Mitchell starc bowled travis head video viral : आयपीएल २०२४ मध्ये, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी त्यांच्या घातक फलंदाजीने विरोधी संघांमध्ये दहशत निर्माण केली होती. या दोन्ही फलंदाजांच्या जोरावर हैदराबादने यंदाच्या मोसमात विक्रमी कामगिरी केली. एवढेच नाही तर या संघाने साखळी फेरीत टॉप-२ मध्ये स्थान मिळवले. पण संघाला प्लेऑफमध्ये नेणारे दोन्ही दिग्गज क्वालिफायर-१ मध्ये आत्मघातकी असल्याचे सिद्ध झाले. आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू टीकेचा धनी ठरलेला मिचेल स्टार्क महत्त्वाच्या सामन्यात केकेआरसाठी ट्रम्प कार्ड ठरला. कारण त्याने पहिल्याच षटकांत ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२४ मधीव साखळी फेरीत ट्रॅव्हिस हेड अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध झाला होता. त्याने एकापाठोपाठ एक दमदार खेळी साकारली होती. मात्र या सामन्यात ट्रॅव्हिस हेड क्लीन बोल्ड झाला. त्याचा सहकारी मिचेल स्टार्कने हेडला खातेही उघडू दिले नाही. गेल्या सामन्यातही हेड फ्लॉप दिसला होता. टी-२० विश्वचषकासाठी हा चांगला संदेश नाही. गेल्या सामन्यातही हेड खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्याला अर्शदीप सिंगने शून्यावर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिषेक शर्मा फ्लॉप –

गेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडच्या विकेटनंतर अभिषेक शर्माने विजयाची जबाबदारी घेतली होती. त्याने झटपट अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होता. मात्र अभिषेक शर्माही क्वालिफायरमध्ये फ्लॉप ठरल्याचे दिसून आले. अवघ्या ३ धावांच्या स्कोअरवर वैभव अरोराने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता संघाची धुरा कोण घेते हे पाहावे लागेल. त्याचबरोबर मिचेल स्टार्कने आपला वेगवान मारा सुरु ठेवत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले.

हेही वाचा – T20 WC2024 : “टीम इंडियाला त्याची उणीव भासेल, कारण तो २० चेंडूत…’, ‘या’ खेळाडूबद्दल हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य

मिचेल स्टार्कने आपली शानदार गोलंदाजी सुरू ठेवत पॉवरप्लेमध्ये हैदराबादला आणखी एक धक्का दिला. स्टार्कने नितीश रेड्डीला बाद केल्यामुळे हैदराबादचा डाव गडगडला. नितीश रेड्डी १० चेंडूत ९ धावा करून बाद झाला. यानंतर स्टार्कने या सामन्यातील तिसरी विकेट शाहबाज अहमदच्या रुपाने घेतली. शाहबाज अहमद खाते न उघडताच बाद झाला. पाचव्या षटकाच्या अखेरीस हैदराबादच्या ३९ धावा झाल्या होत्या आणि संघाच्या चार विकेट्स गमावला.

हेही वाचा – Team India : एमएस धोनी BCCIसाठी ठरू शकतो ट्रम्प कार्ड, बोर्ड मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी घेणार मदत

मोठ्या सामन्यात महागड्या खेळाडूने दाखवली ताकद –

केकेआरने आयपीएल २०२४ च्या लिलावात मिचेल स्टार्कवर २४ कोटींहून अधिक खर्च केले होते. आयपीएलच्या सुरुवातीला स्टार्क अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले. पण मोठ्या सामन्यांमध्ये त्याने आपले महत्त्व दाखवून दिले. पॉवर प्लेमध्येच स्टार्कने तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हेडशिवाय त्याने पॉवर प्लेमध्ये रेड्डी आणि शाहबाज अहमदला बाद करून हैदराबादचे कंबरडे मोडले. स्टार्कने ३ षटकांत ३ विकेट्स घेतल्या.