IPL 2025 Mega Auction Most Expensive Foreigner Player : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १८ व्या हंगामाची तयारी आधीच सुरू झाली आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयपीएल २०२५ च्या आधी एक मेगा ऑक्शन होणार आहे. हा मेगा ऑक्शन २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये रिटेन न केलेल्या सर्व खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. या लिलावात ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांसारखी अनेक मोठी नावेही या लिलावात दिसणार आहेत. मात्र, या लिलावात कोणत परदेशी खेळाडू सर्वात महागडा ठरु शकतो? जाणून घेऊया.

परदेशी खेळाडूंमध्ये, जोस बटलर, फिल सॉल्ट, क्विंटन डी कॉक, मिचेल स्टार्क आणि जोफ्रा आर्चर ही काही मोठी नावे आहेत, ज्यांना चांगली बोली लागू शकते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका परदेशी खेळाडूबद्दल सांगणार आहोत, जो सध्या बॅट आणि बॉलने मैदाना धुमाकूळ घालत आहे आणि मेगा ऑक्शनमध्ये विकला सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनू शकतो. तो धडाकेबाज परदेशी खेळाडू कोण आहे? जाणून घेऊया.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

गेराल्ड कुत्सियावर लावली जाऊ शकते करोडोंची बोली –

२४ वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू गेराल्ड कुत्सियाला आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये चांगले पैसे मिळू शकतात. कुत्सिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो बॅट आणि बॉल दोन्हीने दमदार कामगिरी करत आहे. सध्या तो भारताविरुद्ध चा सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये कुत्सियाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

हेही वाचा – Wasim Akram : तब्बल ५५ हजारात कापले मांजरीचे केस! बिल पाहून वसीम अक्रम चकित; म्हणाला, ‘इतक्या पैशात तर पाकिस्तानात…’, पाहा VIDEO

पहिल्या टी-२० सामन्यात शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीला येत २३ धावा केल्या होत्या आणि ३ विकेट्स देखील घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात जेव्हा दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्स गमावल्या होत्या आणि सामना हरणार असे वाटत होते, तेव्हा गेराल्ड कुत्सियाने आपली ताकद दाखवत संघासाठी नाबाद १९ धावा करून सामना जिंकून दिला. गोलंदाजीत त्याने एक विकेटही घेतली. कुत्सियाचा अलीकडचा फॉर्म पाहता, आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये त्याला चांगले पैसे मिळू शकतात, असे दिसते.

हेही वाचा – IND vs AUS : ‘तो फक्त २३ वर्षांचा आहे, पण…’, टिम पेन भारताच्या युवा खेळाडूच्या फलंदाजीने प्रभावित; म्हणाला, ‘तो ऑस्ट्रेलियन चाहत्यांना…’

मुंबई इंडियन्सकडून खेळलाय आयपीएल –

आयपीएल २०२४ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने गेराल्ड कुत्सियाला ५ कोटी रुपये देऊन करारबद्ध केले होते. अशा प्रकारे गेल्या मोसमात कोएत्झीनेही या स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने एकूण १० सामने खेळताना १३ विकेट्स घेतल्या होता. मात्र, आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केले आहे. त्यामुळे यंदाच्या मोठ्या लिलावात कोण खरेदी करणा हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader