KKR vs MI, IPL 2024:  सध्या देशभर आयपीएल २०२४ (IPL 2024) ची धूम सुरू आहे. देशभरातील क्रिकेट चाहते सध्या आयपीएलचा आनंद घेताना दिसत आहेत आणि त्यांच्या आवडत्या संघांना पाठिंबा देत आहेत. काही चाहते घरी बसून टीव्हीवर सामना पाहण्याची मज्जा घेत आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देतायत, तर काही चाहते स्टेडियममध्ये पोहोचून लाईव्ह सामना पाहत आपल्या संघाला पाठिंबा देतायत. अशाचप्रकारे केकेआरला पाठिंबा देण्यासाठी एक चाहता स्टेडियममध्ये पोहोचला. यावेळी त्याने भरस्टेडियममध्ये असे काही कृत्य केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर त्या चाहत्याला पोलिसांनी चक्क धक्के मारत स्टेडियमबाहेर हकलवून दिले.

ही घटना कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजीदरम्यान घडली. केकेआरच्या फलंदाजाने चेंडू बाउंड्री पार पाठवताच प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या एका चाहत्याने तो झेलला, यानंतर त्याने तो अशा ठिकाणी लपवला ज्याचा कोणी विचारही केला नसेल, चाहत्याने त्याच्या अंडरगारमेंटमध्ये चेंडू लपवून ठेवला. या चाहत्याने केकेआरचा तुफानी फलंदाज रिंकू सिंगच्या नावाची जर्सी घातली होती. तो स्टेडियममधून बाहेर जाण्यासाठी म्हणून निघतो तेव्हा पोलीस कर्मचारी त्याच्याकडून चेंडू मागू लागतात, पण तो चेंडू माझ्याकडे नसल्याचे सांगतो. पण पोलीस त्याची अंग झडती घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने घाबरून पँटमध्ये हात घालून लपवलेला चेंडू काढला आणि परत केला.

Kohli Fervent fans rally behind Kohli with spirited chants video viral
VIDEO : ‘हमारा नेता कैसा हो, कोहली जैसा हो…’, लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांनी दिल्या घोषणा, विराट पुन्हा होणार कर्णधार?
England beat Namibia by 41 runs in T20 World Cup 2024
ENG vs NAM : नामिबियाचा धुव्वा उडवत इंग्लंडचे शानदार कमबॅक, तरी सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी ‘या’ संघावर अवलंबून
Navi Mumbai, knife attack,
नवी मुंबई : रस्त्यावर एकावर चाकू हल्ला, बार आणि लॉजमध्ये घुसून टोळक्याचा धुडगूस, पाच जणांवर गुन्हा दाखल
Fan interrupts play to meet Rohit Sharma
VIDEO : रोहितला भेटण्यासाठी फॅन पोहोचला मैदानात, सुरक्षारक्षकाने पकडल्यानंतर हिटमॅनची रिॲक्शन व्हायरल
Prajwal revanna diplomatic passport
प्रज्ज्वल रेवण्णा डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या बळावर देशातून फरार; हा पासपोर्ट कोणाला मिळतो?
Virat Kohli emotional post on Instagram
IPL 2024 : विराटची राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर भावनिक पोस्ट; RCB च्या चाहत्यांचे आभार मानत म्हणाला…
Ambati Rayudu making fun of RCB team
IPL 2024: अंबाती रायडूने पराभवानंतर पुन्हा उडवली RCB ची खिल्ली, CSK चा व्हीडिओ पोस्ट करत डिवचलं
Tourist couple shot by terrorists in Kashmir
काश्मीरमध्ये पर्यटक जोडप्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जखमी महिलेने सांगितला घटनेचा थरार, मोदींकडे केली ‘ही’ विनंती

चाहत्याने पँटमध्ये लपवला चेंडू अन् चोरून…..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रिंकू सिंग नावाचे टीशर्ट घातलेला केकेआरचा एक चाहता दिसत आहे. एक व्यक्ती त्या चाहत्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो चाहता त्याला टाळण्याचा प्रयत्न करत निघून जात असतो. तेवढ्यात पोलिस तिथे येतात आणि त्याला काहीतरी विचारू लागतात. यानंतर त्याला धक्का देत त्याच्याकडून चेंडू परत घेण्याचा प्रयत्न करत असतात. हा चाहता क्रिकेटचा चेंडू चोरून निघून जाण्याचा प्रयत्न करत होता, यासाठी त्याने चेंडू आपल्या पँटमध्ये टाकला. पण, तो पळणार इतक्यात पोलिस त्याला अडवतात. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) @MufaddalVohra नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आता लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, “लोकांना असे करताना पाहून वाईट वाटते.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “बस एवढेच करायला आला होतास का?” तिसऱ्या युजरने लिहिले की, “रिंकूला कोहलीची बॅट हवी आहे आणि त्याच्या चाहत्याला चेंडू हवा आहे.” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

“भावा, हे मंदिर मी बनवलंय; पण हे माझं शेवटचं…” रोहित शर्माच्या ‘त्या’ VIDEO ने खळबळ; MI मधून बाहेर पडण्याची चर्चा

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात केकेआर संघाने मुंबईवर १८ धावांनी विजय मिळवला. पावसामुळे हा सामना 16-16 षटकांचा झाला. सध्या कोलकाता संघ १३ सामन्यांत १९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.