scorecardresearch

Premium

IPL 2023: “तेरे को शर्म तो आती नहीं…” इशांत शर्माला ताप आल्यामुळे अक्षर पटेलला खूप ऐकून घ्यावे लागेल, जाणून घ्या

दिल्ली कॅपिटल्स त्यांचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध बंगळुरू येथे खेळणार होते. दरम्यान, इशांतला तीन दिवसांपासून ताप होता. यासंदर्भातील माहिती अक्षर पटेलने एका व्हिडिओत सांगितली आहे.

IPL 2023: Tereko Sharam Toh Aati Nahi When Ishant Sharma was in bad condition due to fever Akshar Patel heard fiercely
संग्रहित छायाचित्र (जनसत्ता)

Ishant Sharma on Akshar Patel: इशांत शर्मा आयपीएल २०२१ नंतर तब्बल ७०० दिवसांनी सामना खेळला, या ३४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. या मोसमातील पहिले पाच सामने गमावल्यानंतर दिल्लीने गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग विजय नोंदवले आहेत. यामध्ये इशांतने तीन विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, संघात परतण्यापूर्वीच भारतीय वेगवान गोलंदाजा इशांतची प्रकृती खालावली होती. तापामुळे त्यांना चालता येत नव्हते. याबाबत त्याने अक्षर पटेलशी संवाद साधला आहे.

दिल्ली कॅपिटल्स त्यांचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध बंगळुरू येथे खेळणार होते. दरम्यान, इशांतला तीन दिवसांपासून ताप होता. अलीकडेच दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ३४ वर्षीय या गोलंदाजाने त्याचा सहकारी अक्षर पटेलसोबतचा एक मजेदार किस्सा शेअर केला. तो (इशांत शर्मा) बरा झाल्यावर त्याने गंमतीने अक्षरला ही सर्व हकीकत सांगितली.

World Cup 2023: In Hyderabad Pakistani cricketers ate biryani took selfies with fans watch the video
Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video
hansie cronje & bob woolmer
World Cup Cricket: मॅच सुरू असताना कोच-कॅप्टन यांच्यात इअरपीसद्वारे गुजगोष्टी; सामनाधिकाऱ्यांची कारवाई
IND vs AUS: KL Rahul slams fitness questioners Said wicketkeeping is getting better in last few matches
KL Rahul: फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना राहुलभाईचं सडेतोड उत्तर; म्हणाला, “गेल्या काही सामन्यांत…”
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video

इशांत शर्मा अक्षर पटेलला काय म्हणाला?

इशांत शर्मा म्हणाला, “जेव्हा मला थोडा वेळ उभे राहण्याची ताकद मिळाली, तेव्हा मी जेवणाचा ट्रे उचलला आणि तुमच्या खोलीत आलो आणि म्हणालो, “तेरे को शर्म तो आती नहीं, एक बार भी फोन नहीं किया. तुला लाज वाटत नाही, तू मला एकदाही फोन नाही केला, मी जगतोय-मरतोय, याची तुला काही पडली नाही. तू मला एकदाही विचारलं नाहीस.” यावर अक्षरने उत्तर दिले, “मी तुझ्यासाठी प्रार्थना करत होतो. माझ्या प्रार्थनेने तू सामन्यात पुनरागमन केलेस आणि तीन विकेट्स घेत चमत्कारच केला. तुला एक लाखाचे बक्षीस मिळाले आहे ते मी केलेल्या प्रार्थनेमुळेचं.” हा गंमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: PAK vs NZ: आंतरराष्ट्रीय स्तरावर इज्जतीचा फालुदा! थर्टी यार्डच्या नियमावरून अलीम दारने पकडली चूक, सामना सहा मिनिटे थांबला, पाहा Video

इशांत शर्माने तांत्रिक त्रुटींवर काम केले

इशांत शर्माने २०२१ साली भारतासाठी १००वी कसोटी खेळली. अक्षर पटेलही या सामन्यात खेळला होता. या अष्टपैलू खेळाडूने वेगवान गोलंदाजाच्या पुनरागमनावर आणि तो खेळत नसताना कोणत्या गोष्टींवर काम करत होता याबद्दल प्रश्न विचारला. यावर इशांतने उत्तर दिले तो म्हणाला, “मी पडद्यामागे खूप मेहनत करत होतो. इतकी वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर ज्या गोष्टींसाठी मी वेळ देऊ शकलो नाही अशा गोष्टींवर मी काम केले. माझे मनगट एका बाजूला पडल्यासारखे दिसत होते. त्यामुळे चेंडू स्विंग होत नव्हता या तांत्रिक दोषांवर काम केले. आता वयानुसार मला खूप लवकर थकवा येतो. त्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या गोलंदाजीबद्दल माजी वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा केली. या वेळेचा मी चांगला उपयोग केला. माझी गोलंदाजी सुधारण्यासाठी आणि लय परत मिळवण्यासाठी मला या गोष्टींवर काम करावे लागले.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2023 tereko sharm to aati nahi akshar patel has to listen a lot as ishant sharma catches fever avw

First published on: 30-04-2023 at 12:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×