हैदराबादचे बडे बडे फलंदाज जिथे फेल झाले तिथे २० वर्षीय खेळाडूने ६४ धावांची वादळी खेळी केली. अनेकांसाठी अपरिचित असलेल्या नितीश रेड्डीने ३७ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी करत संघाला सामन्यात परत आणले आणि मोठी धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका बजावली. या खेळीत त्याने चार चौकार आणि पाच गगनचुंबी षटकार ठोकले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या नितीश रेड्डीचे हे आयपीएल पहिलेच अर्धशतक होते.

नितीशला अब्दुब समदने १२ चेंडूत २५ धावा करत चांगली साथ दिली. सहाव्या विकेटसाठी दोघांमध्ये अवघ्या २० चेंडूत ५० धावांची भागीदारी झाली. त्यामुळे हैदराबादला निर्धारित २० षटकात ९ बाद १८२ धावा करता आल्या.

MS Dhoni avoided shaking hands with RCB players after defeat
IPL 2024 : आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्यानंतर धोनीचा शोध घेतानाचा विराट कोहलीचा VIDEO व्हायरल
KL Rahul Statement on Rohit sharma and Sunil Shetty
IPL 2024: “सासऱ्यांसोबत शर्माजींच्या मुलाला…”, मुंबईच्या पराभवानंतर केएल राहुलने रोहित आणि सुनील शेट्टीची घेतली फिरकी
Sanju Samson Completes 3000 Runs At Number 3 position
IPL 2024: १८ धावांच्या खेळीतही संजू सॅमसन चमकला, सुरेश रैनानंतर हा पराक्रम करणारा दुसरा फलंदाज; तर राजस्थानसाठी…
Virat Umpire's Verbal fight during RCB vs DC match
RCB vs DC : लाइव्ह मॅचमध्ये विराट कोहलीने अंपायरशी घातला वाद, जाणून घ्या काय होतं नेमकं कारण?
Rajasthan Royals Owner Hit Ross Taylor In IPL 2011
IPL 2024 : राहुलच नाही तर रॉस टेलरही संघ मालकाच्या रोषाचा ठरलाय बळी, शून्यावर आऊट झाल्यानंतर उचलला होता हात
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
KKR vs DC : सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय, दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेट्सनी चारली धूळ
Good news for LSG team Mayank Yadav available for match against Mumbai
Mayank Yadav : लखनऊसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी झाला फिट
Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

कोण आहे हा नितीश रेड्डी?

नितीशकुमार रेड्डी हा अवघ्या २० वर्षांचा अनकॅप्ड खेळाडू आहे, जो आंध्राकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळतो. २६ मे २००३ साली जन्मलेला नितीश पुढील महिन्यात २१ वर्षांचा होणार आहे. नितीश तडाखेबंद खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो. तो वेगवान गोलंदाज असून विकेटकीपिंगही करतो. त्याने आंध्र प्रदेशसाठी १७ प्रथम-श्रेणी सामने खेळले असून एक शतक आणि दोन अर्धशतकांसह २०.९६ च्या सरासरीने ५६६ धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने २२.९६ च्या सरासरीने ५२ विकेट्सही घेतल्या आहेत.

दुसऱ्याच सामन्यात चमकला नितीश

यंदाच्या आयपीएल मोसमातील हा त्याचा दुसरा सामना होता. यापूर्वी, ५ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ ८ चेंडूत नाबाद १४ धावा केल्या आणि ११ चेंडू शिल्लक ठेवत संघाला विजय मिळवून दिला. आयपीएल २०२३ मध्ये त्याला फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. संघाने त्याचा गोलंदाज म्हणून वापर केला, पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

नितीशच्या वडिलांनी आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी नोकरी सोडून नितीशच्या कारकिर्दीला आकार दिला. आता त्यांच्या या मेहनतीचं फळ मिळत आहे. भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज आणि आंध्र प्रदेशचा माजी कर्णधार हनुमा विहारी याने सोशल मीडियावर नितीशच्या खेळीचे कौतुक केले. या अष्टपैलू खेळाडूच्या टी-२० कारकिर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएल २०२३ पूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते.