Sourav Ganguly Viral Tweet on Shubman Gill: आयपीएल २०२३चा शेवटचा लीग सामना २१ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. आरसीबीसाठी तो ‘करो किंवा मरो’ असा सामना होता. आरसीबी ६ विकेट्सने पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला. आरसीबीसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने ६१ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या.

प्रत्युत्तरात गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलने शानदार शतक झळकावले आणि कोहलीचे शतक झाकोळले गेले. त्याने ५२ चेंडूत नाबाद १०४ धावा करत गुजरातला विजयाकडे नेले. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ८ षटकार मारले. या सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ट्वीटरवर कोहली आणि शुबमनच्या शतकांचे कौतुक केले. मात्र, गांगुलीच्या या ट्वीटला कोहलीच्या चाहत्यांनी थोडा ट्विस्ट दिला आणि सगळ्यांचा गैरसमज केला, ज्यावर दादाला राग आला.

ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद
Vijaypat Singhania and his son Gautam Singhania
गौतम सिंघानिया आणि तुमच्यातला वाद मिटला?, विजयपत सिंघानिया म्हणाले, “इच्छा नसतानाही..”

खरं तर, कोहली आणि शुबमनच्या शतकांनंतर गांगुलीने ट्वीटरवर लिहिले, “आपल्या देशात किती जबरदस्त प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्याचा शोध भारतीय क्रिकेट बोर्डाने घेतला याचा अभिमान आहे…शुबमन गिल…शाब्बास…दोन डावात दोन शानदार खेळी…आयपीएल २०२३ची टूर्नामेंटची पातळी खूप उच्च दर्जाची होती आणि यापुढे देखील असणार आहे.” गांगुलीच्या या ट्वीटवर कोहलीच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केली की, “तुम्ही विराटचा उल्लेख का केला नाही, थोड मोठेपण दाखवा.” काहींनी लिहिले की, “तुम्ही कोहलीचे नाव घेतले नाही, तरी तो शानदार खेळला. तुम्ही नाही केले पण त्याचेही कौतुक होत आहे.”

कोहलीच्या चाहत्यांच्या या कृतीवर गांगुलीने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष गांगुली यांनी ट्वीटरवर लिहिले, “फक्त थोडक्यात एक गोष्ट लक्षात आणून देतो की हे मी काय लिहिले आहे. आशा आहे की तुमच्यापैकी जे या ट्वीटला ट्विस्ट देत आहेत त्यांना इंग्रजी समजते… नसल्यास, कृपया जबाबदार व्यक्तीला भेटा आणि त्याच्याकडून समजून घ्या.”

हेही वाचा: IPL 2023: “परदेशी खेळाडूंना आकर्षित करायचे असेल तर पैसे…”, बिजनेस गुरु दीपक चाहरची स्पेशल रणनीती, Video व्हायरल

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून कोहली आणि गांगुली यांच्यात मतभेद असल्याची चर्चा आहे. गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना कोहलीला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले तेव्हापासून या दोघांमधील मतभेद सुरू झाल्याचे बोलले जाते. आयपीएल २०२३ मध्ये आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही. मात्र, जेव्हा दोन्ही संघ दुसऱ्यांदा भेटले तेव्हा कोहली आणि गांगुली हस्तांदोलन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. गांगुली सध्या डीसीचे क्रिकेट संचालक आहेत.