scorecardresearch

Premium

IPL 2023: “धोनी हा खूप चलाख असून जडेजाला…” सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचे मोठे विधान

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून पाचवे आयपीएल विजेतेपद जिंकले. सामन्यानंतर समालोचक संजय मांजरेकर यांनी भाष्य केलं आहे.

IPL 2023: Dhoni is very smart and he used Jadeja well Former cricketer Sanjay Manjrekar's big statement after the match
संग्रहित छायाचित्र (जनसत्ता)

चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी (२९ मे) उशिरा इतिहास रचला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. चेन्नई संघाने सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली. मुंबईकडेही पाच ट्रॉफी आहेत. सामन्यानंतर भारताचे माजी समालोचक संजय मांजरेकर यांनी मोठे विधान केले. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दावा केला आहे की सीएसकेचा कर्णधार एम.एस. धोनीने सोमवारी गुजरात विरुद्धच्या आयपीएल २०२३ फायनलमध्ये रवींद्र जडेजा याच्यावर विश्वास ठेवला होता. चेन्नईने डकवर्थ लुईस पद्धतीने गुजरातचा ५ गडी राखून पराभव केला.

जडेजाने आयपीएल २०२३ मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजीत आतापर्यंतच्या सर्व आयपीएलपेक्षा या हंगामात सर्वात जास्त २० विकेट्स घेतल्या. मात्र, तो फलंदाजीत त्याला हवे तसे योगदान देऊ शकला नाही., त्यामुळे महत्त्वाच्या अंतिम सामन्यात जडेजावर दबाव होता. पण त्याने मोहित शर्माच्या षटकात शेवटच्या दोन चेंडूवर १० धावा काढत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यावर माजी समालोचक संजय मांजरेकर यांनी धोनीचे कौतुक केले आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

ESPNCricinfo वर बोलताना मांजरेकर म्हणाले की, “अष्टपैलू खेळाडू जडेजा मोसमात खूप शांत होता आणि जाताना खूप आनंदी होऊन गेला. मोईन अली डग आउटमध्ये फलंदाजीची वाट पाहत असतानाही एम.एस. धोनीने जडेजाच्या फलंदाजीवर विश्वास ठेवला आणि त्याला पाठवले. गोलंदाजीतही त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि महत्वाच्या क्षणी संघाला विकेट्स काढून दिल्या.”

हेही वाचा: MS Dhoni on Chahar: जर्सीवर ऑटोग्राफ घेण्यासाठी गेलेल्या दीपक चाहरचा एम.एस. धोनीने लावले पळवून, सामन्यानंतरचा Video व्हायरल

पुढे बोलताना माजी समालोचक मांजरेकर म्हणाले की, “मला वाटत नाही की जेव्हा तो सीझनमध्ये आला तेव्हा तो फॉर्म मध्ये होता. जडेजाला स्वतःच्या खेळीवर आणि क्षमतेवर विश्वास होता त्यामुळेच तो त्याच्या कारकिर्दीत यशस्वी ठरला. हंगाम संपताना तो खूप आनंदी होता. त्याने कधीही स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नेहमी धोनीचे ऐकले. पुन्हा, मी हेच सांगेन की धोनी हा एक चलाख कर्णधार असून त्याला माहिती आहे की कोणत्यावेळी काय करायचे आहे. कोणत्या खेळाडूकडून काय काढून घ्यायचे आहे. यावरून महेंद्रसिंग धोनीचा जडेजावर विश्वास आहे हे सिद्ध होते.”

पुढे संजय मांजरेकर म्हणाले की, “बर्‍याच लोकांना वाटते, मोईन अली चांगल्या श्रेणीचा फलंदाज आहे. धोनीने मोईन अलीला पुढे का पाठवल नाही? पण त्याने जडेजावर विश्वास ठेवला, डावखुरा फलंदाज आधीच खेळपट्टीवर असूनही उजव्या हाताच्या फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय धोनीने घेतला नाही. यामागे त्याचा जडेजाच्या फलंदाजीवर असणारा विश्वास हेच उत्तर आहे.”

हेही वाचा: IPL 2023: कॅप्टन कूल धोनी मुंबईच्या रुग्णालयात दाखल होणार; IPLच्या पहिल्या सामन्यापासून करत होता ‘या’ दुखापतीचा सामना!

मांजरेकर शेवटी म्हणाले की, “आपण सौहार्द, शांतपणा हा धोनीकडून शिकू शकतात. शुबमन गिलची विकेट मिळाल्यावर शांत होता आणि त्याने जडेजासोबत एकत्र घालवलेला छोटासा क्षण हा पुरेसा आहे. मला वाटते की त्यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत आणि त्यामुळे जडेजाला टीम इंडियात अधिक उच्च पातळीवर नेले आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2023 ms dhoni trusts ravindra jadeja to do the job with the bat in the final said sanjay manjrekar avw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×