IPL 2025, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: आयपीएल २०२५ मधील सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने ५ विकेट्सने विजय मिळवत आयपीएल २०२५च्या गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे. सनरायझर्स हैदराबादच्या विस्फोटक फलंदाजीला आळा घालत शार्दुल ठाकूरच्या नेतृत्त्वाखालील लखनौच्या गोलंदाजी विभागाने चांगली सुरूवात करत १९१ धावांवर त्यांना रोखलं. प्रत्युत्तरात लखनौच्या निकोलस पूरन आणि मिचेल मार्श फटकेबाजीसह संघाने ५ विकेट्स राखून विजय मिळवला.

Live Updates

SRH vs LSG Highlights: आयपीएल २०२५ मधील सातव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने हैदराबाद संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर ५ विकेट्सने पराभव केला.

23:45 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: लखनौचा दणदणीत विजय

निकोलस पूरन-मिचेल मार्शच्या फटकेबाजीनंतर मिलर आणि अब्दुल समद यांनी संघाचा विजय निश्चित करत हैदराबादचा ५ विकेट्सने आणि २४ चेंडू राखून पराभव केला.

खाली वाचा सविस्तर बातमी

SRH vs LSG: लखनौचा हैदराबादवर दणदणीत विजय, पूरन-मार्शच्या फलंदाजीने घेतला ‘त्या’ पराभवाचा बदला; शार्दुल ठाकूरची भेदक गोलंदाजी
22:54 (IST) 27 Mar 2025

SRH vs LSG Live: ऋषभ पंत झेलबाद

झाम्पाच्या १३व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर आयुष बदोनी झेलबाद झाला. तर कर्णधार ऋषभ पंत हर्षल पटेलच्या १५ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला. यासह १५ षटकांत लखनौने ५ बाद १७६ धावा केल्या आहेत. आता लखनौला विजयासाठी ३० चेंडूत १५ धावांची गरज आहे.

22:32 (IST) 27 Mar 2025

SRH vs LSG Live: मिचेल मार्शचे शानदार अर्धशतक

मिचेल मार्शने कमिन्सच्या ११व्या षटकात सलग दोन चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. मार्शने २९ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावा करत सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याच षटकात पाचव्या चेंडूवर मिचेल मार्श मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

22:24 (IST) 27 Mar 2025

SRH vs LSG Live: निकोलस पूरन ७० धावा करत बाद

वादळी फलंदाजी करणारा निकोलस पूरन ७० धावा करत झेलबाद झाला. कमिन्सच्या नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर पायचीत झाला. यासह मार्श आणि पूरनची ११६ धावांची भागीदारी तुटली आणि लखनौला दुसरा धक्का बसला. निकोलस पूरन २६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ७० धावा करत झेलबाद झाला. यासह लखनौने ९ षटकांत २ बाद १२० धावा केल्या आहेत.

22:10 (IST) 27 Mar 2025

SRH vs LSG Live: निकोलस पूरनचे वादळी अर्धशतक

निकोसल पूरनने १८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ५१ धावा करत आपले अर्धशतक झळकावले आहे. यंदाच्या आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक निकोलस पूरनच्या नावे आहे.

22:06 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: लखनौ सुपर जायंट्सची सर्वात मोठी पॉवरप्लेमधील धावसंख्या

लखनौने पॉवरप्लेमध्ये ६ षटकांत १ बाद ७७ धावा केल्या आहेत. निकोलस पूरन आणि मिचेल मार्श यांच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर लखनौने आयपीएलमधील दुसरी आणि संघाची सर्वात मोठी पॉवरप्लेमधील धावसंख्या उभारली आहे. पूरन ४४ धावा तर मार्श २५ धावांवर खेळत आहे.

21:42 (IST) 27 Mar 2025

SRH vs LSG Live: लखनौने गमावली पहिली विकेट

हैदराबादने दिलेल्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लखनौचा संघ फलंदाजीला उतरला. मिचेल मार्श आणि एडन मारक्रमची जोडी मैदानात उतरली आहे. पण मारक्रम दुसऱ्याच षटकात झेलबाद झाला. यासह लखनौला मोठा धक्का बसला आहे. यानंतर निकोलस पूरन आणि मिचेल मार्शची जोडी मैदानात आहे. यासह दोन षटकांत लखनौने १ बाद १४ धावा केल्या आहेत.

21:19 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: हैदराबादने विजयासाठी दिले इतक्या धावांचे लक्ष्य

वादळी फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला लखनौने या सामन्यात २०० धावांचा टप्पा गाठू दिला नाही. हैदराबादच्या धावांना लखनौच्या गोलंदाजांनी चांगलाच ब्रेक लावला आणि संघाला ९ विकेट्सवर १९० धावांवर रोखलं. हैदराबादकडून हेडने ४७ तर अभिषेक शर्माने६ धावा केल्या अन् इशान गोल्डन डकवर बाद झाला. तर नितीश रेड्डी ३२ धावा आणि क्लासेन २६ धावा करत बाद झाले. अनिकेत वर्माने ३६ तर क्लासेन १८ धावांची झटपट खेळी केली पण फार काळ मैदानावर टिकू शकले नाही. लखनौकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६ विकेट्स घेतले तर आवेश खान, दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

21:03 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: शार्दुल ठाकूरचे १०० विकेट्स पूर्ण

शार्दुल ठाकूरने १७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अभिनव मनोहरला बाद करत तिसरी विकेट मिळवली. अभिनव २ धावा करत माघारी परतला. पुढच्याच षटकात ३ षटकार मारत झटपट धावा करणारा पॅट कमिन्स झेलबाद झाला. अशारितीने हैदराबादने आठवी विकेट गमावली. तर शार्दुल ठाकूरने मोहम्मद शमीला १९व्या षटकात झेलबाद करत चौथी विकेट मिळवली. यासह शार्दुल ठाकूने आयपीएलमध्ये आपले १०० विकेट्स पूर्ण केले आहे.

21:02 (IST) 27 Mar 2025

SRH vs LSG Live: अनिकेत वर्मा झेलबाद

हैदराबादचा नवा फलंदाज अनिकेत वर्माने १३ चेंडूत ५ षटकार लगावत वेगाने धावा करत होता. दिग्वेश राठीच्या १६व्या षटकात त्याने २ षटकार लगावत १५० धावांचा टप्पा संघाला गाठून दिला. पण अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. यासह १६ षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या आहेत.

20:56 (IST) 27 Mar 2025

SRH vs LSG Live: नितीश रेड्डी क्लीन बोल्ड

रवी बिश्नोईच्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गुगली टाकत नितीश रेड्डीला क्लीन बोल्ड केलं. १५व्या षटकात हैदराबादने पाचवी विकेट गमावली. पण यानंतर अनिकेत वर्माने दोन षटकार लगावत लखनौ संघावर दबाव टाकला.यासह हैदराबादने १५ षटकांत ५ बाद १४३ धावा केल्या आहेत.

20:40 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: क्लासेन रन आऊट

हेडला क्लीन बोल्ड करणाऱ्या प्रिन्स यादवच्या १२व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर क्लासेन रनआऊट झाला. प्रिन्स यादवच्या चेंडूवर नितीश रेड्डीने सरळ फटका खेळला. प्रिन्स तो चेंडू टिपण्यासाठी पुढे गेला पण चेंडू त्याच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकर एंडच्या विकेट्सवर जाऊन आदळला आणि तितक्यात क्लासेनही क्रिझच्या बाहेर होता आणि अशारितीने लखनौला चौथी महत्त्वाची विकेट मिळाली. यासह हैदराबादने १२ षटकांत ४ बाद ११० धावा केल्या आहेत.

20:28 (IST) 27 Mar 2025

SRH vs LSG Live: १० षटकांत किती धावा

लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या संघाला मोठे फटके खेळण्यापासून रोखत चांगली गोलंदाजी केली आहे. शार्दुल ठाकूरने तिसऱ्या षटकात २ विकेट्स घेतले तर नवा गोलंदाज प्रिन्स यादवला ट्रॅव्हिस हेडच्या रूपात मोठी विकेट मिळाली. यासह हैदराबादने १० षटकांत ३ विकेट्स गमावत ९६ धावा केल्या आहेत. क्लासेन आणि नितीश रेड्डीची जोडी मैदानावर कायम आहे.

20:17 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Travis Head Clean Bowled: ट्रॅव्हिस हेड क्लीन बोल्ड

लखनौ संघाकडून पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात ट्रॅव्हिस हेडचे २ झेल सुटले होते आणि हेड जलदगतीने त्याच्या अर्धशतकाच्या दिशेने जात होता. तितक्यात टाईम आऊटनंतर पंतने युवा गोलंदाज प्रिन्स यादवला गोलंदाजी दिली आणि प्रिन्सने आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एक उत्कृष्ट बॉल टाकत हेडला क्लीन बोल्ड करत मोठी विकेट मिळवली. हेड २८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावा करत बाद झाला. यासह हैदराबादने ९ षटकांत ३ बाद ८० धावा केल्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1905270276943753711

20:03 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: निकोलस पूरनची मोठी चूक, हेडचा झेल सोडला

रवी बिश्नोईच्या पॉवरप्लेच्या अखेरच्या सहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला आणि चेंडू उंच हवेत उडाला. सीमारेषेजवळ असलेल्या निकोलस पूरनच्या दिशेने चेंडू गेला. पूरनने चेंडू टिपला पण हातात सुटला अशारितीने हेड ३५ धावांवर खेळत असताना त्याचा झेल सुटला. याचा फटका तिसऱ्या चेंडूवर हेडने षटकार लगावताच संघाला बसला. यासह हैदराबादने ६ षटकांत २ विकेट्स गमावत ६२ धावा केल्या. हेड ४२ धावा तर नितीश रेड्डी ११ धावांवर खेळत आहे.

19:48 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: हैदराबादला २ चेंडूत २ धक्के

लखनौ सुपर जायंट्सची गोलंदाजी जोडी आवेश खान आणि शार्दुल ठाकूर यांनी चांगली गोलंदाजी करत सुरूवात केली. तर शार्दुलने तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला झेलबाद केलं. अभिषेक शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर बाद झाला. तर दुसऱ्या चेंडूवर नुकताच आलेल्या इशान किशनलाही गोल्डन डकवर झेलबाद केलं. बॅटची कड घेत चेंडू थेट ऋषभ पंतच्या हातात गेला. अशारितीने हैदराबादचे सलग दोन चेंडूवर २ विकेट घेतले. हैदराबादने ३ षटकांत २ विकेट गमावत २७ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1905263676376141918

19:32 (IST) 27 Mar 2025

SRH vs LSG Live: हैदराबाद-लखनौ सामन्याला सुरूवात

सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डावाला सुरूवात झाली आहे. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माची विस्फोटक जोडी मैदानावर उतरली आहे. तर लखनौकडून शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत आहे. हेडने तिसऱ्या चेंडूवर पहिला चौकार लगावला.

19:08 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: हैदराबाद संघाची प्लेईंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद संघाने त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या सामन्यातील सारखीच प्लेईंग इलेव्हन मैदानावर उतरणार आहे. पहिल्याच सामन्यात २८६ धावा केलेला हैदराबाद संघ आज ३०० धावा करणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

https://twitter.com/SunRisers/status/1905253159720939910

19:08 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: लखनौ संघाची प्लेईंग इलेव्हन

लखनौ सुपर जायंट्स संघाचे काही गोलंदाज दुखापतीमुळे एनसीएसमध्ये फिटनेस मिळवत आहेत. दरम्यान संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आवेश खान या सामन्यासाठी फिट झाला असून तो संघात परतला आहे.

एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव

https://twitter.com/LucknowIPL/status/1905252604957110656

19:02 (IST) 27 Mar 2025
SRH vs LSG Live: नाणेफेक

सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स संघाची नाणेफेक ऋषभ पंतच्या एलएसजी संघाने जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हैदराबादचा संघ फलंदाजीसाठी उतरणार आहे. लखनौ संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आला आहे.

17:31 (IST) 27 Mar 2025

अवेश खान खेळणार?

अवेख खान हा लखनौ सुपरजायंट्स संघाचा हुकूमी एक्का आहे. दुखापतीमुळे अवेश बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत होता. दुखापतीतून सावरल्याने अकादमी व्यवस्थापनाने अवेशला खेळण्याची परवानगी दिली आहे. हैदराबादच्या लढतीच्या पूर्वसंध्येला अवेश खान सराव करताना दिसला. अवेश खान संघात परतल्यास लखनौची गोलंदाजी बळकट होईल. प्रिन्स यादव या युवा गोलंदाजाच्या जागी अवेश खान अंतिम अकरात परतू शकतो.

17:11 (IST) 27 Mar 2025

230 सरासरी धावसंख्या झाली आहे- मिचेल मार्श

तडाखेबंद फटकेबाजीमुळे आयपीएल स्पर्धेत २३० ही धावसंख्या सरासरी वाटू लागली आहे. बहुतांश संघ दोनशे धावांची वेस सहजपणे ओलांडत आहेत. २३० धावा केल्यानंतरही संघांना आपण जिंकू याची खात्री नसते असं लखनौ सुपरजायंट्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने सांगितलं.

16:59 (IST) 27 Mar 2025

हैदराबादच्या झंझावाताला लखनौ कसं रोखणार?

प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकारांची लयलूट करण्यासाठी आतूर हैदराबादच्या फलंदाजांना रोखणं हे लखनौपुढचं मोठं आव्हान असणार आहे. मोहसीन खान आणि मयांक यादव हे गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा या धडाकेबाज सलामीवीरांनंतर डावखुरा स्फोटक फलंदाज इशान किशन फलंदाजीसाठी येतो. चेंडूला प्रेक्षकांमध्ये भिरकावून देणारा हेनरिच क्लासन आणि युवा नितीश रेड्डी हे प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक आहेत.

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Highlights, IPL 2025: सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स आयपीएल २०२५ सामन्याचे हायलाईट्स