IPL 2025 Mega Auction Unsold Players List : आयपीएल २०२५ चा दोन दिवसीय मेगा लिलाव पार पडला आहे. या दोन दिवसाच्या कालावधीत, सर्व फ्रँचायझी संघांनी त्यांच्या आवडत्या खेळाडूंवर बोली लावून त्यांना आपल्या संघात सामील करुन घेतले. या मेगा लिलावात सर्व १० संघांनी एकूण १८२ खेळाडूंना खरेदी केले. तसेच ३९५ खेळाडूंवर कोणत्याही संघाने बोली लावली नसल्याने ते अनसोल्ड राहिले. या अनसोल्ड यादीत काही दिग्गज खेळाडूंचाही समावेश असल्याने सर्वांना धक्का बसला.

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंमध्ये, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन, जॉनी बेअरस्टो, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकुर, मुस्तफिजुर रहमान, नवीन उल हक यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आयपीएल २०२५ च्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंची यादी :

  • केन विल्यमसन- मूळ किंमत- २ कोटी रुपये
  • स्टीव्ह स्मिथ- मूळ किंमत- २ कोटी रुपये
  • जॉनी बेअरस्टो- मूळ किंमत- २ कोटी रुपये
  • डॅरिल मिशेल- मूळ किंमत- २ कोटी रुपये
  • डेव्हिड वॉर्नर- मूळ किंमत- २ कोटी रुपये
  • शार्दुल ठाकूर- मूळ किंमत- २ कोटी रुपये
  • मुस्तफिजुर रहमान- मूळ किंमत- २ कोटी रुपये
  • शाई होप – मूळ किंमत- १.२५ कोटी रुपये
  • मयंक अग्रवाल- मूळ किंमत- १ कोटी रुपये
  • पृथ्वी शॉ- मूळ किंमत- ७५ लाख रुपये
  • सर्फराझ खान- मूळ किंमत- ७५ लाख रुपये
  • केशव महाराज- मूळ किंमत- ७५ लाख रुपये
  • नवदीप सैनी- मूळ किंमत- ७५ लाख रुपये
  • ज्युनियर एबी- मूळ किंमत- ७५ लाख रुपये
  • शिवम मावी- मूळ किंमत- ७५ लाख रुपये

ऋषभ पंत ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू :

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा सर्वात महागडा ठरला आहे. पंतला लखनौ सुपर जायंट्सने विक्रम २७ कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय भारताचा श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटींमध्ये घेतले. कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. हे तिन्ही खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधारही होऊ शकतात, असे मानले जात आहे.

हेही वाचा – Pakistan Cricket Team : पाकिस्तान संघ भगव्या टोप्या घालून उतरला मैदानात, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

वैभव सूर्यवंशी ठरला सर्वात तरुण करोडपती खेळाडू :

बिहारमधील १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी याचं नाव लिलावात समोर आलं तेव्हा संपूर्ण जगाला धक्का बसला. या अवघ्या १३ वर्षांच्या खेळाडूमध्ये अनेक संघांनी रस दाखवला. अखेर राजस्थान रॉयल्सने वैभवला १.१० कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासात लिलावात विकला जाणारा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याशिवाय तो आयपीएलचा सर्वात तरुण करोडपती ठरला आहे.

Story img Loader