IPL 2025 PBKS vs RCB Highlights: आज मुल्लानपूरमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये क्वालिफायर १ चा सामना पार पडला. हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळेल असं वाटलं होतं. पण, असं काहीच झालं नाही. गोलंदाजीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा डाव १०१ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शानदार विजयाची नोंद करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Qualifier 1 Highlights: पंजाब किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हायलाईट्स
PBKS vs RCB Live: इ साला कप नामदे! पंजाबला नमवत RCBचा चौथ्यांदा IPL फायनलमध्ये प्रवेश
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २०१६ नंतर आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी १०२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पूर्ण करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
PBKS vs RCB Live: सॉल्टचं अर्धशतक
फिल सॉल्टने विराट कोहलीच्या विकेटनंतर संघाचा डाव सावरला. यासह सॉल्टने २३ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांह ५० धावा करत अर्धशतक पूर्ण केलं.
PBKS vs RCB Live: सॉल्ट-मयंकची अर्धशतकी भागीदारी तुटली
पंजाब किंग्सचा इम्पॅक्ट प्लेअर मुशीर खानला आयपीएलमधील पहिली विकेट मिळाली आहे. त्याने मयंक अग्रवालला झेलबाद करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. मयंक १३ चेंडूत १९ धावा करत बाद झाला. यासह आरसीबीला विजयासाठी ७२ चेंडूत १७ धावांची गरज आहे.
PBKS vs RCB Live: पॉवरप्ले
फिल सॉल्टने काईल जेमिसनच्या सहाव्या षटकात २१ धावा करत विराटच्या विकेटचा आणि विकेट मेडन ओव्हरचा व्याजासकट बदला घेतला आहे. यासह आरसीबीने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६१ धावा केल्या.
PBKS vs RCB Live: आरसीबीला पहिला धक्का! विराट कोहली परतला तंबूत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिला धक्का बसला आहे. विराट कोहली स्वस्तात माघारी परतला आहे.
PBKS vs RCB Live: आरसीबीची दमदार सुरूवात! फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी १०२ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी दमदार सुरूवात केली आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांकडून दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेला पंजाबचा संपूर्ण डाव अवघ्या १०१ धावांवर आटोपला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी १०२ धावांची गरज आहे. या सामन्यात गोलंदाजी करताना सुयश शर्मा आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर यश दयालने २, भूवनेश्वर कुमारने १ आणि रोमारीयो शेफर्डने १ गडी बाद केला.
PBKS vs RCB Live: आरसीबीचे गोलंदाज चमकले! पंजाबचा संपूर्ण डाव अवघ्या इतक्या धावांवर आटोपला
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. पंजाब किंग्जचा संपूर्ण डाव अवघ्या १०१ धावांवर आटोपला आहे. आरसीबीला हा सामना जिंकण्यासाठी १०२ धावांची गरज आहे.
PBKS vs RCB Live: पंजाबचे ९ फलंदाज तंबूत! आरसीबी मजबूत स्थितीत
पंजाब किंग्ज संघातील ९ फलंदाज तंबूत परतले आहेत. १३.३ षटकांअखेर पंजाबला ९७ धावा करता आल्या आहेत.
PBKS vs RCB Live: सुयश शर्माच्या फिरकीवर पंजाबच्या फलंदाजांचा नागीण डान्स! पंजाबचे ८ फलंदाज तंबूतसूय
सुयश शर्माच्या फिरकी गोलंदाजीच्या तालावर पंजाबचे फलंदाज अडचणीत सापडले आहे. पंजाबचे ८ फलंदाज तंबूत परतले आहे.
PBKS vs RCB Live: मुशीर खान शून्यावर बाद
मुशीर खान आपला पहिल्याच सामन्यासाठी मैदानात आला. पण तो शून्यावर माघारी परतला आहे.
PBKS vs RCB Live: पंजाबचा विकेट्सचा षटकार! आरसीबीचे गोलंदाज 'ऑन फायर'
पंजाब किंग्ज संघातील ६ फलंदाज तंबूत परतले आहेत.
PBKS vs RCB: पंजाबचा निम्मा संघ तंबूत! आरसीबीचे गोलंदाज 'ऑन फायर'
पंजाब किंग्जचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. नेहाल वढेराही बाद होऊन माघारी परतला आहे. पंजाबला आतापर्यंत अवघ्या ५० धावा करता आल्या आहेत.
PBKS vs RCB Live: जोश इंग्लिश परतला माघारी
पंजाब किंग्जला चौथा धक्का बसला आहे. गेल्या सामन्यातील स्टार फलंदाज जोश इंग्लिश या सामन्यात स्वस्तात माघारी परतला आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी दमदार सुरूवात केली आहे. सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर, श्रेयस अय्यरही स्वस्तात माघारी परतला आहे.
PBKS vs RCB Live: पंजाबची सलामी जोडी तंबूत! आरसीबीची दमदार सुरूवात
पंजाब किंग्ज संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पंजाबची सलामी जोडी तंबूत परतली आहे. प्रियांश आर्या बाद झाल्यानंतर प्रभसिमरन सिंगने काही फटके मारले, पण तो अवघ्या १८ धावांवर माघारी परतला आहे.
आरसीबीला हवी तशी सुरूवात मिळाली आहे. पंजाबचा प्रमुख फलंदाज प्रियांश आर्या अवघ्या ७ धावांवर माघारी परतला आहे.
PBKS vs RCB Live: आरसीबीचा कर्णधार अन् मुख्य गोलंदाज परतला! नाणेफेक जिंकत पंजाबला दिलं फलंदाजीचं आमंत्रण
या महत्वाचा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचा कर्णधार रजत पाटीदार परतला आहे. यासह मुख्य गोलंदाज जोश हेजलवूड देखील या सामन्यासाठी संघात परतला आहे.
PBKS vs RCB Live: कशी असेल दोन्ही संघांची प्लेइग ११?
या सामन्यासाठी अशी असू शकते पंजाब किंग्ज संघाची प्लेइंग ११:
प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक/युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग
अशी असू शकते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची प्लेइंग ११:
विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, मयंक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा/जोश हेजलवुड, सुयश शर्मा
IPL 2025 PBKS vs RCB Highlights