KL Rahul Statement on Sanjeev Goenka Animated Chat in IPL 2024: आयपीएल २०२५ पूर्वी खेळाडूंचा महालिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. रिटेंशनपूर्वी सर्वाधिक चर्चा होती ती म्हणजे लखनौ संघाची. लखनौचा संघ केएल राहुलला रिलीज करणार ही चर्चा जोर धरून होती. रिटेंशन यादी जाहीर होताच सुरू असलेली चर्चाही खरी ठरली. राहुल संघाची साथ सोडणार यामागचं मोठं कारण होतं ते म्हणजे सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या आयपीएल २०२४ च्या सामन्यातील प्रसंग. संजीव गोयंका संघाच्या मोठ्या पराभवानंतर भर मैदानात केएल राहुलवर ओरडताना दिसले होते. आता या प्रकरणाबाबत स्वत राहुलने वक्तव्य केले आहे.

केएल राहुलने १२ नोव्हेंबरच्या मुलाखतीत लखनौ सुपर जायंट्स संघापासून वेगळे होण्याचा आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात उतरण्याचा निर्णय का घेतला हे स्पष्ट केले. लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी रिटेंशन प्रक्रियेनंतर दिलेल्या वक्तव्यावरून त्यांनी केएल राहुलवर निशाणा साधला होता. रिटेंशननंतर गोयंका म्हणाले होते, आम्हाला अशा खेळाडूंना रिटेन करायचं होतं, ज्यांच्यामध्ये सामना जिंकण्याची मानसिकता असेल आणि ते आपल्या वैयक्तिक ध्येयापेक्षा संघाला प्राधान्य देतील. आम्हाला शक्य तितके सामने जिंकायचे आहेत.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण

आता केएल राहुलला स्टार स्पोर्ट्स शोमध्ये विचारण्यात आले की, “या टिप्पण्यांचा त्याच्या संघ सोडण्याच्या निर्णयावर काही परिणाम झाला का? संजीव गोयंका यांच्या बोलण्याचा त्यांच्या निर्णयावर काहीही परिणाम झाला नसल्याचे राहुल म्हणाले. मात्र, गोएंका यांच्या संतप्त संभाषणाचा संघावर निश्चितच परिणाम झाल्याचे राहुलने मान्य केले.

केएल राहुल म्हणाला, “नाही, निर्णय आधीच घेतला होता. काय वक्तव्य आणि टिपण्ण्या सुरू आहेत हे मला माहित नव्हतं. पण ती टिपण्णी रिटेंशननंतर आली असावी. मला नव्याने सुरुवात करावीशी वाटली. “मला माझे पर्याय शोधायचे होते आणि मला अशा संघातून खेळायचं आहे जिथे मला खेळण्यासाठी थोडं स्वातंत्र्य मिळेल आणि संघातलं वातावरणही हसतखेळत असेल. काहीवेळा तुम्हाला फक्त पुढे जाऊन स्वतःसाठी काहीतरी चांगलं शोधण्याची गरज असते..”

हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

राहुलच्या नेतृत्वाखाली, एलएसजी फ्रँचायझीने २०२२ आणि २०२३ हंगामात तिसरे स्थान पटकावले. पण लखनौला गेल्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. कर्णधाराला कायम न ठेवण्यामागे हे कारण असू शकते. आयपीएल २०२४ मध्ये, लखनौ सुपर जायंट्सचा एका सामन्यात सनरायझर्स हैदराबादने वाईटरित्या पराभव केला होता. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने लखनौच्या गोलंदाजांना नमवले. यानंतर संजीव गोएंका कॅप्टन केएल राहुलबरोबर जोरदार वाद घालताना कॅमेऱ्यात दिसले होते. याबाबत राहुल म्हणाला, “सामन्यानंतर मैदानावर जे काही घडले ते फार काही छान नव्हतं, क्रिकेटच्या मैदानावर असे चित्र पाहण्याची कोणाची इच्छा नसते. होय, मला वाटते की याचा परिणाम संपूर्ण गटावर झाला आहे.”

हेही वाचा – Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल

लखनौमधील पहिल्या दोन वर्षांच्या अनुभवाबाबत राहुल म्हणाला, “हा एक अद्भुत अनुभव होता. अगदी सुरूवातीपासून संघाला सुरूवात करावी लागली. मी तीन वर्षांसाठी लिलाव धोरणाचा एक भाग होतो. फ्रँचायझीमध्ये जे काही घडायचे त्यात माझे मत होते. आम्ही एक टीम बनवली. गौतम गंभीर, मी आणि अँडी फ्लॉवर, आम्ही तिघे पहिली दोन वर्षे तिथे होतो. आम्ही एकत्र काम केले. संघात बरेच युवा खेळाडू होते. कोणतीही मोठी नावे नव्हती, पण आम्ही आयपीएल सामने जिंकण्याचे मार्ग शोधले. प्लेऑफमध्ये प्रवेश केला, परंतु दुर्दैवाने दोन्ही वर्ष अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. पण मला वाटते की आम्ही ज्या संघात होतो त्यासाठी आम्ही खूप चांगली कामगिरी केली. नवीन फ्रेंचायझी म्हणून आम्ही चमकदार कामगिरी केली. मला त्या दोन वर्षांचा खूप अभिमान वाटतो.”

आयपीएल २०२४ बद्दल राहुल म्हणाला, “२०२४ चा सीझन मला जसा हवा होता किंवा लखनौ कॅम्पला हवा होता तसा संपला नाही. आम्ही चांगली सुरुवात केली. काही चांगले सामने खेळले आणि काही विजयही मिळवले, पण आयपीएल हे असंच आहे, अर्ध्या स्पर्धेनंतरही तुम्हाला अंदाज येत नाही की तुम्ही चांगली कामगिरी करत आहात की नाही, प्लेऑफमध्ये पोहोचू शकू का आणि स्पर्धा जिंकू शकतो का. तुम्हाला चांगली कामगिरी करत राहावी लागते. दरवर्षी असा प्रवास आणि दडपण असते, पण या सीझनमध्ये या सर्वाचा अतिरेक झाल्यासारखे वाटले. याचा संघावर परिणाम झाला आणि जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही.”

Story img Loader