IPL 2025 MI vs DC Highlights: आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला. मुंबईने या सामन्यातील विजयासह प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी शानदार खेळी करत मुंबईला सामन्यात कायम ठेवले आणि प्रथम फलंदाजी करताना १८० धावा केल्या. तर दिल्लीचा संघ १८.२ षटकांत सर्वबाद झाला आणि मुंबईने विजय मिळवला. जसप्रीत बुमराह आणि सँटरन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या.

Live Updates

IPL 2025 Mumbai Indians vs Delhi Capitals Highlights: आयपीएल २०२५ मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स हायलाईट्स

23:18 (IST) 21 May 2025
MI vs DC Live: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये

जसप्रीत बुमराहने १९व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर मुस्तफिजूर रहमानला क्लीन बोल्ड करत दिल्ली कॅपिटल्सला ऑल आऊट केलं. यासह मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी क्वालिफाय होणारा चौथा संघ ठरला. यासह दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

23:14 (IST) 21 May 2025

MI vs DC Live: नववी विकेट

कर्ण शर्माने १८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कुलदीप यादवला झेलबाद करत संघाला नववी विकेट मिळवून दिली.

23:04 (IST) 21 May 2025

MI vs DC Live: बुमराहने केलं क्लीन बोल्ड

१६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने नवा खेळाडू माधव तिवारीला पदार्पणाच्या सामन्यात क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. दिल्लीला विजयासाठी ३० चेंडूत ७५ धावांची गरज आहे.

23:01 (IST) 21 May 2025
MI vs DC Live: एका षटकात २ विकेट

१५व्या षटकात मिचेल सँटनर पुन्हा गोलंदाजीला आला आणि सामना मुंबईच्या बाजूने पूर्णपणे वळवला. सँटनरने दुसऱ्या चेंडूवर समीर रिंझवीला क्लीन बोल्ड केलं. जो मैदानावर सेट झालेला फलंदाज होता. रिझवी ६ चौकार आणि एका षटकारासह ३९ धावा करत बाद झाला. तर पाचव्या चेंडूवर आशुतोष शर्मा स्टम्पिंग होत बाद झाला.

22:33 (IST) 21 May 2025
MI vs DC Live: पाचवी विकेट

दहाव्या षटकात जसप्रीत बुमराहने चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सला पायचीत करत संघाला पाचवी विकेट मिळवून दिली. यासह दिल्लीने १० षटकांत ५ विकेट गमावत ६५ धावा केल्या आहेत. बुमराहने 10व्या षटकात फक्त एक धाव दिली.

22:32 (IST) 21 May 2025

MI vs DC Live: सँटनरने मिळवून दिली चौथी विकेट

आठव्या षटकात सँटनरने अखेरच्या चेंडूवर विप्रज निगमला झेलबाद करत संघाला चौथी विकेट मिळवून दिली. विप्रजला सरळ फटका मारायला सँटनरने प्रवृत्त केलं आणि स्वत:च झेल टिपला. यासह ८ षटकांत दिल्लीने ४ बाद ५५ धावा केल्या आहेत.

22:16 (IST) 21 May 2025

MI vs DC Live: पॉवरप्ले

दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्लेमध्ये ३ बाद ४९ धावा केल्या आहेत. विप्रज निगम आणि समीर रिझवी फलंदाजी करत आहेत.

22:12 (IST) 21 May 2025
MI vs DC Live: अभिषेक पोरेल बाद

पाचवे षटक टाकण्यासाठी विल जॅक्सला बोलावण्यात आले. विल जॅक्सने दुसऱ्याच चेंडूवर मुंबईला विकेट मिळवून दिली. विल जॅक्सच्या चेंडूवर अभिषेक पोरेल स्टंपिंग होत बाद झाला. त्याने ६ धावा केल्या होत्या. पण या षटकात विप्रज निगमने येताच दोन चौकार आणि षटकारांसह वादळी फटकेबाजी केली. तर फिल्डिंगच्या चुकीमुळे नो बॉलही देण्यात आला.

21:55 (IST) 21 May 2025

MI vs DC Live: मुंबईची सुसाट सुरूवात! दिल्लीची सलामी जोडी तंबूत

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. फाफ डू प्लेसिस बाद होऊन माघारी परतल्यानंतर केएल राहुलनेही पॅ्व्हेलियनची वाट धरली आहे.

21:50 (IST) 21 May 2025

MI vs DC Live: मुंबईची सुसाट सुरूवात! दिल्लीला पहिला मोठा धक्का

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला पहिला मोठा धक्का बसला आहे. फाफ डू प्लेसिस अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला आहे.

21:26 (IST) 21 May 2025
MI vs DC LIVE: सूर्या नमन धीरची वादळी फटकेबाजी

नमन धीरनंतर सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात वादळी फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या, चौथ्या चेंडूवर षटकार अन् पाचव्या चेंडूवर चौका लगावत २१ धावा करत वादळी फटकेबाजी केली. नमन धीर आणि सूर्यकुमार यादवने अखेरच्या २ षटकांमध्ये ४८ धावा करत वादळी फटकेबाजी केली आणि मुंबईला १८० धावांचा टप्पा गाठून दिला. १८व्या षटकात मुंबई १३२ धावांवर खेळत होती, तर अखेरच्या दोन षटकांत ४८ धावा केल्या.

सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७३ धावा केल्या. तर नमन धीरने ८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावांची शानदार खेळी केली. यासह मुंबईने ५ बाद १८० धावा केल्या आहेत. यासह मुंबईने दिल्लीला विजयासाठी १८१ धावांचं योगदान दिलं.

21:21 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: नमन धीरची बॅट तळपली

मुकेश कुमारच्या १९व्या षटकात सूर्या आणि नमन धीरने मिळून २७ धावा कुटल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर सूर्याने षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर एक धाव घेत नमन धीरला स्ट्राईक दिली. त्यानंतर नमन धीरने चौकार, षटकार, षटकार आणि चौकार खेचत मुंबईच्या धावांमध्ये मोठी भर घातली.

21:15 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: सूर्यकुमार यादवचं अर्धशतक

षटकार आणि सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ५१ धावा करत आपलं अर्धशतक झळकावलं आहे. यासह सूर्याने यंदाच्या मोसमातील आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आहे.

21:00 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: हार्दिक पंड्या स्वस्तात झेलबाद

हार्दिक पंड्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ३ धावा करत झेलबाद झाला. दुष्मंता चमीराने १७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिकला झेलबाद केलं.

20:51 (IST) 21 May 2025
MI vs DC LIVE: सावध फलंदाजीनंतर मुंबईला धक्का

१५व्या षटकात तिलक वर्मा मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. यासह मुंबईला चौथा धक्का बसला आहे. तिलक वर्मा २७ चेंडूत २७ धावा करत बाद झाला. तर १६ षटकांत मुंबईने ४ बाद ११८ धावा केल्या आहेत.

20:47 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: मुंबईच्या १०० धावा पूर्ण

मुंबई इंडियन्सने १४ व्या षटकात १०० धावांचा टप्पा गाठला आहे. यासह सूर्याने या षटकात एक षटकार लगावत धावांमध्ये भऱ घातली. तर सूर्या आणि तिलकने अर्धशतकी भागीदारीही रचली आहे. यासह मुंबईने १४ षटकांत ३ बाद १०८ धावा केल्या आहेत.

20:25 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: 10 षटकांत किती धावा केल्या?

मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या खेळीच्या जोरावर १० षटकांत ३ बाद ८० धावा केल्या आहेत. ३ विकेट गेल्यानंतर फिरकीपटूंनी मुंबईच्या धावांना ब्रेक लावला आहे.

20:11 (IST) 21 May 2025
MI vs DC LIVE: रायन रिकल्टन झेलबाद

कुलदीप यादव आठव्या षटकात गोलंदाजीला आला. या षटकात तिसऱ्या चेंडूवर सूर्याने स्वीप मारला आणि चेंडू हवेत गेला पण फिल्डरपासून लांब पडला आणि सूर्या वाचला. यानंतर पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रिकल्टन सीमारेषेजवळ झेलबाद झाला. यासह ७ षटकांत मुंबईने ३ बाद ६३ धावा केल्या आहेत. कुलदीप यादवला एका महिन्यानंतर विकेट मिळाली आहे, तर या विकेटसह कुलदीपच्या १०० विकेट पूर्ण झाल्या आहेत.

20:03 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: विल जॅक्स झेलबाद

मुंबई इंडियन्सला पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात दुसरा धक्का बसला आहे. विल जॅक्स १९ चेंडूत २१ धावा करत बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विल जॅक्स झेलबाद झाला. यासह मुंबईने पॉवरप्लेमध्ये २ बाद ५४ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने येताच चौकार लगावला.

19:46 (IST) 21 May 2025
MI vs DC LIVE: रोहित शर्मा झेलबाद

सामन्यातील तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी दिल्लीच्या ताफ्यातील नवा खेळाडू मुस्तफिजूर रहमानला देण्यात आले. मुस्तफिजूरने दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माला झेलबाद करत मुंबईला मोठा धक्का दिला आहे. रोहित शर्माच्या बॅटची कड घेत चेंडू विकेटकिपरच्या दिशेने गेला आणि रोहित ५ धावा करत झेलबाद झाला. रोहित पुन्हा एकदा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजासमोर बाद झाला आहे.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1925194381939630527

19:39 (IST) 21 May 2025
MI vs DC LIVE: सामन्याला सुरूवात

रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनची जोडी मैदानावर असून सामन्याला सुरूवात झाली आहे. रोहित शर्माने पहिल्याच षटकात चौकार लगावत सामन्याला सुरूवात केली. तर दुसऱ्या षटकात रायन रिकल्टनने दोन षटकार खेचत संघाच्या धावसंख्येत भर घातली. यासह मुंबईने २ षटकांत २२ धावा केल्या आहेत. वानखेडेच्या मैदानावर रोहित रोहितचा जयजयकार ऐकू येत आहे.

19:33 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: भारतीय जवानांना सलामी

मुंबई वि. दिल्ली सामन्यापूर्वी भारतीय लष्कराला आणि जवानांना ऑपरेशन सिंदूर व भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीतील कामगिरीसाठी खेळाडूंनी राष्ट्रगीत गात सलामी दिली.

19:21 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार

तर केएल राहुल हा सबस्टिट्यूट खेळाडूंच्या यादीत आहे.

19:07 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

रायन रिकेल्टन (विकेटकिपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह</p>

19:04 (IST) 21 May 2025
MI vs DC LIVE: कर्णधार अक्षर पटेल मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना का खेळत नाहीये?

मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार बदलला आहे. कर्णधार अक्षर पटेल गेल्या २-३ दिवसांपासून आजारी आहे, त्याला वायरल फ्लू असून तो आजच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे उपकर्णधार फाफ डू प्लेसिस संघाचं नेतृत्त्व करणार आहे.

19:02 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: नाणेफेक

मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याची नाणेफेक दिल्लीने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचा कर्णधार या सामन्यात बदलला असून उपकर्णधार फाफ डू प्लेसिस संघाचे नेतृत्त्व करणार आहे.

18:35 (IST) 21 May 2025
MI vs DC LIVE: मुंबई-दिल्ली महत्त्वाचा सामना

मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्यावर पावसाचं सावट आहे. तर प्लेऑफच्या दृष्टीने या सामन्याचा निकालही महत्त्वाचा असणार आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी काय समीकरण आहे, वाचा सविस्तर

३ संघ प्लेऑफ ५ टीम स्पर्धेबाहेर, मुंबई-दिल्लीत नॉकआऊट सामना, पण पंजाब किंग्स ठरवणार प्लेऑफचा चौथा संघ? वाचा समीकरण

18:33 (IST) 21 May 2025

MI vs DC LIVE: दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ

अक्षर पटेल (कर्णधार), करुण नायर, हॅरी ब्रूक, जॅक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव

18:32 (IST) 21 May 2025
MI vs DC LIVE: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर

IPL 2025 MI vs DC Highlights: मुंबई इंडियन्सने वानखेडेच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे.