IPL 2024 LSG VS CSK Match Noise Levels Peak : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतेय. धोनी जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा तेव्हा चाहते ‘धोनी धोनी’ अशी नारेबाजी करीत एकच जल्लोष करतात. यावेळी स्टेडियममधील माहोल अगदी पाहण्यासारखा असतो. १९ एप्रिलच्या रात्री आयपीएल २०२४ मधील ३४ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लखनौमधील इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. त्यावेळी धोनी फलंदाजीसाठी ड्रेसिंग रूममधून बाहेर येताच संपूर्ण स्टेडियम त्याच्या नावाच्या जल्लोष करू लागले. धोनीच्या एन्ट्रीवेळी स्टेडियममध्ये एवढा आवाज झाला, की स्मार्ट वॉचवरही अलर्टचे मेसेज येऊ लागले. त्या मेसेजद्वारे एवढे ध्वनिप्रदूषण स्टेडियममधील प्रेक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सूचित केले गेले होते.

लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार खेळाडू क्विंटन डीकॉकच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने आपल्या स्मार्ट वॉचवर आलेल्या अलर्टचा फोटो शेअर केला आहे. या अलर्ट मेसेजमध्ये असे लिहिले होते की, स्टेडियममध्ये एवढा गोंगाट आहे की जर कोणी येथे १० मिनिटे थांबला, तर तो बहिरा होऊ शकतो. अलर्ट मेसेजमध्ये हा आवाज ९५ डेसिबल इतका असल्याचे म्हटले होते; जो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानला जातो.

RCB into Playoffs
RCB in Playoffs: यश दयाळ ठरला आरसीबीचा तारणहार: बलाढ्य चेन्नईला नमवत प्लेऑफ्समध्ये
MS Dhoni's surprise visit to RCB dressing room
VIDEO: RCB vs CSK सामन्यापूर्वी एमएस धोनी गेला आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये, पाहा नेमकं करतोय तरी काय
Shubamn Gill Touches Feet of Abhishek sharma Mother Video Viral
IPL 2024: शुबमन गिलने स्टेडियममध्येच अभिषेक शर्माच्या आईला खाली वाकून केला नमस्कार, Video व्हायरल
Rilee Rossouw gun shot celebration
PBKS vs RCB : विराट कोहलीने रायली रुसोच्या सेलिब्रेशनची नक्कल करत दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
Mumbai Indians Seniors Questioned Team Functioning Under Hardik Pandya Captaincy
IPL 2024: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर मुंबई इंडियन्स संघातील वरिष्ठ नाराज
punjab kings vs chennai super kings match preview
IPL 2024 : फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष; चेन्नई सुपर किंग्जसमोर आज पंजाब किंग्जचे आव्हान
Dhruv Jurel celebrates his maiden ipl fifty with father and family
IPL 2024: ‘बाबा हे तुमच्यासाठी…’ ध्रुव जुरेलने वडिलांसोबत केलं पहिल्या अर्धशतकाचे सेलिब्रेशन, पाहा सामन्यानंतर कुटुंबासोबतचा VIDEO
Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल

VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”

लखनौविरुद्धच्या या सामन्यात धोनी केवळ नऊ चेंडू खेळला; ज्यामध्ये त्याने ३११ च्या स्ट्राइक रेटने २८ धावा केल्या. या खेळीत त्याने तीन चौकार व दोन षटकारही मारले. धोनीच्या या वेगवान खेळीमुळे लखनौचा संघ निर्धारित २० षटकांच्या सामन्यात १७६ धावा करू शकला. धोनीशिवाय रवींद्र जडेजाने सीएसकेकडून नाबाद ५७ धावांची खेळी केली. सीएसके विरुद्धच्या सामन्यात लखनौने आठ विकेट्स राखून सामना जिंकला. लखनौकडून केएल राहुलने ८२ आणि क्विंटन डीकॉकने ५४ धावांचे योगदान दिले.