scorecardresearch

यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सचा वायुवेग पाहून मुंबईचे खेळाडू अवाक्, देवाल्ड ब्रेविसला नेमकं कसं बाद केलं ?

बिलिंग्समुळे ब्रेविस अवघ्या २९ धावा करु शकला. तर दुसरीकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मादेखील मैदानावर तग धरू शखला नाही.

dewald brevis
देवाल्ड ब्रेविस अशा प्रकारे यष्टिचित झाला. (फोटो- iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात १४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन तगड्या संघांमध्ये सामना खेळवला जातो. हा सामना सुरुवातीपासून अटीतटीचा होताना दिसतोय. कारण मुंबईकडून पहिलाच सामना खेळणारा बेबी एबी अर्थात डेवाल्ड ब्रेविस याला कोलकात्याच्या सॅम बिलिंग्सने यष्टिचित केलंय. ब्रेविससारख्या फलंदाजाला बिलिंग्सच्या चपळाईमुळे स्वस्तात बाद व्हावं लागलंय. पदार्पणातच ब्रेविस मोठा खेळ करेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र बिलिंग्समुळे त्याला अव्या २९ धावांवर तंबुत परतावं लागलंय.

हेही वाचा >>>IPL 2022 : राजस्थानकडून विजय खेचून आणल्यानंतर बंगळुरुचं जंगी सेलिब्रेशन, खेळाडूंनी गायलं खास गाणं, पाहा व्हिडीओ

आजच्या सामन्यात विजयाला गवसणी घालण्यासाठी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने संघात मोठा बदल केलेला आहे. टिम डेव्डिड दोन्ही सामन्यांत अयशस्वी झाल्यामुळे त्याच्या जागेवर देवाल्ड ब्रेविस याला संधी देण्यात आली आहे. ब्रेविसला त्याच्या आक्रमक खेळीमुळे बेबी एबी म्हटले जाते. मात्र आजच्या सामन्यात त्याची जादू चालू शकली नाही. दुसऱ्या विकेटसाठी आल्यानंतर सुरुवातीला ब्रेविस मैदावार सेट झाला. मधूनमधून तो मोठे फटकेदेखील मारत होता. मात्र वरुण चक्रवर्तीने टाकलेल्या चेंडूवर तो गोंधळला. चक्रवर्तीने टाकलेल्या चेंडूवर ब्रेविसने क्रीज सोडून फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सच्या हातामध्ये विसावला. हीच संधी साधत बिलिंग्सने क्रीजच्या बाहेर गेलेल्या ब्रेविसला यष्टीचित केलं.

हेही वाचा >>> Video : युजवेंद्रचा खेळ पाहून आनंद गगनात मावेना, पत्नी धनश्री वर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा, स्टेडीयममधील व्हिडीओ व्हायरल

बिलिंग्समुळे ब्रेविस अवघ्या २९ धावा करु शकला. तर दुसरीकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मादेखील मैदानावर तग धरू शखला नाही. रोहित अवघ्या तीन धावा रुन झेलबाद झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2o22 kkr vs mi mumbai indians players dewald brevis wicket by stumping of sam billings

ताज्या बातम्या