भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रविचंद्रन अश्विनने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला पाठिंबा दिला आहे. आयपीएलच्या या हंगामात हार्दिकला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या जागी त्याला संघाचे नेतृत्त्व सोपवल्यापासून हार्दिकवर सर्वांनीत निशाणा साधला आहे. स्टेडियममध्ये त्याच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रीम दरम्यान, हे सुरू असलेले फॅन्स वॉर संपवण्याची मागणी केली, कारण ही होणारी टीका फार वाईट वळण घेत आहे.

हार्दिकला ट्रोल केले जात असल्याप्रकरणी अश्विन म्हणाला, “यामध्ये कोणाचीही भूमिका नाही. यात फ्रँचायझी किंवा खेळाडूची कोणतीही भूमिका नाही. माझ्या मते जबाबदारी आणि दबाव हा चाहत्यांवर आहे.” २०२४ च्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली आहे. संघाने प्रयत्न करूनही दोन्ही सामने संघाने गमावले आहेत. अहमदाबादच्या जमावाने हार्दिकला चांगलेच ट्रोल केले होते. हार्दिकने गुजरात टायटन्सचा संघ सोडून मुंबई संघात परतला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 r ashwin scolds fans over booing hardik pandya as captain of mumbai indinas bdg
First published on: 30-03-2024 at 21:46 IST