Shubman Gill Mystery Girl:  आयपीएल २०२४ च्या ३२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या सामन्यादरम्यान तो एका मिस्ट्री गर्लवर आपले हृदय हरवून बसताना दिसला. सामन्यानंतर शुबमन गिल आणि एका मिस्ट्री गर्लचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गिल मिस्ट्री गर्लकडे पाहून हसतोय असे सांगितले जात आहे. दरम्यान, अनेकांनी ही तरुणी पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड असल्याचा दावा केला आहे.

गिल आणि मिस्ट्री गर्लचा व्हिडीओ चर्चेत

हा व्हिडीओ त्यावेळचा आहे, जेव्हा गिल डगआउटमध्ये बसला होता. दरम्यान, राशिद खानने षटकार ठोकला आणि शुबमन गिल आणि मिस्ट्री गर्ल चर्चेत आले. कॅमेरामनचे लक्ष एका मिस्ट्री गर्लवर गेले, जी मॅचचा आनंद घेत होती आणि टाळ्या वाजवत होती. दरम्यान, गिलची एंट्री होते आणि तो हसताना दिसतो. दोघांचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, गिलने मिस्ट्री गर्लकडे पाहून नाही तर राशिदच्या षटकारावर तशी रिअ‍ॅक्शन दिल्याचे काही चाहत्यांचे म्हणणे आहे.

VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…

मिस्ट्री गर्ल पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते शुबमन गिलची फिरकी घेत आहेत. त्याच्या या व्हिडीओवर काही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, यानंतर ही मिस्ट्री गर्ल कोण याची चर्चा सुरू झाली आहे. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, ही सुंदर मुलगी पृथ्वी शॉची एक्स गर्लफ्रेंड प्राची सिंग आहे, तर काहींनी तिच्याबद्दल इतर अंदाज लावले आहेत. असो, काहीही असो, गिलचा हा व्हिडीओ चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

ही तर स्पॅनिश अभिनेत्री?

एका चाहत्याने मिस्ट्री गर्लचा फोटो शेअर करत म्हटले की, ही स्पॅनिश अभिनेत्री आना सेलिया दे आर्माससारखी दिसत आहे. मात्र, या पराभवानंतर गिलचे आव्हान आणखी वाढले आहे. अशाप्रकारे चाहते शुबमन गिलच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने ७ पैकी ४ सामने गमावले असून पॉइंट्स टेबलमध्ये ते सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. यामुळे शुबमन गिल आता आपल्या संघाला प्लेऑफमध्ये कसा घेऊन जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.