इंडियन प्रीमियर लीग २०२३चा ६१वा सामना १४ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने चेन्नईचा ६ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर सीएसकेची प्लेऑफमध्ये जाण्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. पण सामन्यानंतर एम.एस. धोनीसह संघातील इतर खेळाडूंनी मैदानावर जे केले त्याने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. खरं तर, केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीने संघाच्या उर्वरित खेळाडूंसोबत मैदानावर एक फेरी मारली. यावेळी त्याने रॅकेटमधून टेनिस बॉल प्रेक्षकांच्या दिशेने फेकला. एवढेच नाही तर धोनीने माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना त्यांच्या शर्टवर ऑटोग्राफ दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

धोनीने चाहत्यांची मने जिंकली

एम.ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. सीएसकेचा घरच्या मैदानावरचा हा हंगामातील शेवटचा सामना होता. हे लक्षात घेऊन एम.एस धोनी आणि संघातील इतर खेळाडूंनी मैदानाची एक फेरी मारली. चेन्नईच्या कर्णधाराने तो क्षण अधिक खास बनवला जेव्हा त्याने त्याच्या रॅकेटमधून टेनिस बॉल आणि काही भेटवस्तू प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावल्या. दरम्यान, सीएसकेचे उर्वरित खेळाडू संघाचा झेंडा हातात घेऊन जाताना दिसले. धोनी आणि संघातील इतर खेळाडूंच्या या प्रेमाचा क्रिकेट चाहत्यांनी आनंद घेतला. चेपॉकमध्ये उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
hardik pandya marathi news, hardik pandya mumbai indians marathi news
दोन सामने, दोन पराभव, दोन मोठ्या चुका! कर्णधार हार्दिक पंड्याचे डावपेच मुंबई इंडियन्ससाठी मारक ठरत आहेत का?

धोनीसह संपूर्ण संघाने मैदानात फेरफटका मारला

हा सामना संपल्यानंतर मैदानावर एक विलक्षण अनुभव पाहायला मिळाला. धोनीसह सीएसकेचे खेळाडू चाहत्यांचे आभार मानण्यासाठी मैदानाला फेरी मारली. यादरम्यान प्रत्येक चाहत्याला धोनीची एक झलक पाहायची होती. यात महान फलंदाज सुनील गावसकरसुद्धा मागे नव्हते ते धोनीकडे ऑटोग्राफसाठी धावत गेले. धोनीने आधी गावसकरांच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला आणि नंतर त्यांना मिठी मारली. या क्षणाला आयपीएल २०२३चा ‘सर्वोत्तम क्षण’ म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

चाहत्यांकडे सीएसकेचे खेळाडू टी-शर्ट फेकतात. धोनी अँड कंपनी आणि चाहत्यांसाठी हा नक्कीच भावनिक क्षण आहे. अजिंक्य रहाणे हातात एक पोस्टर घेऊन दिसत आहे, ज्यामध्ये चाहत्यांसाठी खास संदेश लिहिला आहे. १४ मे च्या रात्री चाहत्यांची असो वा खेळाडूंची, संपूर्ण चेन्नई भावूक झाली होती. धोनीने मैदानावर उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्याच्या गुडघ्याची जुनी दुखापत पुन्हा दिसून आली. तो गुडघ्याला टोपी घालून मैदानात फिरत होता. केकेआरचा रिंकू सिंग जो सामनावीर म्हणून निवडला गेला होता तो देखील ऑटोग्राफ मागण्यासाठी आला होता, माहीने त्यालाही निराश केले नाही. पण या सगळ्यात पुन्हा तोच प्रश्न, धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळताना दिसणार आहे का?

हेही वाचा: Sunil Gavaskar and MS Dhoni: धोनीच्या ऑटोग्राफसाठी सुनील गावसकरांची धावाधाव… एखाद्या चाहत्याप्रमाणे घेतली कॅप्टन कूलची सही! Video व्हायरल

एम.एस. धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचे बोलले जात आहे. सीएसकेला या हंगामात एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर कोणतेही लीग सामने खेळायचे नाहीत आणि त्याचा शेवटचा लीग सामना दिल्लीविरुद्ध अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. सीएसकेचा संघ सध्या १३ सामन्यांत सात विजय आणि पाच पराभवांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत सीएसके प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. प्लेऑफमध्ये पोहोचल्यावर, धोनी पुन्हा एकदा या मोसमात घरच्या प्रेक्षकांसमोर क्वालिफायर/एलिमिनेटर सामने खेळताना दिसेल.