MS Dhoni’s Wife Sakshi Makes a Special Request to Chennai Super Kings : आयपीएल २०२४ मधील ४६ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला. चेन्नईच्या होम ग्राउंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना पार पडला. दरम्यान, चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी तिच्या मैत्रिणीसह हा सामना पाहण्यासाठी पोहोचली होती. या सामन्यादरम्यान साक्षी धोनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे; जी आता खूप व्हायरल होतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पोस्टमधून साक्षीने चेन्नई सुपर किंग्जच्या टीमला एक खास विनंती केली आहे; जी चेन्नईच्या खेळाडूंनीदेखील पूर्ण केली. साक्षीची ही इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

साक्षीने इन्स्टाग्राम स्टोरीतून केली ‘अशी’ मागणी

साक्षी धोनीने इन्स्टाग्राम स्टोरी चेन्नई टीमला टॅग करून लिहिले की, चेन्नई सुपर किंग्ज आजची मॅच कृपया लवकर संपवा. बाळ येणार आहे, कॉन्ट्रॅक्शन सुरू झालंय, अशी होणाऱ्या मावशी तुम्हाला विनंती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चेन्नई संघाने वेळेपूर्वीच मॅच संपवली आणि सनरायजर्स हैदराबादचा पराभवही केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने २१२ धावा केल्या. त्या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १९ व्या षटकात १३५ धावांवरच मर्यादित राहिला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने ९८ धावांची खेळी केली; पण त्याचे शतक दोन धावांनी हुकले. तुषार देशपांडेने सामन्यात चार विकेट घेत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात ऋतुराजने ५४ चेंडूंत ९८ धावांची खेळी केली आणि डॅरिल मिशेलबरोबर १०७ धावांची भागीदारी केली. दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे चेन्नई संघाने २१२ धावा केल्या. तर, देशपांडेने सामन्यात अवघ्या २७ धावा देत चार विकेट घेतल्या. तर पथिरानाने १७ धावांच्या बदल्यात दोन बळी मिळवले. अशा प्रकारे सर्व खेळांडूच्या मदतीने चेन्नईने ७८ धावांनी विजय मिळवीत पुन्हा एकदा गुणतालिकेत हैदराबादला मागे टाकले,

या विजयासह पाच वेळा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईचे १० गुण झाले आहेत. चेन्नईचा पुढील सामना बुधवारी पंजाब किंग्जशी होणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 sakshi dhoni urges to chennai super kings to finish match fast against sun risers hydrabad and said baby is on the way sjr