Jake Fraser McGurk Half Century : आयपीएल २०२४ मधील ४३वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने वेगवान सुरुवात केली. यादरम्यान दिल्लीचा सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कने अवघ्या १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर तो दिल्ली कॅपिटल्ससाठी दोनदा सर्वात कमी चेंडूत वेगवान शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे या हंगामातील त्याच दुसरे वेगवान अर्धशतक आहे. या अगोदर त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १५ चेंडूत अर्शतक ठोकले आहे.

या सामन्यात जेक फ्रेझर-मॅकगर्कने २७ चेंडूचा सामना करताना ११ चौकार आणि ६ षटकार मारत ८४ धावांची वादळी खेळी साकारली. त्याला फिरकीपटू पियुष चावलाने झेलबाद केले. या मॅकगर्कने पोरेलसोबत पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर या खेळीच्या दरम्यान त्याने एक खास पराक्रम केला आहे. तो आयपीएलमध्ये १५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोनदा अर्धशतक झळकावणार तिसरा फलंदाजी ठरला आहे. त्याच्याआधी हा पराक्रम केकेआरच्या आंद्रे रसेल आणि सुनील नरेनने केला आहे.

हेही वाचा – LSG vs RR : राजस्थानविरुद्ध वेगवान गोलंदाज मयंक यादव खेळणार की नाही? एलएसजीचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणाले…

दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज –

१५ जेक फ्रेझर मॅकगर्क विरुद्ध एसआरएच दिल्ली २०२४
१५ जेक फ्रेझर मॅकगर्क विरुद्ध एमआय दिल्ली २०२४ *
१७ क्रिस मॉरिस विरुद्ध जीएल दिल्ली २०१६
१८ ऋषभ पंत विरुद्ध एमआय वानखेडे २०१९
१८ पृथ्वी शॉ विरुद्ध केकेआर अहमदाबाद २०२१

हेही वाचा – KKR vs PBKS : पंजाबविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीर संतापला, लाइव्ह मॅचदरम्यान अंपायरशी भिडला, VIDEO व्हायरल

दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. या मोसमात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असेल. शेवटच्या वेळी दोन्ही संघ एकमेकांशी भिडले तेव्हा मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स संघ ४ सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने ३ सामने जिंकले असून संघ आठव्या स्थानावर आहे.