IPL 2025 LSG vs GT Highlights: लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पार पडला. हा सामना गुजरात टायटन्स संघासाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात लखनऊने गुजरात टायटन्स संघासमोर विजयासाठी २३६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला २०२ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह गुजरातने हा सामना ३३ धावांनी गमावला आहे.
GT vs LSG Live: होम ग्राऊंडवर गुजरातला नमवत लखनऊचा दमदार विजय
गुजरात टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी २३६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातचा डाव २०२ धावांवर आटोपला आहे. यासह लखनऊने हा सामना ३३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.
GT vs LSG Live: गुजरातला चौथा धक्का! आक्रमक फलंदाज रुदरफोर्ड परतला तंबूत
गुजरात टायटन्सला आव्हानाच्या अगदी जवळ पोहोचवणारा रुदरफोर्ड ३८ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
GT vs LSG Live: गुजरातला विजयासाठी ३० चेंडूत ७१ धावांची गरज
गुजरातला ३ मोठे धक्के बसल्यानंतर रुदरफोर्ड आणि शाहरूख खानने मिळून संघाचा डाव सांभाळला आहे. गुजरातला ३० चेंडूत ७१ धावांची गरज आहे.
GT vs LSG Live: शुबमन गिलचं पॅकअप! गुजरातला दुसरा मोठा धक्का
गुजरात टायटन्स संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार शुबमन गिल ३५ धावा करून तंबूत परतला आहे.
GT vs LSG Live: गुजरातला पहिला धक्का! साई सुदर्शन परतला तंबूत
गुजरात टायटन्सला पहिला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन २१ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
GT vs LSG Live: मार्शचं शतक, पुरनची वादळी अर्धशतकी खेळी! लखनऊने गुजरातसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. या आमंत्रणाचा स्विकार करत लखनऊच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या डावात लखनऊने २० षटकांअखेर २ गडी बाद २३५ धावा केल्या आहेत.
GT vs LSG Live: मिेचेल मार्शची शतक झळकावल्यानंतर बाद
मिचेल मार्शने या डावात फलंदाजी करताना ११७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने लखनऊला २०० पार पोहोचवलं.
GT vs LSG Live: निकोलस पूरनचं अर्धशतक पूर्ण
या डावात मिचेल मार्शने शतक पूर्ण केल्यानंतर निकोलस पूरनने अवघ्या २३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
GT vs LSG Live: मिचेल मार्शचं वादळी शतक! गुजरातच्या गोलंदाजांना धू धू धुतलं
सलामीला फलंदाजीला आलेल्या मिचेल मार्शने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने ५७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे.
GT vs LSG: राशिद खानच्या एकाच षटकात कुटल्या २५ धावा
राशिद खानच्या षटकात मिचेल मार्शने चांगलाच हल्लाबोल केला. मार्शने राशिदच्या पहिल्याच षटकात २५ धावा कुटल्या.
GT vs LSG: लखनऊ सुपर जायंट्सला पहिला मोठा धक्का
मिचेल मार्श आणि एडन मार्करमने संघाला दमदार सुरूवात करून दिली होती. मात्र मार्करम ३६ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
GT vs LSG: मिचेल मार्शचं अर्धशतक पूर्ण
या सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या अर्शद खानने दमदार सुरूवात केली आहे. मार्शने ३३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
GT vs LSG Live: लखनऊची दमदार सुरूवात! मार्श- मार्करमची जोडी जमली
या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सने दमदार सुरूवात केली आहे. सलामीला आलेल्या मिचेल मार्श आणि एडेन मार्करमने ८ षटकात ७१ धावा चोपल्या आहे.
गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. अरशद खान दुखापतग्रस्त झाला आहे.
या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनऊ सुपर जायंट्स (Playing XI):
मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टिरक्षक/कर्णधार), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओ'रूर्के
गुजरात टायटन्स (Playing XI):
शुभमन गिल (कर्णधार), जॉस बटलर (यष्टिरक्षक), शेर्फेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, अर्शद खान, रविस्रीनिवासन साई किशोर, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा