आयपीएलचा पंधराव्या हंगामतील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. सोमवारची लखनऊ सुपर जायंट्स आणि सनराझर्स हैदराबाद यांच्यातील लढत तर चांगलीच रोमहर्षक ठरली. या सामन्यात हैदराबादचा १२ धावांनी पराभव झाला असून लखनऊचा कर्णधार केएल राहुलने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याच्या या कामगिरीमुळेच लखनऊ संघ १६९ धावसंख्या उभी करु शकला. दरम्यान, या सामन्यात केएल राहुलने मोठा विक्रम नोंदवला आहे. त्याने टी-२० सामन्यांत ५० अर्धशतके केली असून असा विक्रम करणाऱ्या भारतातील पाच फलंदाजांमध्ये राहुल सामील झाला आहे. हेही वाचा >>> क्रिकेटपूट व्यंकटेश अय्यर करतोय ‘या’ सुंदर अभिनेत्रीला डेट ? फोटोवर कमेंट करताच चर्चेला उधाण टी-२० सामन्यात ५० अर्धशतके पूर्ण करुन केएल राहुल असा विक्रम करणाऱ्या टॉप पाच फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. या आधी हा विक्रम विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना यांच्या नावावर आहे. विराटने आतापर्यंत ७५ अर्धशतके केलेले आहेत. तर रोहित शर्माच्या नावावर ६९, शिखर धवन ६३ आणि सुरेश रैनाच्या नावार ५३ अर्धशतके आहेत. राहुलने हैदराबादविरोधातील सामन्यात ५० चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने ६८ धावा केल्या. त्याच्या या खेळामुळेच लखनऊ १६९ धावा उभ्या करु शकला. हेही वाचा >>> IPL 2022 | तिकडे आईवर रुग्णालयात उपचार, इकडे विजयासाठी मुलाची झुंज, लखनऊच्या आवेश खानला सलाम ! या सामन्यात लखनऊने २७ धावांवर तीन गडी गमावले होते. असे असताना राहुल आणि दीपक हुडा या जोडीने लढा दिला. दीपक हुडाने ३३ चेंडूमध्ये ५१ धावा केल्या.