Najam Sethi On IPL and PSL’s Digital Rating: पाकिस्तान सुपर लीगचा आठवा हंगाम शनिवारी संपला. लाहोर कलंदर्सने सलग दुसऱ्यांदा लीगचे विजेतेपद पटकावले. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोरने मोहम्मद रिझवानच्या मुलतान सुलतान्सचा एका धावेने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कलंदरने २० षटकांत ६ गडी गमावून २०० धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ४० चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याचवेळी कर्णधार शाहीनने १५ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. त्यानंतर लाहोरने मुलतानला १९९/८ च्या धावसंख्येवर रोखले. पाकिस्तान सुपर लीग संपल्यानंतर आता चाहते आयपीएलच्या १६व्या आवृत्तीची वाट पाहत आहेत.

पाकिस्तान सुपर लीगचा संपन्न झाली असून स्पर्धेचा अंतिम सामना गेल्या शनिवारी म्हणजेच १८ मार्च रोजी झाला. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी पीएसएलच्या मीडिया रेटिंगबद्दल बरेच काही सांगितले. ते म्हणाले की पीएसएलचे मीडिया रेटिंग आयपीएलपेक्षा जास्त आहे. ते म्हणाले की, “आयपीएलचे डिजिटल रेटिंग १३० दशलक्ष आहे आणि पीएसएलचे १५० दशलक्षांपेक्षा जास्त आहे.

Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
car market india
हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?
How India response to Vladimir Putin in the Ukraine war
युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
Loksatta anvyarth Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden on Bangladesh issue
अन्वयार्थ: गोंधळ, गोंधळी यांना थारा नकोच!
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
Jay Shah ICC Chairman
Jay Shah ICC Chairman : गुजरात क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी ते आयसीसीचे सर्वेसर्वा, जाणून घ्या जय शाहांची वाटचाल

हेही वाचा: IPL 2023 Schedule: १० संघ, १८ डबल हेडर, २ ग्रुप, नवीन वेन्यू; इंडियन प्रीमियर लीग २०२३चे वेळापत्रक जाहीर, ३१ मार्चपासून वाजणार बिगुल

आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रिय टी२० लीग मानली जाते कारण त्याच्या मोठ्या चाहत्यांचे फॉलोइंग आणि रोमांचक सामने हे आहेत. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी आता दोन्ही लीगबाबत धक्कादायक मत व्यक्त केले असून डिजिटल रेटिंगच्या बाबतीत पीएसएल हे आयपीएलपेक्षा मोठे यश असल्याचे म्हटले आहे. पीएसएल फायनलपूर्वी नजन सेठी म्हणाले होते, “चला डिजिटलबद्दल बोलूया. पीएसएल सीझनच्या अर्ध्या टप्प्यावर असताना, मी आमच्या डिजिटल रेटिंगबद्दल विचारले. नजम सेठी शोला टीव्हीवर ०.५ रेटिंग असायची तर पीएसएलला ११ पेक्षा जास्त रेटिंग मिळत आहे. त्यामुळे, जेव्हा ते पूर्ण होईल, तेव्हा त्याचे रेटिंग १८ किंवा २० असेल.”

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने सेठीच्या हवाल्याने म्हटले आहे की, “आमच्याकडे अमेरिकेत काही लीग सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे आणि आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही त्या पर्यायाचा शोध घेऊ. तसेच लोकांच्या सोयीसाठी स्टेडियमजवळ खेळाडूंसाठी पंचतारांकित हॉटेल्स बांधण्यासाठी लाहोर आणि कराची येथील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे.”

हेही वाचा: IND vs AUS: “कोहली, रोहित आणि राहुल; हे सर्व…” स्टार्कच्या यशानंतर वसीम अक्रमने टीम इंडियाला मारला टोमणा

पीएसएलने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात कशी मदत केली हेही त्यांनी सांगितले. सरकारला भरलेल्या करांचा खुलासा करण्यापूर्वी सेठी म्हणाले, “पीएसएलने देशाच्या आर्थिक चाकाला गती देण्यास हातभार लावला आहे कारण त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि पर्यटन, हॉटेल उद्योग, एअरलाइन्स आणि रोड ट्रॅव्हल व्यवसाय वाढण्यास मदत झाली आहे. आम्ही फेडरल सरकारला ७० कोटी रुपये कर, ५० कोटी रुपये विक्रीकर आणि ५० कोटी रुपये प्रांतीय कर भरले आहेत.” पीएसएलमध्ये तीन सट्टेबाजी कंपन्यांना संघ प्रायोजित केल्याच्या मुद्द्यावर सेठी यांनी स्पष्ट केले की पीसीबी प्रमुखपदी नियुक्त होण्यापूर्वी करारांचे पुनरावलोकन केले जाईल. ते म्हणाले, “पीसीबी देशाच्या धर्म, संस्कृती आणि परंपरेच्या विरोधात कोणतीही कृती करणार नाही.”