scorecardresearch

ना रोहित ना विराट…. असा आहे इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा IPL संघ

मुंबईच्या पाच खेळाडूंचा समावेश

दिल्लीचा पराभव करत मुंबईनं पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे. आयपीएल संपल्यानंतर अनेकांनी आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांचाही समावेश आहे. नासिर हुसेन यांनी आपल्या संघाच्या कर्णधारपदी के. एल. राहुलची निवड केली. धोनी, रोहित आणि विराटसारख्या दिग्गज खेळाडूंना त्यांनी आपल्या अंतिम एकदशमध्ये सहभागी केलं नाही.

नासिर हुसेनने केएल राहुल आणि शिखर धवन यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी मुंबईच्या सुर्यकुमार यादवला पसंती दिली आहे. तर चौथ्या स्थानावर इशान किशन याची निवड केली आहे. पाचव्या स्थानावर आरसीबीचा धडाकेबाज फलंजलाज डिव्हिलिअर्सची निवड केली आहे. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्याची निवड केली आहे. नासिरच्या संघाच राशिद खान एकमेव फिरकी गोलंदाज आहे. तर चार वेगवान गोलंदाजाची निवड केली आहे.

नासिर यांच्या संघात मुंबई इंडियन्स संघाचे सर्वाधिक खेळाडू आहे. नासिरच्या संघात मुंबईचे पाच खेळाडू आहेत. दिल्लीच्या दोन खेळाडूंचा समावेश त्यांनी आपल्या संघात केला आहे. राजस्थान, हैदराबाद, आरसीबी आणि पंजाब संघातील प्रत्येकी एका खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

नासिर हुसेनचा आयपीएल २०२० संघ –
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, जोफ्रा आर्चर, राशिद खान, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० ( Ipl2020 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No rohit sharma and virat kohli in former england captain nasser hussain nck

ताज्या बातम्या