IPL 2025 KKR vs CSK Highlights: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ मधील तिसरा विजय मिळवत केकेआरचा पराभव केला. चेन्नईने २ विकेट्सने केकेआरला हरवत त्यांच्या प्लेऑफच्या आशांना धक्का दिला आहे.

Live Updates

IPL 2025 Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Highlights: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हायलाईट्स

23:05 (IST) 7 May 2025
KKR vs CSK LIVE: शिवम दुबे झेलबाद

शिवम दुबे आणि धोनीने ४३ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. पण शिवम दुबे षटकारानंतर १९व्या षटकात वैभव अरोराच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यासह आता विकेटनंतर चेन्नईला विजयासाठी ८ चेंडूत १० धावांची गरज आहे. दुबेनंतर नूर अहमद २ धावा करत धावबाद झाले. आता चेन्नईला विजयासाठी ६ चेंडूत ८ धावांची गरज आहे.

22:24 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: डेवाल्ड ब्रेविसची फटकेबाजी

डेवाल्ड ब्रेविसने वैभव अरोराच्या ११व्या षटकात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत ३० धावा कुटल्या. ब्रेविसने ६,४,४,६,६,४ अशी फटकेबाजी करत सामन्याचा रोख बदलला. ब्रेविसने २१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावा केल्या. यासह आता चेन्नईने ११ षटकांत ५ बाद १२३ धावा केल्या.

21:54 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: पॉवरप्लेमध्ये ५ विकेट्स

चेन्नईने पॉवरप्लेमध्ये ५ विकेट्स गमावले आहेत. उर्विल पटेल ११ चेंडूत ३१ धावा करत तिसऱ्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर अश्विनलाही हर्षित राणाने पाचव्या षटकात झेलबाद केलं. तर जडेजाला वरूणने क्लीन बोल्ड केलं.

21:32 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: उर्विल पटेलची शानदार सुरूवात

उर्विल पटेलने पहिल्या षटकात षटकार लगावत सुरूवात केली. पण दुसऱ्या षटकात त्याने पहिल्या चेंडूवर षटकार, मग चौकार आणि परत षटकार लगावत मोईन अलीची धुलाई केली. पण मोईन अलीने डेव्हॉन कॉन्वेला क्लीन बोल्ड करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली.

21:25 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: विकेटने चेन्नईची सुरूवात

केकेआरने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली. दुसऱ्याच चेंडूवर वैभव अरोराने डकवर आयुष म्हात्रेला झेलबाद केलं.

21:08 (IST) 7 May 2025
KKR vs CSK LIVE: चेन्नईला किती धावांचं लक्ष्य?

केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 6 विकेट्स गमावत १७९ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेचे अर्धशतक हुकले असले तरी त्याने ४६ धावा करत संघाचा डाव सावरला. तर मनिष पांडे २८ चेंडूत ३८ धावा करत नाबाद परतला, तर आंद्र रसेलने ४ चौकार ३ षटकारांसह ३८ धावांची खेळी केली. चेन्नईकडून नूर अहमदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले. यासह चेन्नईला विजयासाठी १८० धावांचं लक्ष्य दिलं आहे. चेन्नईने २०१८ मध्ये अखेरीस १८० धावांचं लक्ष्य गाठलं होतं.

21:01 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: रिंकू सिंग झेलबाद

रिंकू सिंग २ चौकार लगावल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेलबाद झाला. आयुष म्हात्रेने सीमारेषेवर एक कमालीचा झेल टिपला. यासह १९ षटकांत केकेआरने ६ बाद १७३ धावा केल्यात.

20:59 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: आंद्रे रसेल फटकेबाजीनंतर बाद

आंद्रे रसेलने २१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ३८ धावांची खेळी केली. पण नूर अहमदच्या १७व्या षटकात तो झेलबाद झाला. यासह संघाने १७ षटकांत ५ बाद १४९ धावा केल्या.

20:58 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: अजिंक्य रहाणेचे अर्धशतक हुकले

अजिंक्य रहाणेने ३३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. पण रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.

20:20 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: पॉवरप्ले आणि विकेट

अंशुल कंबोजने गुरबाजला दुसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर झेलबाद केलं. यानंतर पॉवरप्लेमध्ये आठव्या षटकात नूर अहमदच्या टकात नरेन आणि अंगक्रिश रघुवंशीच्या विकेट्स गमावल्या. तर केकेआरने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६७ धावा केल्या.

19:08 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: केकेआरची प्लेईंग इलेव्हन

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, मोईन अली, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

19:07 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: चेन्नईची प्लेईंग इलेव्हन

आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, डेव्हॉन कॉनवे, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, रविचंद्रन अश्विन, एमएस धोनी (विकेटकिपर/कर्णधार), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

19:04 (IST) 7 May 2025
KKR vs CSK LIVE: नाणेफेक

कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याची नाणेफेक केकेआरने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. वेंकटेश अय्यरच्या हाताला टाके असल्याने तो आज खेळणार नाही, त्याच्या जागी मनिष पांडे खेळणार आहे. शेख रशीद आणि सॅम करन संघाबाहेर झाले आहेत, त्यांच्या जागी डेव्हॉन कॉन्वे-उर्विल पटेल खेळताना दिसणार आहे.

18:43 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: केकेआरचा संपूर्ण संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नोरखिया, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लाव्हेन्सी, लवनिथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकारिया

18:41 (IST) 7 May 2025

KKR vs CSK LIVE: चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ

एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस

IPL 2025 KKR vs CSK Highlights: चेन्नई सुपर किंग्सने केकेआरचा पराभव करत मोसमातील तिसरा विजय मिळवला.