scorecardresearch

IPL 2023 Opening Ceremony: तब्बल पाच वर्षांनी होणार आयपीएल रंगारंग उद्घाटन सोहळा, रश्मिका मंदान्नासह ‘या’ स्टार्सचा परफॉर्मन्स मिळणार पाहायला

IPL 2023 Opening Ceremony: आयपीएल २०२३च्या पहिल्या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करताना दिसतील.

IPL colorful opening ceremony to be held after five years these stars including Rashmika Mandana will be seen performing
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

आयपीएल २०२३ अवघ्या काही दिवसांवर आहे. नवीन ब्लॉकबस्टर सीझन ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेत्या गुजरात टायटन्सची लढत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. चार वेळचा चॅम्पियन चेन्नई गेल्या मोसमात ९व्या क्रमांकावर होता. गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामना साडेसात वाजता सुरू होईल. या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल.

जवळपास तीन वर्षांनंतर आयपीएलमध्ये होम आणि अवे फॉरमॅटचे पुनरागमन होत आहे. आयपीएलचा थरार सुमारे ७४ दिवस चाहत्यांच्या डोक्यावर फिरणार आहे. आयपीएलचा पहिला सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक येणार असल्याचे मानले जात आहे. कारण अहमदाबादमध्ये १.२५ लाखांहून अधिक लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. दरम्यान, आता ती यादी समोर आली असून, पहिल्या दिवशी कोणते स्टार्स आयपीएलपूर्वी परफॉर्म करणार आहेत.

कोणते कलाकार करणार सादरीकरण?

रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटिया आयपीएल २०२३च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करू शकतात. यासोबतच कलाकारांच्या यादीत कतरिना कैफ, टायगर श्रॉफ आणि अरिजित सिंग यांचीही नावे आहेत. महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा ४ मार्च रोजी झाला. हिप-हॉप गायक एपी ढिल्लोन व्यतिरिक्त, बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतील.

उद्घाटन सोहळा कुठे आणि कधी होणार?

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा होणार आहे. सायंकाळी दीड वाजल्यापासून ते सुरू होऊ शकते, असे मानले जाते. हे सुमारे ४५ मिनिटे चालेल. आयपीएलचा पहिला सामना संध्याकाळी ७.३० पासून खेळवला जाईल. याच्या सुमारे अर्धा तास आधी नाणेफेक होईल, जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार म्हणजे CSK चा एमएस धोनी आणि गुजरात टायटन्सचा हार्दिक पांड्या एकत्र क्षेत्ररक्षण करतील.

हेही वाचा: Virat Kohli: किंग कोहलीचा स्वॅगचं न्यारा! सात-आठ टाके पडूनही झळकावले होते धडाकेबाज शतक, RCBच्या प्रशिक्षकाने दिला आठवणींना उजाळा

२०१८ नंतर आयोजित नाही

२०१८च्या हंगामापासून आयपीएलमध्ये उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आलेले नाहीत. २०१८ मध्ये परिणीती चोप्रा, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस आणि हृतिक रोशन या भारतीय स्टार्सनी परफॉर्म केले. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ला झाला होता, ज्यामध्ये एकूण 40 जवान शहीद झाले होते. या शहिदांच्या सन्मानार्थ उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यासाठीची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. तेव्हापासून ते कोरोनामुळे आयोजित करण्यात आले नव्हते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 19:54 IST

संबंधित बातम्या