आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६५ वा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. राहुल त्रिपाठीने ७६ धावा केल्या. प्रियाम गर्ग आणि निकोलस पुरन यांच्या खेळीमुळे हैदराबाद संघ १९३ धावा करु शकला. दरम्यान मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह या सामन्यात चांगलाच तळपळा. त्याने शेवटच्या चेंडूवर विकेट घेत मोठा विक्रम नोंदवला आहे.

हेही वाचा >>> रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मोठा निर्णय; ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

हैदराबादच्या फलंदाजांनी चांगली खेळी करत वीस षटकात १९३ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने ७६ धावा केल्या. तर प्रियाम गर्ग ४२ धावा तर निकोलस पुरनने ३८ धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादला रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या फलंदाजांना यात यशही आले. राहुल त्रिपाठी बाद होताच हैदराबादचे खेळाडू बाद होत गेले. रमणदीप सिंगने तीन विकेट्स घेतल्या. तर बुमराहने वॉशिंग्टन सुंदरला शेवटच्या षटकात त्रिफळाचित केलं.

हेही वाचा >>> दिवसही तोच आणि विरोधी संघही तोच, डेविड वॉर्नरसोबत ९ वर्षांनंतर दुर्दैवी योगायोग; नेमकं काय घडलं?

या विकेटसह तो टी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. अशा प्रकारचा विक्रम करणारा बुमराह पहिलाच खेळाडू आहे. या सामन्यात बुमराहने एक विकेट घेतली. पण या विकेटसह टी-२० मध्ये त्याच्या एकूण २५० विकेट्स पूर्ण झाल्या. या सामन्यात हैदराबाद संघाने १९३ धावा केल्या.