मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे अकराव्या हंगामातील आयपीएल सामन्यांवर पाणी सोडावं लागणाऱ्या, केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्ज संघाने पर्याय शोधून काढला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीची चेन्नईच्या संघात वर्णी लागलेली आहे. ३३ वर्षीय केदार जाधवने अकराव्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

डेव्हिड विलीचा काउंटी क्रिकेट क्लब यॉर्कशायरने आपल्या ट्विटर अकाउंटवर विली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार असल्याची माहिती दिली आहे.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात केलेल्या खेळीमुळे केदारला पहिल्या सामन्यात सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाजांना भरणा असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघात डेव्हिड विलीला जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.