IPL 2023 Points Table: आयपीएल २०२३ अर्ध्यावर आले आहे. इंडियन प्रीमिअर लीगचा अर्धा टप्पा पार पडला असून सर्व संघांचे निम्मे-निम्मे सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे आता प्ले ऑफची चुरस आणखीनच वाढली आहे.  एकूण ७० सामन्यांपैकी ३५ सामने खेळले गेले आहेत, म्हणजेच ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या १४ सामन्यांपैकी सर्व १० संघांनी अर्धे सामने खेळले आहेत. अर्धे सामने म्हणजे पहिले ७ सामने. आणि, आता ग्रुप स्टेजमध्ये तेवढेच सामने खेळायचे बाकी आहेत. अशा परिस्थितीत गुणतालिकेची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

पॉइंट टेबलची स्थिती सांगते की प्लेऑफच्या शर्यतीत कोणता संघ कुठे आहे? कोणत्या संघ सर्वात जास्त दावेदारी दाखल करू शकतो? आणि, जे शर्यतीत मागे आहेत त्यांना आता अजून किती मेहनत घ्यावी लागणार  आहे? आयपीएलच्या १६व्या हंगामातील ३५व्या लीग सामन्यात, गुजरात टायटन्सच्या संघाने मुंबई इंडियन्सचा ५५ धावांनी सहज पराभव केला आणि गुणतालिकेत त्यांचे स्थान मजबूत केले. गुजरातचा या मोसमातील ७ सामन्यांमध्ये हा ५वा विजय होता आणि आता संघाच्या ०.५८०च्या निव्वळ धावगतीने १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 MI vs RCB Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
MI vs RCB Match Preview: रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे संघ आमनेसामने, कशी असणार दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
Heinrich Klaassen who scored an unbeaten 80 runs against MI
IPL 2024 : हेनरिचला ‘क्लास’ खेळीसाठी सनरायझर्स हैदराबादकडून मिळाले खास ‘गिफ्ट’, PHOTO होतोय व्हायरल

आयपीएल २०२३ मधील सध्याचे टॉप ४ संघ स्थान कायम ठेवतील का?

महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२३च्या अर्ध्या प्रवासानंतर गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्याच्यानंतर हार्दिक पांड्याचा संघ गुजरात टायटन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनीही सर्वोतम चार संघांमध्ये स्थान कायम राखले आहे. आयपीएल२०२३ च्या प्लेऑफमध्ये, तोच संघ पोहोचतो जो गुणतालिकेत पहिल्या ४ मध्ये आहे. मग जर या दृष्टिकोनातून बघायचे झाले तर सध्या चेन्नई, गुजरात, राजस्थान आणि लखनऊ हे संघ आघाडीवर आहेत.

यामध्ये चेन्नई आणि गुजरातने ७ पैकी ५-५ सामने जिंकले असून त्यांचे केवळ १० गुण आहेत. पण चांगल्या रनरेटमुळे, चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिस-या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान आणि लखनौच्या संघांचीही तीच स्थिती आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या ७-७ सामन्यांपैकी ४-४ जिंकले असून त्यांचे ८ गुण आहेत. पण उत्तम रन रेटमुळे राजस्थान हा लखनऊपेक्षा पुढे आहे.

गुणतालिकेत बंगळुरू, पंजाबही मागे नाहीत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सध्या गुणतालिकेत ५व्या स्थानावर आहे, ज्यामध्ये त्यांनी ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत आणि सध्या त्यांचा रनरेट हा -०.००८ आहे. यानंतर पंजाब किंग्ज संघ सहाव्या स्थानावर आहे, ज्यांचे ८ गुण आहेत परंतु त्यांचा निव्वळ धावगती -०.१६२ आहे. यानंतर, ७व्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे, ज्याला आतापर्यंत ७ पैकी फक्त ३ सामने जिंकता आले आहेत गुजरात विरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे, संघाचा निव्वळ धावगती -०.६२० आहे.

शेवटच्या तीन स्थानांवर कोलकाता, हैदराबाद आणि दिल्ली

सध्या, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे, ज्याने ७ पैकी ५ सामने गमावले आहेत आणि त्यांचा रनरेट हा -०.१८६ आहे. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ ९व्या स्थानावर आहे, ज्याचे ७ सामन्यांनंतर ४ गुण आहेत आणि दिल्ली कॅपिटल्स संघ १०व्या स्थानावर आहे आणि त्यांचे देखील यावेळी केवळ ४ गुण आहेत.

हेही वाचा: WTC Final: टीम इंडियाच्या निवडीवर हर्षा भोगलेंनी केले प्रश्नचिन्ह उपस्थित! नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या

प्लेऑफच्या शर्यतीत पुढे काय होणार?

आता प्रश्न असा आहे की पहिले ७ सामने खेळून या १० संघांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेतले. म्हणजे त्यांना पुढे काय करावे लागेल किती मेहनत घ्यावी लागेल? हे दिसते. त्यामुळे सर्व संघांनी त्यांचे उरलेले ७ सामने जिंकणे हाच उत्तम मार्ग आहे. पण हे करणे एवढे सर्वांना सोपे जाणार नाही. चेन्नई आणि गुजरात हे सध्या अव्वल दोन संघ असून त्यांचे १०-१० गुण आहेत. म्हणजे त्यांनी पुढील ७ पैकी ३ किंवा ४ सामने जिंकले तर १६ किंवा १८ गुणांसह ते प्लेऑफचे तिकीट मिळवू शकतात. याप्रमाणे तिसऱ्या क्रमांकापासून सहाव्या क्रमांकापर्यंतच्या संघांना किमान ४ किंवा ५ सामने जिंकावे लागतील. येथेही प्रश्न रनरेटचा असल्याने अधिकाधिक सामने जिंकून विजयाचे अंतर कसे कमी करता येईल हे जास्त महत्त्वाचे असणार आहे.