BCCI Announces Playoffs & Finals Dates: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २१ एप्रिलच्या संध्याकाळी आयपीएलच्या १६व्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांच्या तारखांबाबत वेळापत्रक जाहीर केले. ज्यामध्ये या मोसमातील पहिला क्वालिफायर सामना २३ मे रोजी आणि एलिमिनेटर सामना २४ मे रोजी चेन्नईच्या मैदानावर, तर दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना २६ आणि २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

या हंगामातील लीग टप्प्यातील सामने २१ मे रोजी संपतील. यानंतर प्लेऑफ टप्प्यातील सामने आयोजित केले जातील. २३ मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार्‍या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये सामना खेळवला जाईल.

Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
Playoff equation in IPL 2024 Updates in Marathi
IPL 2024 Playoffs : सात पराभवानंतरही आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी, मुबंई देखील दावेदार, जाणून घ्या समीकरण
Delhi Capitals vs Gujarat Titans Updates in Marathi
DC vs GT : ऋषभ-अक्षरच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा गुजरातवर ४ धावांनी निसटता विजय, मिलरचे अर्धशतक ठरले व्यर्थ

यानंतर २४ मे रोजी या मोसमातील एलिमिनेटर सामना पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये चेन्नईच्या मैदानावरच खेळवला जाईल. या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात, पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभवाचा सामना करणारा संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ यांच्यात सामना होणार आहे.

हेही वाचा – IPL 2023 CSK vs SRH: जडेजाच्या फिरकीसमोर एसआरएचच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, हैदराबादने चेन्नईला दिले १३५ धावांचे लक्ष्य

आयपीएलच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना २८ मे रोजी होणार –

इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे. या मोसमातील पहिला सामनाही याच स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे, तर गेल्या मोसमातील अंतिम सामना येथेच झाला होता. या सीझनबद्दल बोलायचे तर यामध्ये एकूण ७० लीग सामने खेळले जाणार आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत एकूण २८ सामने खेळले गेले आहेत. यानंतर प्लेऑफचे सामने आयोजित केले जातील.

१२ मैदानांवर ५२ दिवसांत एकूण ७० सामने खेळवले जात आहेत –

या वेळी ही स्पर्धा अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला या 12 ठिकाणी खेळवली जात आहे. या १२ मैदानांवर ५२ दिवसांत एकूण ७० सामने खेळवले जात आहेत.

आयपीएल २०२३ प्लेऑफचे वेळापत्रक:

२३ मे – क्वालिफायर एक सामना (चेन्नई)

२४ मे – एलिमिनेटर सामना (चेन्नई)

२६ मे – क्वालिफायर दोन सामना (अहमदाबाद)

२८ मे – अंतिम सामना (अहमदाबाद)