scorecardresearch

IPL 2022 RR vs RCB : विराटने टिपला झेल, पण पंचांनी घेतला आक्षेप, बंगळुरु-राजस्थान सामन्यात मैदानावरच ड्रामा

रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरुने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानची सुरवात खराब झाली.

VIRAT KOHLI
विराट कोहलीने अशा प्रकारे झेल टिपला (फोटो iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १२ सामना आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवला जातोय. सुरुवातीपासूनच आजच्या सामन्यात रंगत चढली आहे. यशस्वी जैसवाल अवघ्या चार धावांवर बाद झाल्यानंतर राजस्थान ८६ धावांवर असताना देवदत्त पडीक्कलदेखील झेलबाद झाला आहे. विराट कोहलीने हा अप्रतिम झेल टिपल्यामुळे पडिक्कलला तंबुत परतावं लागलं आहे. मात्र पडिक्कलला बाद ठरवण्याआधी मैदानावर चांगलाच ड्रामा झाला. पडिक्कलला बाद ठरवताना टिपलेल्या झेलवर पंचांनी शंका व्यक्त केल्यामुळे बंगळुरुच्या विराट कोहलीने मैदानावरच नाराजी व्यक्त केलीय.

हेही वाचा >>> IPL 2022 : पुण्याच्या वाटेवर सचिनचे मराठीवरील प्रेम आले समोर, तेंडुलकरने कारमध्ये…

देवदत्त पडिक्कलचा झेल टिपल्यानंतर नेमकं काय घडलं ?

रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरुने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानची सुरवात खराब झाली. पहिल्याच षटकात यशस्वी जैसवाल अवघ्या चार धावांवर बाद झाला. त्यानंतर संघाच्या ७६ धावा असताना देवदत्त पडिक्कलदेखील झेलबाद झाला. पडिक्कलने जोराचा फटका मारला मात्र चेंडू हवेत गेल्यामुळे विराट कोहलीने झेल टिपला. हा झेल टिपण्यासाठी विराटला मोठी मेहनत घ्यावी लागली. झेल टिपल्यानंतर चेंडू खाली पडू नये म्हणून कोहलीने स्वत:ला खाली झोकून दिलं.

हेही वाचा >>> लखनऊच्या केएल राहुलने रचला ‘हा’ नवा विक्रम; विराट कोहली, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान

झेल घेताना विराट कोहलीने चूक केल्याचा संशय आल्यामुळे पंचांनी पडिक्कलला थांबवून घेतलं. या सर्व प्रकारामुळे विराट कोहली मात्र चांगलाच नाराज झाला. त्याने मैदानावरच नेमकं काय झालं ? असं पंचांना विचारलं. मी योग्य प्रकारे झेल टिपल्याचे तो पंचांना सांगत होता. मात्र पंचांनी झेलची खात्री केल्यानंतर पडिक्कलला झेलबाद जाहीर केलं. पडिक्कलच्या विकेटवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर विराट कोहलीच्या चेहऱ्यावर नंतर हसू उमटले.

हेही वाचा >>> क्रिकेटपूट व्यंकटेश अय्यर करतोय ‘या’ सुंदर अभिनेत्रीला डेट ? फोटोवर कमेंट करताच चर्चेला उधाण

दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या फलंदाजी करत असून यशस्वी जैसवाल अवघ्या चार धावा करुन बाद झालेला आहे. तर २९ चेंडूंमध्ये ३७ धावा करुन देवदत्त पडिक्कल झेलबाद झालाय. कर्णधार संजू सॅमसनदेखल अवघ्या आठ धावा करुन हसरंगाच्या चेंडूवर झेलबाद झालाय.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2o22 rcb vs rr virat kohli angry over umpire decision on devdutt padikkal wicket prd

ताज्या बातम्या