IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Match Highlights: वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अखेरच्या षटकात गुजरात टायटन्सनने सामना जिंकत ३ विकेट्सने मुंबईला मात दिली. या विजयासह गुजरातचा संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे. संघाचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत.

Live Updates
00:34 (IST) 7 May 2025
MI vs GT Live: दीपक चहर गोलंदाज, तेवतिया स्ट्राईकवर

मुंबई वि. गुजरात सामन्याला पावसानंतर पुन्हा सुरूवात झाली आहे. ६ चेंडूत १५ धावांची गरज होती. दीपक चहर गोलंदाज आहे तर राहुल तेवतिया आणि गेराल्ड कुत्सिया फलंदाजी करत आहेत. चहरच्या पहिल्या चेंडूवर तेवतियाने चौकार लगावला आणि मुंबईला स्लो ओव्हर रेटचा फटका बसल्याने ५ फिल्डर आत असणार आहेत. तिसऱ्या चेंडूवर कुत्सियाने षटकार लगावला आहे. चौथ्या चेंडू नो बॉल टाकल्याने फ्री हिट होती. चौथ्या चेंडूवर तेवतियाने १ धाव घेतली. पाचव्या चेंडूवर कुत्सिया झेलबाद झाला. सहाव्या चेंडूवर १ धावेची गरज आहे. अरशदने चेंडू मारला खरा पण हार्दिकचा डायरेक्ट हिट चुकला आणि गुजरातचा संघ सामना ३ विकेट्सने जिंकला.

00:27 (IST) 7 May 2025
MI vs GT Live: सामना पुन्हा सुरू होणार

मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स सामना १२.३० वाजता सुरू होणार आहे. १९ षटकांचा सामना खेळवला जाईल. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्या किंवा दीपक चहर गोलंदाजी करताना दिसेल.

00:14 (IST) 7 May 2025
MI vs GT Live: १९ षटकांचा सामना

पाऊस अजूनही सुरू असून सामन्यातील एक षटक कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जर १९ षटकांचा सामना खेळवला गेला, तर गुजरातला १४७ धावांचे आव्हान मिळेल आणि १९ षटकांचा सामना होण्यासाठी कट ऑफ टाईम १२.३० आहे. १९ षटकांचा सामना झाला तर गुजरातला ६ चेंडूत १५ धावांचे आव्हान मिळेल.

23:52 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: पावसामुळे पु्न्हा सामना थांबला

मुंबईत पावसाने ४ षटकांचा सामना झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. ४ षटकांत बुमराहने २, बोल्टने १ आणि अश्वनीने १ विकेट घेत गुजरातला सामन्यात मागे ढकललं. डीएलएसनुसार १८ षटकांनंतर १३६ धावसंख्या असणं गरजेचं होतं. पण गुजरातच्या संघाने १८ षटकांत ६ बाद १३२ धावा केल्या आहेत. अशारितीने मुंबईचा संघ ४ धावांनी पुढे आहे.

23:47 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: सहावी विकेट

सामन्यातील १८वे षटक टाकण्याची जबाबदारी युवा गोलंदाज अश्वनी कुमारच्या खांद्यावर देण्यात आली. त्याने पहिला चेंडू टाकला आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने राशिद खानला चकित करत एलबीडब्ल्यू बाद केलं. रिव्ह्यू घेतल्यानंतर चेंडू स्टम्प्सवर जाऊन आदळल्याचे दिसले. यासह मुंबईला सहावी विकेट मिळाली.

23:41 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: शाहरूख खान क्लीन बोल्ड

जसप्रीत बुमराहला १७वे षटक टाकण्यासाठी पाचारण केले. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर शाहरूख खानने चौकार लगावला. पण परिणामी चौथ्या चेंडूवर शाहरूख खान क्लीन बोल्ड झाला आणि मुंबईला पाचवी विकेट मिळाली. यासह आता गुजरातला १८ चेंडूत ३१ धावांची गरज आहे.

23:32 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: बोल्टने रूदरफोर्डला केलं बाद

जसप्रीत बुमराहने गिलला बाद केल्यानंतर १६व्या षटकात बोल्टने रूदरफोर्डला बाद करत माघारी धाडलं. तिसऱ्या चेंडूवर LBW बाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. गुजरातचे दोन्ही सेट फलंदाज माघारी परतले आहेत. यासह आता गुजरातला विजयासाठी २४ चेंडूत ३८ धावांची गरज आहे.

23:25 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: शुबमन गिल क्लीन बोल्ड

पाऊस संपल्यानंतर सामन्याला पुन्हा सुरूवात झाली आणि जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. गिलने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला नंतर पुढच्या दोन चेंडूवर १-१ धाव घेतली आणि अखेर पाचव्या चेंडूवर गिलला क्लीन बोल्ड केलं.

23:13 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: कधी सुरू होणार सामना?

मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्सचा सामना पावसामुळे थांबवण्यात आला होता. पण आता पाऊस थांबला असून ११.२० ला सामना परत सुरू होणार आहे. यासह आता गुजरातला विजयासाठी ३६ चेंडूत ४९ धावांची गरज आहे.

22:55 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: गुजरात विजयाच्या दिशेने

अश्वनी कुमारच्या १४व्या षटकात १३ धावा दिल्याने गुजरात टायटन्सचा संघ डीएलएसनुसार पुढे आहे. १४ षटकांनंतर ९९ धावांची गरज होती, पण गुजरातचा संघ २ बाद १०७ धावांवर आहे. यासह गुजरातचा संघ ७ धावांनी पुढे आहे. यासह आता मैदानात पावसाला सुरूवात झाली आहे आणि मैदानावर कव्हर्स आले आहेत.

22:43 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: तिलक वर्माने झेल सोडला पण पुढच्या चेंडूवर मिळाली विकेट

१२व्या षटकात अश्वनी कुमारच्या दुसऱ्या चेंडूवर गिलने मोठा फटका खेळला पण चेंडू हवेत उंच गेला, झेलबाद होणारच होता, पण तिलककडून झेल सुटला. पण पुढच्याच चेंडूवर अश्वनी कुमारने बटलरला विकेटच्या मागे झेलबाद केलं. यासह आता ५१ चेंडूत गुजरातला ७८ धावांची गरज आहे.

22:36 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: १० षटकं

१० षटकांत गुजरात टायटन्सने १ बाद ६८ धावा केल्या आहेत. याप्रमाणे गुजरातचा संघ डीएलएसप्रमाणे १ धावेने पुढे आहे. हार्दिकने ८व्या षटकात १८ धावा दिल्याने गुजरातच्या संघाला पुढे जाण्याची संधी मिळाली. याचबरोबर गिल आणि बटलरची जोडी मैदानात स्थिरावली असून दोघांनी ७० धावांची भागीदारी रचली आहे.

22:33 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: अश्वनी कुमार कनक्शन सबस्टीट्यूट

रायन रिकल्टनला अखेरच्या षटकात हेल्मेटवर चेंडू लागल्याने तो सामन्याबाहेर झाला आहे. त्यामुळे कनक्शन सबस्टीट्यूट म्हणून अश्वनी कुमार लाईक अलाईक सबस्टीट्यूट म्हणून मैदानावर आला आहे.

22:28 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: हार्दिक पंड्याचं १० चेंडूचं षटक

हार्दिक पंड्या ८व्या षटकात स्वत: गोलंदाजीला आला. पण त्याने तब्बल १८ धावांचं मोठं षटक टाकलं. ज्यामध्ये त्याने ३ वाईड तर २ नो बॉल टाकले. नो बॉलच्या फ्री हिटवरही हार्दिकने वाईड बॉल टाकला. यासह गुजरातने या षटकात १८ धावा केल्या. गुजरातने यासह ८ षटकांत १ बाद ५८ धावा केल्या आहेत. यासह गुजरातला विजयासाठी ७२ चेंडूत ९८ धावांची गरज आहे.

22:11 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: पॉवरप्ले

गुजरात टायटन्सने पॉवरप्लेमध्ये १ बाद २९ धावा केल्या आहेत. बोल्ट आणि बुमराहने भेदक गोलंदाजी करत गुजरातच्या धावांवर ब्रेक लावला आहे.

22:06 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: मुंबई सामन्यात एक पाऊल पुढे

बोल्ट आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरातला ५ षटकांत १ बाद २१ धावाच करू दिल्या आहेत. यासह ५ षटकांच्या सामन्याप्रमाणे गुजरातला मुंबईच्या पुढे जाण्यासाठी ५ षटकांत ३४ धावा करण्याची गरज होती, जे गुजरात पूर्ण शकलेलं नाही. वानखेडेच्या मैदानावर अजूनही वादळी वारा सुरूच आहे.

21:58 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: मुंबईत वादळी वारा आणि पाऊस

मुंबईला आज यलो अलर्ट दिल्याने वादळी वारा आणि पावसाचं चिन्ह आहे. मैदानावर पावसाचं चिन्ह आहे. जर पावसाला सुरूवात झाली आणि सामना थांबवला, तर तोपर्यंत ५ षटकांचा सामना झाला असेल तर गुजरातला ५ षटकांत सामना जिंकण्यासाठी ३४ धावा करण्याची गरज आहे.

21:50 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: साई सुदर्शन झेलबाद

पहिल्या षटकात चहरने चांगली गोलंदाजी करत ६ धावा दिल्या. तर दुसऱ्या षटकात दुसऱ्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने साई सुदर्शनने झेलबाद केलं. सुदर्शनच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि मुंबईला पहिली विकेट मिळाली. यासह गुजरातने २ षटकांत १ बाद ९ धावा केल्या आहेत. मुंबईला यलो अलर्ट असल्याने मैदानावर वादळी वारा सुरू आहे.

21:25 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: मुंबईने दिलं इतक्या धावांचं लक्ष्य

मुंबई इंडियन्सने मधल्या षटकात धावांसाठी झगडतानाही कार्बिन बॉश आणि चहरच्या काही फटक्यांच्या जोरावर मुंबईने १५० धावांचा टप्पा पार केला आणि ८ विकेट्स गमावत १५५ धावा केल्या आहेत. कार्बिन बॉशने अखेरच्या षटकात पहिल्या २ चेंडूवर २ षटकार लगावले तर दीपक चहरने अखेरच्या चेंडूवर एक चौकार लगावला. यासह मुंबईने अखेरच्या षटकात १८ धावा कुटल्या आणि गुजरातला विजयासाठी १५६ धावांचे योगदान दिले.

21:23 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: कार्बिन बॉश धावबाद

अखेरच्या षटकातील पहिल्या २ चेंडूंवर षटकार लगावत कार्बिन बॉशने मुंबईला १५० धावांपर्यंत नेले. पण चौथ्या चेंडूवर २ धावा घेताना बॉश झेलबाद झाला.

21:12 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: नमन धीर झेलबाद

संघाला धावांची गरज असताना नमन धीरने पूल मारत थेट फिल्डरच्या हातात झेल दिला आणि आपली विकेट सहज गमावली. १७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने त्याला झेलबाद केलं. यासह मुंबईने १८ षटकांत ७ बाद १२९ धावा केल्या आहेत.

20:53 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: तिलक वर्मा झेलबाद

सूर्यकुमार, विल जॅक्स, हार्दिक बाद झाल्यानंतर आता तिलक वर्माही झेलबाद झाला आहे. गेराल्ड कुत्सियाने येताच त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली आहे. कुत्सियाने १४व्या षटकात तिलक वर्माला झेलबाद करत मुंबईला मोठा धक्का दिला आहे. यासह गुजरातने सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं आहे. यासह मुंबईने १४ षटकांत ६ बाद ११४ धावा केल्या आहेत.

20:41 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: हार्दिक पंड्या झेलबाद

साई किशोरने १३व्या षटकात हार्दिक पंड्याला १ धावा करत झेलबाद करत माघारी धाडलं आहे. यासह मुंबईने ३ षटकांत ३ मोठ्या विकेट गमावल्या आहेत.

20:38 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: विल जॅक्स झेलबाद

राशिद खानने १२व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं आणि रिव्ह्यू घेतला, पण यासह गुजरातने २ रिव्ह्यू गमावले आहेत. यानंतर जॅक्स चौथ्या चेंडूवर अखेरीस झेलबाद झाला. विल जॅक्सने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या आहेत.

20:30 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: सूर्यकुमार यादव झेलबाद

विल जॅक्सच्या अर्धशतकानंतर पुढच्याच चेंडूवर साई किशोरने ११व्या षटकात सूर्यकुमार यादवला झेलबाद केलं. सूर्यकुमार यादव मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. सूर्या बाद होण्यापूर्वी महत्त्वपूर्ण २४ चेंडूत ५ चौकारांसह ३५ धावा केल्या आहेत. मुंबईने ११ षटकांत ३ बाद ९९ धावा केल्या आहेत.

20:28 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: विल जॅक्सचे शानदार अर्धशतक

विल जॅक्सने २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह सूर्याबरोबर त्याने ४३ चेंडूत ७१ धावांची भागीदारी केली. विल जॅक्सचे हे मुंबई इंडियन्ससाठी पहिले अर्धशतक आहे.

20:27 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: विल जॅक्स, सूर्या थोडक्यात वाचले

१०व्या षटकात रशीद खान गोलंदाजीला आला. त्याच्या षटकात आधी विल जॅक्ससाठी रिव्ह्यू घेण्यात आला पण तो अंपायर्स कॉल होता आणि बॉल आऊटसाईड पिच होता आणि विकेट्सला हिट करत नसल्याने विल जॅक्स वाचला. तर पुन्हा पाचव्या चेंडूवर सूर्यासाठी देखील एलबीडब्ल्यूकरता रिव्ह्यू घेण्यात आला. पण सूर्या नाबाद राहिला. यासह मुंबईने १० षटकांत २ बाद ८९ धावा केल्या आहेत.

20:14 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: विल जॅक्स-सूर्याची अर्धशतकी भागीदारी

सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्सने मुंबईने दोन विकेट्स गमावल्यानंतर संघाचा डाव सावरला आहे. यासह या दोघांनी २७ चेंडूत ५० धावांची म्हणजेच अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. यासह मुंबईने ८ षटकांत २ बाद ७६ धावा केल्या आहेत.

20:03 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: पॉवरप्ले

मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये दोन्ही सलामीवीरांची विकेट गमावली. पण सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्सने मुंबईचा डाव सावरला. यासह मुंबईने पॉवरप्लेमध्ये २ बाद ५६ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सने पॉवरप्लेमध्ये तब्बल ३ झेल ड्रॉप केले आहेत. विल जॅक्सला दोन वेळा तर सूर्यकुमार यादवचा एक झेल ड्रॉप केला. यामुळे टाईमआऊटमध्ये संघाचे कोच आशिष नेहरा चांगलाच संतापला होता.

19:50 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: रोहित शर्मा झेलबाद

चौथ्या षटकात मुंबई इंडियन्स संघाचा माजी खेळाडू अरशद खानने रोहित शर्माला तिसऱ्या चेंडूवर झेलबाद केलं. रोहित शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह संघाला पॉवरप्लेमध्ये दुसरा धक्का बसला आहे. यासह मुंबईने ४ षटकांत २ बाद २७ धावा केल्या आहेत.