगडीजवळचे चेंडू खेळताना त्रास होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे तो आयपीएल २०२३मध्ये धावा करू शकला नाही.” आयपीएल २०२३मध्ये, चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी पहिला क्वालिफायर खेळला जाईल.

हंगामात दिल्लीचे प्रदर्शन निराशाजनक असले, तरी कर्णधार वॉर्नरने मोठा विक्रम केला. वॉर्नरने यावर्षी १४ आयपीएल सामन्यात ३६.८५च्या सरासरीने ५१६ धावा केल्या आहेत. सोबतच आयपीएलमध्ये सर्वाधिक हंगामात ५०० पेक्षा अधिक दावा करण्याचा विक्रम त्याने नावावर केला. हा त्याचा सातवा आयपीएल हंगाम आहे, ज्यामध्ये ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Dhoni Jadeja Controversy: चेन्नई-गुजरात सामन्यापूर्वी एम.एस. धोनी आणि रवींद्र जडेजाच्या नात्यात दुरावा? पत्नी रिवाबाच्या ट्वीटने उडाली खळबळ

आयपीएल २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२० आणि आता २०२३मध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रमही वॉर्नरकडून मोडीत निघाला. पूर्वी विराट कोहली आणि वॉर्नर यांनी प्रत्येकी ६ आयपीएल हंगामांमध्ये ५००धावा केल्या होत्या. पण शनिवारी वॉर्नर विराटच्या पुढे गेला. यादीत केएल राहुल आणि शिखर धवन अनुक्रमे तीन आणि चार क्रमांकावर आहेत.