RR vs MI Rohit Sharma Shane Bond Viral Video: जयपूरच्या मानसिंग सवाई क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने मुंबईचा ९ विकेट्स आणि ८ चेंडू राखून मोठा पराभव केला. या सामन्यापूर्वीच्या दिवशी संघ जेव्हा मैदानावर सराव करत होते. तेव्हाचे काही व्हीडिओ, फोटो पोस्ट केले जातात. यादरम्यानचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये रोहित शर्मा आणि शेन बॉन्ड आहेत.

शेन बॉन्डने मागून येत रोहितला किस करणार असल्याची अ‍ॅक्शन केली. रोहितला मागे कोणीतरी असल्याचे जाणवताच तो लगेच वळला आणि हसत हसत त्याने शेन बॉन्ड यांची गळाभेट घेतली. रोहित कर्णधार असताना बॉन्ड हे मुंबई संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यामुळे या दोघांमध्येही खूप घट्ट मैत्री आहे. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या दोघांच्या व्हीडिओला काही नाती अनमोल असतात, असे कॅप्शन दिले आहे. या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट्स, लाइक्सचा वर्षाव केला आहे.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
After Virat Kohli Fight why Gautam Gambhir fiercely argue With Umpire
विराट कोहलीचा वाद संपेपर्यंत गौतम गंभीर भडकला; श्रेयसने इशारा करताच पंचांशी भिडला, पण झालं काय? पाहा Video
What Aditya Thackeray Said?
“एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, त्यानंतर मातोश्रीवर आले आणि..”, आदित्य ठाकरेंचा दावा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Rohit Sharma Yashasvi Jaiswal Emotional Video With Vadalvat Title Song
रोहित शर्मा व यशस्वीचा Video पाहून मराठी प्रेक्षक भावुक; ‘हे’ शब्द ऐकून म्हणाले, “भावा मन जिंकलंस”, तुम्हीही बघा
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Rohit Sharma Praised and Hugs Yashasvi Jaiswal After Century Video Viral MI vs RR IPL 2024
IPL 2024: ‘गार्डनमध्ये फिरणाऱ्या मुला’च्या शतकानंतर रोहितने मैदानातच घेतली गळाभेट, यशस्वीने रोहितला पाहताच… VIDEO व्हायरल
Hardik Pandya Mental Health Going Bad Due to IPL 2024 Booing Abuses In Stadium
“हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय, तो तणावाचा..”, IPL मधील शिवीगाळ, ट्रोलिंग पाहून माजी सलामीवीराची माहिती

शेन बाँड हे २०१५ ते २०२३ पर्यंत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक होते, त्यांचे आणि रोहितचे बॉन्डिंग खूप घट्ट आहे. २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये मुंबईने आयपीएलचे जेतेपद पटकावले तेव्हा मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड होते. आयपीएलमध्ये मुंबईची आतापर्यंतची कामगिरी खूपच खराब झाली आहे.

मुंबई इंडियन्सने आणखी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये कोचिंग स्टाफने त्यांच्या खेळाडूंचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, ते इतरांसोबत कसे राहतात, संघासोबत कसे असतात; याबद्दल सांगितले. या व्हीडिओमध्ये मार्क बाऊचर यांनी सांगितले की, रोहित शर्मा हा पार क्वचितच खेळाडू किंवा इतरांना हात मिळवतो, गळाभेट घेतो. रोहित सहसा कोणाची गळाभेट घेत नाही, असे त्यांनी या व्हीडिओमध्ये म्हटले.

आयपीएलमध्ये मुंबईची आतापर्यंतची कामगिरी खराब राहिली आहे. मात्र संघ सावरत असून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या तीन सामन्यांतील लाजिरवाण्या कामगिरीमुळे संघ क्रिकेट चाहते आणि दिग्गजांच्या निशाण्यावर होता. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. संघाने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात अव्वल असल्याचे प्रत्येक सामन्यात दाखवून दिले आहे.