IPL 2024, Delhi Capitals vs Chennai Super Kings: दिल्ली कॅपिटल्स संघाने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला नमवत आयपीएल २०२४ मधील पहिला विजय नोंदवला. चेन्नईचा दिल्ली संघाने २० धावांनी पराभव केला आणि आपले खाते उघडले आहे. सामना दिल्लीने जिंकला असला तरी चर्चा रंगली ती ४२व्या वर्षी १६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३७ धावांची खेळी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची. ‘माही मार रहा है’ या उक्तीचा प्रत्यय घडवत धोनीने षटकार, चौकार लगावणं विसरलो नसल्याचं दाखवून दिलं. पण चेन्नईला धोनीची ही खेळी विजय मिळवून देऊ शकली नाही.

दिल्लीने दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १७१ धावाच करूच शकला. खलील अहमद आणि मुकेश कुमारच्या शानदार गोलंदाजीने चेन्नईच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. चेन्नईला १२ चेंडूत ४६ धावांची गरज असताना धोनी आणि जडेजा मैदानात होते. पण मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करत एकही बाऊंड्री दिली नाही. गुरू शिष्याच्या या सामन्यात शिष्य ऋषभ पंतने बाजी मारली.

IND vs PAK Highlights Match Score Updates in Marathi T20 World Cup 2024
India Won Against Pakistan Highlights: न्यूयॉर्कमध्येही भारताचा पाकिस्तानवर डंका! ऋषभ पंत, जसप्रीत बुमराहने उमटवली छाप
KKR won the trophy and became joint first with RR
KKR vs SRH : ट्रॉफी जिंकण्यासोबत केकेआरचा मोठा पराक्रम, IPL च्या इतिहासात दुसऱ्यांदाच पाहायला मिळाला ‘हा’ विक्रम
Rinku Singh Takes Gautam's Blessings after KKR 3rd time champions in IPL
KKR vs SRH : रिंकू सिंग नतमस्तक होताच गौतम गंभीरने मारली मिठी, केकेआरच्या जेतेपदानंतरचा VIDEO व्हायरल
KKR and Shah Rukh Khan Flying Kiss Celebration with IPL Trophy Video viral
KKR आणि शाहरूख खानने BCCI ला चिडवलं? ट्रॉफी जिंकल्यानंतर ‘ही’ पोज देत केलं सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल
After defeating sunrise Hyderabad Kolkata knight rider will win the IPL title for the third time ipl 2024
कोलकाताने करुन दाखवलेच! कमिन्सच्या हैदराबादला नमवत तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर
Kavya Maran Cries After SRH Lose to KKR in IPL 2024 Final
KKR vs SRH: काव्या मारन पराभवाने झाली भावुक; कॅमेऱ्याकडे पाठ करत पुसले अश्रू, VIDEO व्हायरल
Kolkata Knight Riders Win IPL 2024 Title
IPL 2024 Final: कोलकाता नाईट रायडर्स दशकभरानंतर आयपीएल विजेते
Chepauk Stadium Creates History in KKR Vs SRH IPL Final 2024 match
IPL 2024 Final : एमएस धोनीच्या ‘होम ग्राउंड’ने रचला इतिहास, चेपॉक स्टेडियमने नोंदवला ‘हा’ खास पराक्रम

दिल्ली संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ५ गडी गमावून १९१ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर (५२) आणि ऋषभ पंत (५१) यांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला निर्धारित षटकांत ६ गडी गमावून केवळ १७१ धावा करता आल्या. महेंद्रसिंग धोनीने आपली तडाखेबंद खेळी केली. माहीने १६ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसहह ३७ धावा करत ते नाबाद राहिले.

१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाडने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. त्याने २ चेंडूंचा सामना करत १ धाव काढली. खलील अहमदच्या चेंडूवर ऋषभ पंतने ऋतुराजला यष्टीमागे झेलबाद केले. चेन्नईला ७ धावांवर दुसरा धक्का बसला. रचिन रवींद्रची शिकार करून खलील अहमदने सीएसकेला बॅकफूटवर ढकलले. रचिनने १२ चेंडूंचा सामना करत २ धावा केल्या.

दोन मोठ्या विकेट्सनंतर रहाणे आणि मिचेलने संघाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावा केल्या. अक्षर पटेलने ही भागीदारी तोडली. धोकादायक ठरत असलेल्या मिचेलला त्याने झेलबाद केले. मिचेलने २६ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसाठी ३४ धावांची खेळी खेळली. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांच्यात चौथ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी झाली. मुकेश कुमारने १४व्या षटकात रहाणेला झेलबाद केले.राहाणेने ३० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या आधारे ४५ धावा केल्या.

रहाणे बाद होताट फलंदाजीसाठी आलेला समीर रिझवी गोल्डन डकचा बळी ठरला. मुकेश कुमारने त्याला बाद करत एकाच षटकात २ विकेट्स मिळवल्या. १७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिवम दुबे झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूत १८ धावा केल्या. यानंतर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला. धोनीने तुफानी खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. धोनी १६ चेंडूत ३७ धावा करत नाबाद राहिला. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. रवींद्र जडेजाने १७ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने ३, खलील अहमदने २ आणि अक्षर पटेलने १ विकेट मिळवली.

तत्त्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट गमावून १९१ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५२ धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय कर्णधार ऋषभ पंतने ३२ चेंडूत ५१ धावा केल्या. पृथ्वी शॉचे अर्धशतक हुकले असले तरी त्याने २७ चेंडूत ४५ धावांची शानदार खेळी खेळली. मिचेल मार्शने १२ चेंडूत १८ धावा केल्या. चेन्नईसाठी मथिशा पाथिरानाने ३ विकेट मिळवले आणि एक शानदार झेल टिपला. त्यांच्याशिवाय रवींद्र जडेजा आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी १ विकेट मिळवली.