Will MS Dhoni play in T20 World Cup 2024 : एमएस धोनी वयाच्या ४२ व्या वर्षी आयपीएल २०२४ मध्ये सीएसकेसाठी ज्या प्रकारे खेळत आहे, ते पाहून करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांना धोनीने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी त्याची निवृत्ती मागे घ्यावी अशी इच्छा आहे. त्याचा हा फॉर्म पाहून क्रिकेट चाहत्यांनी आणि अगदी माजी क्रिकेटपटूही म्हणू लागले आहेत की, धोनीला २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळावी. त्यामुळे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर खरंच असा चकित करणारा निर्णय घेणार आहेत का? जाणून घेऊया.

आयपीएल २०२४ मधील एमएस धोनीची कामगिरी –

आयपीएल २०२४ मध्ये, आत्तापर्यंत धोनी आठ सामन्यांमध्ये सहा वेळा फलंदाजीला आला आहे, तो एकदाही आऊट झालेला नाही, यादरम्यान धोनीने ३५ चेंडूंचा सामना करत एकूण ९१ धावा केल्या आहेत. या धावा त्याने २६० च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. यादरम्या धोनीने ९ चौकार आणि १४ षटकार मारले आहे. आता हा फॉर्म पाहून क्रिकेट चाहत्यांनी आणि अगदी माजी क्रिकेटपटूही म्हणू लागले आहेत की, धोनीला २०२४ च्या टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळावी. भारताचा माजी खेळाडू वरुण आरोन म्हणाला की, आपण एमएस धोनीच्या रूपाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतासाठी वाईल्ड कार्ड एंट्री पाहू शकतो.

धोनी बनणार टीम इंडियाचे वाईल्ड कार्ड?

वरुण आरोनने स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, खरं तर ते वाईल्ड कार्ड नसून वाइल्डेस्ट कार्ड असेल. दरम्यान, इरफान पठाणही यात उडी घेत म्हणाला, “जर तो म्हणाला की त्याला आयसीसी टी-२० विश्वचषक खेळायचा आहे, तर त्याला संधी देण्यास कोणीही मागे हटणार नाही. हे घडणार नाही, पण तसे झाले तर कोणीही आक्षेप घेणार नाही. यामुळे कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही.”

हेही वाचा – त्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही: हरभजनच्या ‘सॅमसनला पुढचा टी-२० कर्णधार बनवायला हवा’ या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

वीरेंद्र सेहवागने काही दिवसापूर्वी क्रिकबझवर म्हटले होते की, ‘एमएस धोनीचा स्ट्राइक रेट २५० पेक्षा जास्त आहे आणि आतापर्यंत त्याची सरासरी काहीच नाही, कारण तो अद्याप या स्पर्धेत बाहेर पडलेला नाही. टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार आम्ही अनेक चांगल्या संघांविरुद्ध खेळणार आहोत. त्याला पहिल्या फेरीत फलंदाजीची संधी मिळणार नाही. त्याच्यापेक्षा चांगला यष्टिरक्षक फलंदाज दुसरा कोण असू शकतो?