भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रविचंद्रन अश्विनने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला पाठिंबा दिला आहे. आयपीएलच्या या हंगामात हार्दिकला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या जागी त्याला संघाचे नेतृत्त्व सोपवल्यापासून हार्दिकवर सर्वांनीत निशाणा साधला आहे. स्टेडियममध्ये त्याच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रीम दरम्यान, हे सुरू असलेले फॅन्स वॉर संपवण्याची मागणी केली, कारण ही होणारी टीका फार वाईट वळण घेत आहे.

हार्दिकला ट्रोल केले जात असल्याप्रकरणी अश्विन म्हणाला, “यामध्ये कोणाचीही भूमिका नाही. यात फ्रँचायझी किंवा खेळाडूची कोणतीही भूमिका नाही. माझ्या मते जबाबदारी आणि दबाव हा चाहत्यांवर आहे.” २०२४ च्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली आहे. संघाने प्रयत्न करूनही दोन्ही सामने संघाने गमावले आहेत. अहमदाबादच्या जमावाने हार्दिकला चांगलेच ट्रोल केले होते. हार्दिकने गुजरात टायटन्सचा संघ सोडून मुंबई संघात परतला आहे.

News anchor news
“क्लिवेज नाईटक्लबसाठी असतात”, ट्रोल झाल्यानंतर टीव्ही अँकरने दिलं चोख उत्तर, कपड्यांवरून पात्रता ठरवणाऱ्यांना महिलांनी अशीच शिकवावी अद्दल!
KL Rahul and Shreyas Iyer video viral
VIDEO : राहुलने सुपरमॅनप्रमाणे हवेत झेपावत घेतला श्रेयसचा अप्रतिम झेल, ‘कॅच’ पाहून गोलंदाजाने जोडले हात
MSK Prasad Statement on Hardik Pandya
सध्या देशात हार्दिकपेक्षा चांगला वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू कोणी आहे? – BCCI चे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद
Irfan's objection to making Hardik vice-captain
T20 World Cup 2024 : हार्दिकला उपकर्णधार करण्यावर इरफान पठाणने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, “त्याच्यापेक्षा बुमराह…”
google lay off
Googleने कोअर टीममधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण भारतीयांसाठी सुवर्णसंधी!
Virat Kohli's reaction on strike rate
विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’
Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”

अश्विन म्हणाला पुढे म्हणाला, “तुम्ही इतर कोणत्याही देशात असे घडताना पाहिले आहे का? तुम्ही जो रूट आणि जॅक क्रॉऊलीच्या चाहत्यांना भांडताना पाहिले आहे का? किंवा जो रूट आणि जोस बटलरच्या चाहत्यांमध्ये झालेली अशी भांडणं तुम्ही पाहिली आहेत का? ही फार विचित्र गोष्ट आहे. स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्सचे चाहते ऑस्ट्रेलियात भांडतात का? मी हे अनेकदा सांगितले आहे. हे क्रिकेट आहे. एखादा सिनेमा नाही. मला माहित आहे की मार्केटिंग, पोझिशनिंग आणि ब्रँडिंग या सारख्या गोष्टी या सर्वाचा भाग आहेत. मी ते नाकारत नाही. मी या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाही परंतु हे सर्व चुकीचेही नाही,” अश्विन म्हणाला.

“चाहत्यांनी एखाद्या खेळाडूला इतक्या टोकाला जाऊन ट्रोल करू नये. हे खेळाडू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतात ते लक्षात ठेवा-आपल्या देशाचे. मग कोणत्याही क्रिकेटपटूला असं ट्रोल करणं योग्य आहे का? हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. जर तुम्हाला एखादा खेळाडू आवडत नसेल आणि एखाद्या खेळाडूला तुम्ही ट्रोल करत आहात तर स्पष्टीकरण देण्यासाठी संघ व्यवस्थापनाने का समोर यावे? यापूर्वी असं कधीच घडलं नाही, असे सगळे वागत आहेत,” अश्विन पुढे म्हणाला.

गांगुली सचिनच्या नेतृत्वाखाली खेळला…

“गांगुली सचिनच्या नेतृत्वाखाली खेळला आहे आणि नंतर सचिन गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळला. हे दोघेही राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. तर तिघेही अनिल कुंबळे आणि धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले. धोनीही विराट कर्णधार असताना संघात खेळला आहे,” ही उदाहरणे देत अश्विनने चाहत्यांना समजावून सांगितले.

अश्विन म्हणाला, “आपल्याला स्वतःला सुधारण्याची गरज आहे. अडचण अशी आहे की आपण घरात बसून राहणार पण बाहेरचा कचरा मात्र इतरांनी उचलावा अशी आपली इच्छा असते. हे कष्ट आम्हाला स्वतः करायचे नसतात. आपण आधी स्वतःला सुधारले पाहिजे.”

हीच एक गोष्ट मला माझ्या देशातून काढून टाकायची आहे..

“क्रिकेट हा सच्चेपणाचा खेळ आहे. अशा खेळांमध्ये खऱ्या भावना असतात. या भावना कशा हाताळायच्या, यातून बाहेर येत क्रिकेट खेळताना संतुलन कसे राखायचे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. खऱ्या खेळाची तुलना सिनेमाशी कधीच होऊ शकत नाही. नायक आणि त्यांची व्यक्तीपूजा करा, याच्याबद्दल माझं काहीच दुमत नाही.
याच्याबद्दल माझ काहीच दुमत नाही. तुमच्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा द्या, परंतु दुसऱ्या खेळाडूंना तुच्छ वागणून देऊन नाही. हीच एक गोष्ट मला माझ्या देशातून काढून टाकायची आहे.”

मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना संघाच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना सोमवारी १ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.