scorecardresearch

Premium

IPL 2023 Prize Money: विजेता संघ होणार मालामाल! उदयोन्मुख खेळाडूंवरही होणार कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव, जाणून घ्या

IPL 2023 Prize Money: आयपीएल २०२३चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यानंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघावर पैशांचा वर्षाव केला जाईल. त्याच वेळी, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना बीसीसीआयकडून मोठी रक्कम मिळणार आहे.

IPL 2023: IPL 2023 prize money 46.5 crores leave the champion the losing teams will also get money
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांना प्रत्येकी १५ लाख रुपये आणि स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपये मिळतील. सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

IPL 2023 Prize Money: आयपीएल २०२३चा अंतिम सामना आज २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. २००८ मध्ये सुरू झालेली आयपीएल आज जगातील सर्वात मोठ्या क्रीडा लीगमध्ये सामील झाली आहे. पहिल्या सत्रात विजेत्या संघाला बक्षीस म्हणून ४.८ कोटी रुपये मिळाले. आणि अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला २.४ कोटी रुपये मिळाले. आज १५ वर्षांनंतर विजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत ४ पटीने वाढ झाली आहे.

आयपीएलची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. २००८ साली सुरू झालेल्या या लीगच्या प्रेक्षकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. बक्षिसांच्या बाबतीतही या लीगने वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लीगच्या प्रत्येक मोसमात, फ्रँचायझी मोठ्या रकमेची बोली लावून भारतातून आणि परदेशातील खेळाडूंना खरेदी करतात. त्याच वेळी, हंगाम संपेपर्यंत, विजेत्या संघापासून ते साखळी फेरीत बाहेर पडलेल्या संघापर्यंत, त्यांना कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळतात.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

या लीगच्या पहिल्या दोन हंगामात विजेत्या संघाला ४.८ कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला २.४ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. गेल्या मोसमातील विजेत्या संघ गुजरात टायटन्सला २० कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला १३ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

आयपीएल २०२३मध्ये विजेत्या संघावर कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२३ मध्ये एकूण ४६.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांना प्रत्येकी १५ लाख रुपये आणि स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपये मिळतील. या हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडूला १२ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

हेही वाचा: IPL 2023 Final: शुबमनच्या फलंदाजीला लगाम घालण्यासाठी CSKचा ‘हा’ गोलंदाज बनणार सर्वात मोठं शस्त्र, एम.एस. धोनीचा काय आहे मास्टर प्लॅन?

स्पोर्ट्सस्टारच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये कोणता संघ विजेतेपद मिळवेल, त्याला २० कोटी रुपये मिळतील. त्याचवेळी अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला १३ कोटी रुपये जातील. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला ७ कोटी रुपये, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपरजायंट्सला ६.५ कोटी रुपये मिळतील.

कोण बनेल चॅम्पियन?

चौथ्या फेरीतील विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यातील विजेतेपदासाठी भिडणार आहे. महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा आयपीएल सामना असल्याचेही मानले जात आहे. अशा स्थितीत चेन्नई त्याला फेअरवेल गिफ्ट देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुसरीकडे गुजरातचा दुसरा हंगाम खेळणारा संघही काही कमी नाही. हा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. तिच्याकडे अनेक मॅचविनर आहेत आणि ती पुन्हा एकदा विजेतेपद जिंकू शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 13:59 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×