scorecardresearch

Premium

IPL 2023 Final Match: चेन्नईच्या विजयाने उथप्पाने असे काही केले की आपल्या मुलाला…; live सामन्यातील समालोचकांचा Video व्हायरल

चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर ५ गडी आयपीएल २०२३च्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. त्यासामन्यात कॉमेंट्री करणाऱ्या कॉमेंटेटर्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या रवी शास्त्री, इरफान पठाण आणि रॉबिन उथप्पा यांचा समावेश आहे.

IPL 2023 Final Match: Chennai winning celebration Uthappa forgot of his son on Chennai wining moment Video of live match commentators viral
सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलचा नवा चॅम्पियन बनला आहे. आयपीएल २०२३च्या अंतिम सामन्यात त्याने डकवर्थ-लुईस पद्धतीने गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सने पराभव केला. या सामन्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. चेन्नईच्या विजयावर सीएसकेचे माजी दिग्गज रॉबिन उथप्पा ते रवी शास्त्री यांच्यापर्यंत समालोचन करणारे खेळाडू त्यांच्या जागेवरून उठले. इतकेच नाही तर दीपक चाहरने आपल्या हॉटेलमध्ये जोरदार डान्स केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जया भारद्वाजही उपस्थित होत्या.

खरं तर, उथप्पा या सामन्यात हिंदी कॉमेंट्री पॅनलचा भाग होता. कॉमेंट्री करताना त्यांनी मुलाला मांडीवर बसवून तो कॉमेंट्री करत होता. जडेजाने विजयी चौकार मारताच उथप्पाने मुलाला आपल्या मांडीवर घेतलेलेही तो जल्लोषात विसरला आणि आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र, नंतर त्याला आठवले आणि तो आपल्या मुलासमोर नाचत आहे. त्यानंतर त्याने मुलाला आपल्या कडेवर उचलले आणि समालोचन चालू ठेवले. उथप्पा आयपीएल २०२१ मध्ये ट्रॉफी विजेत्या चेन्नई संघाचा भाग होता.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

त्याच वेळी, इंग्लिश कॉमेंट्री पॅनेलचा भाग असलेले शास्त्री देखील सीएसकेच्या विजयानंतर आपल्या खुर्चीवरून उठले आणि एकच जल्लोष केला. त्यांचा हा व्हिडीओ केविन पीटरसनने शेअर केला आहे. त्याने लिहिले, “रवी शास्त्री आणि इयान बिशप यांच्यासोबत सामन्यात कॉमेंट्री करण्याचा हा बहुमान मिळाला. हे दोघे खेळाचे दोन महान समालोचक आहेत! चेन्नईचे अभिनंदन आणि आयपीएलच्या या मोसमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार!”

दुसरीकडे वेळी, दीपक चाहरचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो हॉटेलच्या बाल्कनीमध्ये चाहत्यांसमोर नाचताना दिसत आहे. यावेळी दीपक जबरदस्त डान्स करतो. सामना संपल्यानंतर त्याने हा विजय अंबाती रायडूला समर्पित केला. त्याचवेळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर एक व्हिडिओही समोर आला आहे. जडेजाने विजयी चौकार मारले तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “चेन्नईच्या विजयानंतर स्टेडियमच्या बाहेरही चाहत्यांचा जल्लोष ऐकू आला.”

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. त्यानंतर पावसाने हस्तक्षेप करून अडीच तासांचा खेळ वाया घालवला. सामना १२.१० वाजता पुन्हा सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. चेन्नईने शेवटच्या चेंडूवर पाच विकेट्स गमावून हे यश मिळवले. या विजयासह चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावण्याच्या मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गुजरातकडून साई सुदर्शनने शानदार खेळी केली. त्याचे शतक हुकले आणि तो ४७ चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ९६ धावा काढून बाद झाला. यानंतर चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने २५ चेंडूत सर्वाधिक ४७ धावा केल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2023 uthappa forgot of his son on chennai wining moment csks victory commentators reacted like this watch video here avw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×