IPL 2025 Chennai Super Kings Full Squad and Sold Players List : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नई सुपर संघाने आयपीएल २०२५ च्या महालिलावात जुना सहकारी रवीचंद्रन अश्विनला ताफ्यात सामील केलं आहे. आयपीएलच्या सुरुवातीला अश्विन चेन्नई सुपर किंग्जचाच भाग होता. चाळिशीकडे झुकलेल्या अश्विनसाठी चेन्नईने ९.७५ कोटींची बोली लावली. संपूर्ण संघ कसा आहे? जाणून घेऊया.

लिलावाच्या पहिल्या सत्रात शांत असणाऱ्या चेन्नईने त्यांचा भरवशाचा यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवेला संघात समाविष्ट केलं. रचीन रवींद्रसाठी त्यांनी राईट टू मॅचचा अधिकार वापरला. स्फोटक खेळींसाठी प्रसिद्ध राहुल त्रिपाठीलाही त्यांनी संघात घेतलं. तब्बल १० कोटी रुपये खर्चून चेन्नईने अफगाणिस्तानचा युवा डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमदला ताफ्यात घेतलं आहे. चेन्नईने खलील अहमद या उंचपुऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजावरही विश्वास ठेवला आहे. मूळच्या तामिळनाडूच्याच विजय शंकरला चेन्नईने घेतलं आहे.

Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Ravindra Jadeja too go out If Varun Chakravarty Gets Picked Aakash Chopra on Champions Trophy 2025 Squad
Champions Trophy 2025 : ‘या’ फिरकीपटूमुळे रवींद्र जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून होणार बाहेर? माजी भारतीय खेळाडूचं मोठं वक्तव्य
New Zealand announces 15 member squad led by Mitchell Santner for Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन नव्हे तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार धुरा

हेही वाचा – IPL Auction 2025: १२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?

चेन्नई सुपर किंग्जने पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. ज्यामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिश पाथिराना, शिवम दुबे आणि एमएस धोनी यांचा समावेश आहे. चेन्नईने रवींद्र जडेजाला १८ कोटी रुपये दिले आहेत. ऋतुराज गायकवाडलाही १८ कोटींना कायम ठेवण्यात आले आहे. मथिश पाथिरानाला १३ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. शिवम दुबेला १२ कोटी आणि धोनीला ४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संघाकडे लिलावात उतरण्यापूर्वी ५५ कोटी रुपये शिल्लक होते.

हेही वाचा – IPL 2025 : BCCI कडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर? IPL 2025 ‘या’ दिवशी सुरू होणार

चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ :

एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, ऋतुराज गायकवाड, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद

Story img Loader