LSG vs DC Cricket Score Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये शनिवारी (१ एप्रिल) दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान खेळला जात आहे. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयी सलामी देण्याच्या इराद्याने मैदानात उतरले असून लखनऊने दिल्लीसमोर १९३ धावांचे आव्हान ठेवले आहे. आपला नियमित कर्णधार ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या दिल्लीने या सामन्यावेळी त्याची आठवण काढली आहे. हा सामना जिंकून त्याला संघाचा भेट देण्याचा विचार सुरु आहे.

दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. लखनऊचे कर्णधारपद केएल राहुलकडे आहे. गेल्या वर्षी त्याने संघाला प्लेऑफमध्ये नेले होते. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सची कमान ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरकडे आहे. कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या जागी वॉर्नरला कर्णधारपद मिळाले आहे.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
List of Mahendra Singh Dhoni's records
DC vs CSK : माहीने दिल्लीविरुद्ध दमदार फटकेबाजी करत लावली विक्रमांची रांग, पाहा संपूर्ण यादी
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…

दिल्लीने लखनऊला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लखनऊचे हे होम ग्राउंड असल्याने त्यांनी याचा पूर्ण फायदा घेतला. पहिल्यांदाच इकाना स्टेडियमवर खेळताना लखनऊने शानदार फलंदाजी करत २० षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य मिळाले. लखनऊकडून वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सने ३८ चेंडूत सर्वाधिक ७३ धावा करत तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि सात षटकार मारत गोलंदाजांना अक्षरशः धू-धू धुतले. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरनने २१ चेंडूत झटपट ३६ धावा केल्या. त्याने त्याच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकारांचा साज चढवला. आयुष बडोनीने शेवटच्या षटकात येत ७ चेंडूत आक्रमक १८ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार मारले.

यादोघांव्यतिरिक्त फारशी मोठी खेळी एकाही फलंदाजाला खेळता आली नाही. दीपक हुडा १७, मार्कस स्टॉयनिस १२ आणि कर्णधार केएल राहुल ८ धावा करून बाद झाले. कृणाल पांड्या १३ चेंडूत १५ धावा करून नाबाद राहिला आणि कृष्णप्पा गौतमने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत १९३ पर्यंत धावसंख्या पोहचवली. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले.

हेही वाचा: IPL 2023: “एवढ्या सहज कसे काय…”, ऋतुराजने षटकार मारून दिग्गजांना प्रभावित केले, अनिल कुंबळेने केले कौतुक

LSG vs DC लाइव्ह स्कोअर: दोन्ही संघांचे खेळणे-११

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, मार्क वुड, जयंत यादव, रवी बिश्नोई, आवेश खान.

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिले रुसो, सरफराज खान (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार.

दोन्ही संघातील बदली खेळाडू (त्यापैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल)

दिल्ली कॅपिटल्स: अमन हकीम खान, मनीष पांडे, प्रवीण दुबे, ललित यादव, अभिषेक पोरेल.

लखनऊ सुपर जायंट्स : प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम, यश ठाकूर, डॅनियल सॅम्स, अमित मिश्रा.