IPL Final 2025 Operation Sindoor Closing Ceremony Theme : आयपीएल २०२५ स्पर्धेतील पंजाब किंग् आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ३ जून रोजी अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना होईल. अंतिम फेरीची थीम ऑपरेशन सिंदूर आहे. या कार्यक्रमाला संरक्षणाच्या तिन्ही दलातील प्रमुखांना आमंत्रण देण्यात आलंय. तर, संपूर्ण स्टेडिअमला तिरंग्याची प्रकाशयोजना करण्यात आली आहे. तसंच, शंकर महादेवन याचा लाईव्ह कॉन्सर्टही येथे आयोजित करण्यात आला आहे.

विमान तिकिटे महागली

सोमवारी दिल्ली, बेंगळुरू, मुंबई आणि चंदीगडहून अहमदाबादला येणाऱ्या विमानांचे भाडे २५ हजार रुपयांवर पोहोचले आहे. सामान्य दिवसांमध्ये हे भाडे ३५०० ते ५००० रुपयांपर्यंत असते. इतकेच नाही तर अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (बुधवार) मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या सकाळच्या विमानांचे भाडे ३० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दुपारी १२ वाजण्यापूर्वी बेंगळुरूला एकूण ५ फ्लाइट्स आहेत, त्यापैकी फक्त २ फ्लाइट्समध्ये काही जागा शिल्लक आहेत. त्यांचे विमान भाडेही १२ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये झाले आहे.

हा सामना सायंकाळी साडेसात वाजता रंगणार आहे. त्यामुळे मुंबईतून सकाळी अहमदाबादला जाणाऱ्या तिकिटांची रक्कम १५ ते २० हजारांच्या घरात गेल्या आहेत. मेक माय ट्रीपनुसार दुपारी सव्वातीनपर्यंतच्या विमानांची तिकिटे २० हजार रुपये आहेत.

हॉटेल्सचे दर वाढले

विमान तिकिटांच्या किंमती वाढल्याने हॉटेलचालकांनीही दर वाढवले आहेत. इतर शहरांमधून मोठ्या संख्येने लोक अहमदाबादला येणार आहेत, यामुळे शहरातील हॉटेलच्या दरात वाढ झाली आहे. ३ जून रोजी हॉटेलच्या दरात तीन ते चार पट वाढ झाली आहे. साधारणपणे दररोज ९,००० रुपये आकारणारी हॉटेल्स ३ जून रोजी १८,००० रुपये झाली आहेत.

८० हजार तिकिटांची विक्री

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी ८०,००० तिकिटे ऑनलाइन विकली गेली आहेत. यामध्ये २५,००० तिकिटे मोफत असतील. हे क्रिकेट बोर्डासह इतर संस्थांना दिले जातील. याशिवाय, लष्करी कर्मचाऱ्यांसाठीही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

३ जून रोजी मेट्रो सेवा नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ रात्री १२.३० वाजेपर्यंत चालवली जाणार आहे. मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी, जीएमआरसीने आयपीएल सामन्याच्या दिवशी परतीच्या प्रवासासाठी एक खास कागदी तिकीट सुरू केले आहे. या तिकिटानेच प्रवास करण्याची परवानगी असेल. सामन्याच्या दिवशी क्रॉस रोड, अ‍ॅपेरल पार्क, कालूपूर, जुने हायकोर्ट, थलतेज, मोटेरा, साबरमती, रानीप, वडज आणि जीवराज मेट्रो स्थानकांवरूनही ही कागदी तिकिटे आगाऊ खरेदी करता येतील. त्याचे भाडे प्रति व्यक्ती ५० रुपये असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री उशिरापर्यंत बसचीही सुविधा

अंतिम सामना पाहण्यासाठी आलेले लोक रात्री उशिरा घरी परततील. यामुळे महामंडळाने अतिरिक्त एएमटीएस बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बसेस रात्री १० ते पहाटे १:३० वाजेपर्यंत धावतील. मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमजवळील अचेर डेपोमधून या बसेस मणिनगर, ओढव, वासना, उजाला सर्कल आणि नारोळ भागात जातील. रात्रीच्या अतिरिक्त बसेसचे भाडे प्रति प्रवासी ३० रुपये निश्चित करण्यात आले आहे.