IPL 2025 Revised Schedule will Be Huge Blow for Teams: भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाच्या परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. यानंतर स्पर्धेला आता येत्या १७ मे पासून सुरूवात होणार आहे. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने हंगामातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले, त्यानुसार आता अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. लीग स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतलेले विदेशी खेळाडू देखील भारतात परतू लागले आहेत. परंतु यादरम्यान, सात संघांमध्ये तणावाचं वातावरण आहे कारण या सात संघांशी संबंधित काही मोठ्या खेळाडू उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाहीत.

आयपीएल २०२५ च्या पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २५ मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होता. यानंतर ११ जूनला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांचे खेळाडू पुन्हा उर्वरित सामने खेळण्यासाठी भारतात परतण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय इतर आंतरराष्ट्रीय संघांचे विविध दौरेदेखील आधीपासूनच ठरले आहेत. ज्याचा आता आयपीएलला फटका बसणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या कोचने माहिती देत सांगितलं की, आफ्रिकेचे सर्व खेळाडू हे २६ मे रोजी भारतात मायदेशी परतण्यासाठी निघतील, यात कोणताही बदल झालेला नाही. आयपीएलच्या सध्याच्या हंगामात दक्षिण आफ्रिकेतील ८ खेळाडू खेळत आहेत, त्यापैकी आठ खेळाडूंची जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात निवड झाली आहे आणि बोर्डाला सर्व आठ खेळाडू लवकरात लवकर मायदेशी परतावी अशी इच्छा आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आरसीबी हा आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचण्यासाठी आघाडीवर आहे. यादरम्यान संघाला दुखापतींना सामोरं जावं लागलं आहे. आरसीबीचे दोन फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटीदार यांना दुखापत झाली आहे. याशिवाय संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड संघाबाहेर झाला आहे. हेझलवुड खांद्याच्या दुखापतीमुळे एक सामना खेळू शकला नव्हता. पण आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघात त्याची निवड झाली आहे. यानंतर लुंगी एनिगिडीदेखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आफ्रिकेच्या ताफ्यात आहे. तर जेकब बेथलची इंग्लंडच्या वनडे संघात निवड करण्यात आली आहे. याशिवाय रोमारियो शेफर्डदेखील वेस्ट इंडिजकडून खेळणार असल्याने प्लेऑफचे सामने खेळण्याबाबत शंका आहे.

गुजरात टायटन्स

गुजरातच्या प्लेईंग इलेव्हनमधील जोस बटलर आणि गेराल्ड कुत्सिया हे लीग स्थगित झाल्यानंतर मायदेशी गेले होते, ते पुन्हा भारतात स्पर्धेसाठी परतणार आहेत. पण तरीही प्लेऑफ आणि उर्वरित सर्व सामने खेळण्याबाबत शंका आहे. कारण बटलरची इंग्लंड वि. वेस्ट इंडिज वनडे मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. याशिवाय शेरफेन रूदरफोर्डदेखील प्लेऑफसाठी असण्याची शक्यता कमी आहे, कारण तोदेखील इंग्लंडविरूद्ध वेस्ट इंडिजकडून खेळताना दिसणार आहे. विंडिज संघासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. तर कगिसो रबाडा आणि गेराल्ड कुत्सिया हे खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनसाठी आफ्रिकेच्या संघाचा भाग आहेत. तर इंग्लंड खेळाडूंसाठी आयपीएल खेळण्याची एनओसी ही २५ मे पर्यंतची आहे.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्सच्या ताफ्यातील जोश इंग्लिस आणि मार्कस स्टॉयनिस आयपीएलच्या उर्वरित सामन्यांकरता भारतात परतण्याची शक्यता कमी आहे. बुधवारी म्हणजे आज खेळाडू संघात परतणार की नाही हे चित्र स्पष्ट होईल. याशिवाय मार्को यान्सन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे प्लेऑफसाठी परतणार की नाही याबाबत ही साशंकता आहे.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफकरता पात्र ठरण्यासाठी अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. दरम्यान मुंबईसाठी उर्वरित सामने आणि प्लेऑफसाठी मोठा धक्का असणार आहे. मुंबईच्या प्लेईंग इलेव्हनमधील ३ खेळाडू संघात परण्याची शक्यता फारच कमी आहे. विल जॅक्सची इंग्लंड वि. वेस्ट इंडिजसाठीच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे, ही मालिका २९ जूनपासून सुरू होणार आहे. तर कार्बिन बॉश, रायन रिकल्टन यांची आफ्रिकेच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी निवड झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लेऑफच्या शर्यतीत नसलेल्या चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद संघांनाही उर्वरित सामन्यांकरता धक्का बसला आहे. वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सामन्यांकरता पुन्हा परतण्यावर प्रश्नचिन्ह आहे.