IPL 2025 SRH vs DC Highlights: आयपीएल २०२५ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबादचा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानावर खेळवला जात होता. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत ६ विकेट्स गमावत १३३ धावा केल्या. पण दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली. अखेरीस हा सामना रद्द करण्यात आला असून दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला आहे.

Live Updates

IPL 2025 Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Highlights: आयपीएल २०२५ सनरायझर्स हैदराबादचा वि. दिल्ली कॅपिटल्स हायलाईट्स

23:14 (IST) 5 May 2025
SRH vs DC Live: दिल्ली हैदराबाद सामना रद्द

दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामना हैदराबादमधील पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पाऊस थांबल्यानंतरही ओल्या आऊटफिल्डमुळे आणि मैदानावर बरंच पाणी साचल्याने पंचांनी हा निर्णय घेतला. यासह दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला आहे. यासह हैदराबादचा संघ आयपीएल २०२५ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

23:07 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: ओल्या आऊटफिल्डमुळे उशिरा

हैदराबादमधील पाऊस थांबला असून ग्राऊंडस्टाफ मैदान खेळण्यासाठी तयार करण्यात जुंपले आहेत. पण ओल्या आऊटफिल्डमुळे सामना सुरू होण्यास विलंब होत आहे. काही वेळातच मुसळधार पाऊस पडल्याने मैदानावर खूप पाणी साचलं आहे.

22:38 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: दिल्ली-हैदराबाद सामना

दिल्ली हैदराबाद सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. पाऊस सातत्याने सुरू असून ५ षटकांचा सामना सुरू होण्यासाठी कट ऑफ वेळ ११.४२ आहे. एखाद्या टी-२० सामन्याचा निकाल लागावा यासाठी कमीत कमी ५ षटकांचा सामना होणं गरजेचं आहे.

22:00 (IST) 5 May 2025
SRH vs DC Live: दुसरा डाव सुरू व्हायला विलंब

दिल्लीचा संघ नाणेपेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरला आणि दिल्लीची फलंदाजी फळी कोसळली. दिल्लीच्या संघाने अखेरीस २० षटकांत ६ बाद १३३ धावा केल्या. पण आता हैदराबादमध्ये सुरू असलेल्या सामन्याचा दुसरा डाव सुरू होण्यास विलंब होत आहे. हैदराबादमध्ये पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे.

https://twitter.com/incricketteam/status/1919427185670004827

21:24 (IST) 5 May 2025
SRH vs DC Live: दिल्लीने विजयासाठी दिलं इतक्या धावांचं लक्ष्य

सनरायझर्स हैदराबादने भेदक गोलंदाजी करत दिल्लीच्या फलंदाजांना जेरीस आणलं. तब्बल ८ षटकांत दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. दिल्लीने यानंतरही प्रथम फलंदाजी करत ६ बाद १३३ धावा केल्या आहेत. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने ही धावसंख्या गाठली. स्टब्सने ३६ चेंडूत ४ षटकारांसह ४१ धावांची खेळी करत नाबाद परतला. तर आशुतोष शर्माने २६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह झटपट ४१ धावा केल्या. तर विप्रज निगमने १८ धावांचे योगदान दिले. यासह दिल्लीने हैदराबादला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान दिले आहे.

21:18 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: आशुतोष शर्मा झेलबाद

इशान मलिंगाच्या अखेरच्या षटकात आशुतोष शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

21:12 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: अर्धशतकी भागीदारी

दिल्ली कॅपिटल्सच्या पडझडीनंतर इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी संघाचा डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला १०० धावांचा टप्पा गाठून देण्यात मदत केली. दिल्लीने यासह १८ षटकांत ६ बाद ११५ धावा केल्या.

20:40 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: विप्रज निगम धावबाद

झीशान अन्सारीच्या १३व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी ट्रिस्टन स्टब्स थेट धावत निघाला. पण विप्रज त्याला नको म्हणत असताना स्टब्स खाली मान करून थेट धावत निघाला आणि विप्रजने आपल्या विकेटची कुर्बानी दिली. अशारितीने दिल्लीने धावबादच्या रूपात सहावी विकेट गमावली.

20:13 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: केएल राहुल झेलबाद

आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर जयदेव उनाडकटने दिल्लीची अखेरची आशा असलेल्या केएल राहुलला झेलबाद केलं. राहुलच्या बॅटची कड घेत चेंडू थेट इशान किशनच्या हातात गेला. यासह दिल्लीला ८ षटकांत पाचवा धक्का लागला. यासह दिल्लीने ८ षटकांत ५ बाद ३५ धावा केल्या आहेत.

20:09 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: दिल्लीची चौथी विकेट

पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात हर्षल पटेलने कर्णधार अक्षर पटेलला झेलबाद करत दिल्लीला सर्वात मोठा धक्का दिला. अक्षर पटेल ६ धावा करत झेलबाद झाला. यासह दिल्लीने या सीझनमधील प्लेऑफमधील सर्वात वाईट सुरूवात करत फक्त ४ विकेट्स गमावत २९ धावा केल्या आहेत.

19:58 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: तिसरी विकेट

पॅट कमिन्सने त्याच्या स्पेलमधील ३ षटकातील पहिल्याच चेंडूवर ३ विकेट घेतले आहेत. कमिन्सने एकट्याने दिल्लीचे ३ विकेट्स घेतले आहेत. अभिषेक पोरेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पाचव्या षटकात झेलबाद झाला. यासह ५ षटकांत दिल्लीने ३ बाद १९ धावा केल्या आहेत.

19:44 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: दुसरी विकेट

पॅट कमिन्सच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात तर डावातील तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिस झेलबाद झाला. फाफच्या बॅटची कड घेत चेंडू इशान किशनच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला. दिल्लीने 7 धावांवर 2 विकेट्स गमावले आहेत.

19:39 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: करूण नायर गोल्डन डक

दिल्लीकडून करूण नायर फाफ डू प्लेसिससह सलामीला उतरला. पण कमिन्सच्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर इशान किशनकरवी विकेटच्या मागे झेलबाद झाला. यासह करून नायर गोल्डन डकवर झेलबाद झाला.

19:11 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकिपर), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन

19:11 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live:सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकिपर), सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा

19:02 (IST) 5 May 2025
SRH vs DC Live: नाणेफेक

सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याची नाणेफेक हैदराबादने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबाद संघामध्ये हर्ष दुबे या नव्या भारतीय खेळाडूला दुखापत झालेल्या खेळाडूच्या जागी संघात सामील केलं आहे. दिल्लीच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

18:42 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ

करुण नायर, हॅरी ब्रूक, जॅक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव</p>

18:42 (IST) 5 May 2025

SRH vs DC Live: सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झाम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, वियान मुल्डर, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, एशान मलिंगा, सचिन बेबी, हर्ष दुबे

IPL 2025 SRH vs DC Highlights: सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्सचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. .