Khaleel Ahmed revealed on jio Cinema: आयपीएल २०२३ स्पर्धेच्या हंगामाला ३१ मार्च पासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद जिओ सिनेमावर आकाश चोप्रासोबतच्या संभाषणात बालपणीचे दिवस आठवून भावूक झाला. खलील अहमद यांनी सांगितले की, लहानपणी जेव्हा तो क्रिकेट खेळायचा तेव्हा त्याचे वडील त्याला बेल्टने मारायचे. यामुळे त्यांच्या शरीरावर जखमा व्हायच्या. त्यानंतर रात्री त्याच्या बहिणी त्या जखमांवर मलम लावायच्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खलील अहमदने आकाश चोप्राला सांगितले, “मला तीन मोठ्या बहिणी आहेत. माझे वडील टोंक जिल्ह्यात कंपाउंडर होते. बाबा कामावर गेल्यावर मला किराणा, दूध किंवा भाजीपाला घ्यायला जावे लागे. या दरम्यान मी मधेच खेळायला जायचो. त्यामुळे घराचे काम अपूर्ण राहायचे.”

खलील अहमद म्हणाला, “माझी आई माझ्या वडिलांकडे माझ्याबद्दल तक्रार करायची. ते मला पाहून विचारायचा की मी कुठे होतो. मी त्यावेळी मैदानावर असायचो. मी अभ्यास किंवा कोणतेही काम करत नाही, म्हणून त्यांना खूप राग यायचा. त्यामुळे ते मला बेल्टने मारायचे. त्यामुळे माझ्या शरीरावर जखमा व्हायच्या. त्यानंतर माझ्या बहिणी रात्री त्या जखमांवर उपचार करायच्या. काही जखमांच्या खुणा अजूनही माझ्या शरीरावर आहेत.”

हेही वाचा – Rohit Sharma: ‘क्रिकेट किट घेण्यासाठी दुधाच्या पिशव्या विकायचा रोहित शर्मा’, खास मित्राने केला खुलासा

खलीलने डॉक्टर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती –

खलील अहमदनेही वडिलांच्या रागाचे कारण सांगितले. तो म्हणाला, “माझे वडील कंपाउंडर होते, त्यामुळे मी डॉक्टर व्हावे किंवा त्या क्षेत्रात काहीतरी करावे, अशी त्यांची इच्छा होती. कारण भविष्यात मला कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, याची त्यांना खात्री करायची होती.”

खलील अहमद म्हणाला, “अंडर-14 मध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माझी निवड झाली, तेव्हा खूप बदल झाला. मी चार सामन्यांत २१ बळी घेतले होते आणि माझे नाव फोटो वर्तमानपत्रातही छापून आले होते. त्यानंतर जेव्हा मी माझ्या कुटुंबाला माझी बक्षिसाची रक्कम दिली, तेव्हा या गोष्टी पाहून फॅमिली भावनिक झाली.”

हेही वाचा – IPL 2023: बेन स्टोक्सवर १६.२५ कोटी रुपये उधळणाऱ्या सीएसकेला मोठा धक्का, सुरुवातीलाच ‘या’ समस्येचा करावा लागणार सामना

क्रिकेटमध्ये नाव होऊ लागल्याने वडिलांनी साथ दिली –

खलीलने असेही सांगितले की, जेव्हा त्याचे क्रिकेटमध्ये थोडे नाव होऊ लागले, तेव्हा त्याचे वडीलही त्याला साथ देऊ लागले. खलील म्हणाला, “एकदा मी क्रिकेटमध्ये थोडी प्रगती केली, तेव्हा तेही मला सपोर्ट करू लागले. त्यांनी मला क्रिकेट खेळायला सांगितले. त्याचबरोबर असे ही सांगितले की, जर मी त्यात करिअर घडवू शकलो नाही, तर ते माझा खर्च त्याच्या पेन्शनमधून उचलतील.”

आपल्या कारकिर्दीची आश्वासक सुरुवात करूनही, खलील अहमद सातत्याच्या अभावामुळे भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान निश्चित करू शकला नाही. तथापि, तो क्षमता असलेला प्रतिभावान गोलंदाज आहे. खलील अहमदने त्याच्या कारकिर्दीत आलेल्या इतर अडथळ्यांबद्दलही सांगितले. खलील अहमद आयपीएल २०२३ मध्ये खेळताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khaleel ahmed revealed on jio cinema that his father used to beat him with a belt for playing cricket in his childhood vbm
First published on: 29-03-2023 at 09:30 IST