आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ६० व्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने धडाकेबाज फलंदाजी केली. पंजाबसाठी आजचा सामना म्हणजे करो या मरोची लढाई असल्यामुळे या संघाने बंगळुरुसमोर विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले. सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टोने तर चौकार आणि षटकार यांचा पाऊस पडत अवघ्या २१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले.

हेही वाचा >> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”

जॉनी बेअरस्टोने फलंदाजीसाठी सलामीला येत २९ चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या. आपल्या डावात बेअरस्टोने तब्बल सात षटकार आणि चार चौकार लगावले. पहिल्या पावर प्लेमध्ये शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. या जोडीने तीन षटके आणि पाच चेंडूंमध्ये धावफलकावर ५० धावा लगावल्या. तर दुसरीकडे बेअरस्टोने सहाव्या षटकात त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावत २१ चेडूंंमध्ये अर्धशतक झळकावले. त्याच्या या कागिरीमुळे पंजाब संघ २० षटकांत २०० पेक्षा जास्त धावा करु शकला.

हेही वाचा >> जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’

तर दुसरीकडे बेअरस्टोसोबतच पंजाब किंग्जच्या लियाम लिव्हिंगस्टोन या फलंदाजानेही मोठी खेळी केली. त्याने ४० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि चार षटकार लगावत ७० धावा केल्या. त्याच्या या मोठ्या खेळीनंतर पंजाबने वीस षटकांत २०९ धावा केल्या.