scorecardresearch

सामना गमावला तरी बटलरने केली कमाल, आयपीएलच्या इतिहासात ‘असा’ विक्रम रचणारा ठरला पहिलाच खेळाडू

एकही चौकार न लगावता सहा षटकार यांच्या मदतीने बटलरने ७० धावा केल्या आहेत.

jos buttler
जोस बटलर (फोटो ट्विटरवरुन साभार)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार ठरला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा चार विकेट्स आणि पाच चेंडू राखून विजय झाला. शेवटच्या क्षणी चित्र पालटल्यामुळे हा सामना संस्मरणीय ठरला. दरम्यान, सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव झालेला असला तरी या संघाचा दिग्गज फलंदाज जोस बटलरची सगळीकडे वाहवा होत आहे. या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करून बटलरने अनेक विक्रम रचले आहेत.

हेही वाचा >>> IPL : चहलने विराटला रन आऊट केल्यावर ‘राजस्थान रॉयल्स’वाले म्हणाले “हे म्हणजे तुमच्या ‘एक्स’ने…”

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जोस बटलरने धडाकेबाज फलंदाजी करत बंगळुरुच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. बटलर जैसवालसोबत फलंदाजीसाठी सलामीला आला होता. पहिल्याच षटकापासून बटरल मोठे फटके मारत होता. त्याने एकूण ४७ चेंडूंमध्ये सहा षटकार यांच्या मदतीने ७० धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान, या डावात त्याने फलंदाजीमध्ये अनेक विक्रम केले. बंगळुरुविद्धच्या सामन्यात तो पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत मैदानावर पाय रोवून होता. विशेष म्हणजे वीस षटके खेळूनही तो शेवटी नाबाद राहिला.

हेही वाचा >>> IPL 2022, RR vs RCB : युजवेंद्र चहल बल्ले बल्ले ! विराट कोहलीला केलं विचित्र पद्धतीने बाद, चेंडू फेकताच…

बटलरने ४७ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या आहेत. या धावा करताना एकही चौकार न लगावता सहा षटकार यांच्या मदतीने ही धावसंख्या उभारली आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करुन एकही चौकार न मारता फक्त सहा षटकार लगावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

विशेष म्हणजे बंगळरुविरुद्धच्या सामन्यात बटलरने ७० धावा करुन ऑरेंज कॅप मिळवली आहे. सध्या बटलरने एकूण तीन सामन्यांत २०५ धावा केल्या आहेत. बटलरनंतर सर्वाधिक धावसंख्येच्या तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर इशान किशन आहे. त्याने १३५ धावा केलेल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jos buttler made record played whole 20 overs not made single four in ipl 2022 prd

ताज्या बातम्या