आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २४ वा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. गुजरात टाययन्सने गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सला ३७ धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करत राजस्थानपुढे १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र वीस षटके संपेपर्यंत राजस्तान रॉयल्स १५५ धावा करु शकला. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये धमाकेदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याने उभारलेल्या ८७ धावांमुळेच गुजरातला विजयापर्यंत पोहोचता आले. विशेष म्हणजे या विजयानंतर गुजरातने राजस्थानला बाजूलास सारत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

हेही वाचा >>IPL 2022, RRvsGT : रासी ड्यूसेनचा डायरेक्ट हीट! मॅथ्यू वेडला केलं बघता बघता धावबाद

गुजरात टायटन्सने दिलेले १९३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीला आलेल्या जोस बटरलने अर्धशतकी खेळी करत ५४ धावा केल्या. मात्र देवदत्त पडिक्कल खातं न खोलताच तंबूत परतला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आठ धावांवर झेलबाद झाला. तर संजू सॅमसन अकरा धावांवर असताना हार्दिक पांड्याने डायरेक्ट हीट केल्यामुळे तो धावबाद झाला. पहिल्या फळीतील फलंदाज खास कामगिरी करू न शकल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर चांगलाच दबाव आला.

हेही वाचा >> ‘गॉड ऑफ क्रिकेट’ची जादू कायम! भर मैदानात पंजाबच्या कोचने सचिनचे धरले पाय, पाहा नेमकं काय घडलं?

पाचव्या विकेटसाठी आलेल्या शिमरोन हेटमायरने २९ तर रियान परागने १८ धावा करत संघाला विजयापर्यंत नेण्यास धडपड केली. मात्र राजस्थानचा संघ अवघ्या १५५ धावा करु शकला. शेवटच्या फळीतील प्रसिध कृष्णा (४ नाबाद), युजवेंद्र चहल (५), कुलदीप सेन (० नाबाद) दहा धावादेखील करु शकले नाही.

याआधी नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातकडून सलामीला आलेल्या मॅथ्यू वेड आणि शुभमन गिलने निराशा केली. मॅथ्यू वेड अवघ्या १२ धावांवर असताना व्हॅन डर ड्यूसेनच्या डायरेक्ट हीटवर धावबाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी आलेला विजय शंकरदेखील अवघ्या दोन धावांवर कुलदीप सेनने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी केली. त्याने मैदानावर पाय रोवून चार षटकार आणि आठ चौकार लगावत नाबाद ८७ धावा केल्या. संघाची ५३ धावांवर तीन गडी बाद अशी स्थिती असताना हार्दिकने संयम राखत वेळ मिळताच मोठे फटके मारले.

हेही वाचा >> IPL 2022 : ‘बेबी एबी’ची तुफानी फलंदाजी पाहून रोहित शर्मा झाला प्रभावित, मैदानावर येऊन…

चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी आलेल्या अभिनव मनोहर आणि डेविड मिलरने हार्दिक पांड्याला साथ दिली. अभिनवने २८ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. तर डेविड मिलरने १४ चेंडूंमध्ये एक षटकार आणि पाच चौकार लगावत नाबाद ३१ धावा केल्या. वीस षटकांत गुजरातने १९२ धावा केल्यानंतर मुंबईला विजयासाठी १९३ धावा कराव्या लागणार होत्या.

हेही वाचा >> MI in IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा संघ ‘प्ले ऑफ्स’च्या शर्यतीमधून बाहेर?; समजून घ्या Playoffs चं गणित

दुसरीकडे राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवात चांगली करत गुजरातच्या दोन फलंदाजांना १५ धावांच्या आत तंबूत पाठवले. त्यानंतर मात्र हार्दिक पांड्याला रोखण्याता राजस्थानचे गोलंदाज अपयशी झाले. गुलदीप सेन, युजवेंद्र चहल आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यानंतर मात्र निशाम, प्रसिध कृष्णा आणि आर अश्विन एकाही फलंदाजाला तंबुत पाठवू शकले नाही.