आयपीएलमध्ये सध्या सुरु असलेल्या ४४व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघावर ३१ धावांनी मात करीत विजय मिळवला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत ६ बाद २४५ धावा केल्या होत्या. ही या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. कोलकाताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ ८ बळींच्या बदल्यात २१४ धावाच करु शकला. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा हा निर्णय त्यांच्यावर उलटला.
कोलकातातर्फे सलामीवीर सुनील नारायण याने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. त्याने या धावा केवळ ३६ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केल्या. त्याला सलामीवीर ख्रिस लिनने चांगली साथ दिली. १७ चेंडूत २७ धावा करून लिन बाद झाला. त्यानंतर सुनील नारायण ७५ धावांवर आणि पाठोपाठ रॉबिन उथप्पा १७ चेंडूत २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक आणि स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल यांनी जोरदार फटकेबाजी केली. कार्तिकने २३ चेंडूत ५० तर रसेलने १४ चेंडूत ३१ धावा केल्या.
TEAM : KKR VS KXIP
कोलकाता नाइट रायडर्सचा संघ : दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लिन, सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, शुबमन गिल, नितीश राणा, आंद्रे रसुल, जैवन सियरलेस, पीयूष चावला, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), ख्रिस गेल, के. एल. राहुल, मयंक अग्रवाल, एरोन फिंच, करुण नय्यर, अक्षर पटेल, एँड्र्यू टाई, मोहित शर्मा, बरिंदर सरन आणि मुजीब-उर-रहमान.
Updates :
That is it from the first game tonight. @KKRiders beat #KXIP by 31 runs in Indore. #KXIPvKKR #VIVOIPL
Details – https://t.co/VeNHN4VD6o pic.twitter.com/rpnLDwaqBF
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2018
Innings Break!
The @KKRiders post a formidable total of 245/6. The highest total posted by any team in #VIVOIPL 2018.#KXIPvKKR pic.twitter.com/O2tqX6uWWN
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2018
Here's the Playing XI for #KXIPvKKR pic.twitter.com/ipMbtZ548o
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2018
